वंदना सुधीर कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज कट्ट्यावर पालक हा विषय होता.
पालक लग्नासाठी फार मागे लागतात याबद्दल बहुतेकांचं एकमत होतं. आपल्या पालकांना आपली चॅलेंजेस काही समजत नाहीत याबद्दलही दुमत नव्हतं.
“आपल्याला आपल्या लग्नाबद्दल काय वाटतं यापेक्षा आपल्या लांबणाऱ्या लग्नाबद्दल नातेवाईकांना आणि त्यांच्या ओळखीपाळखीच्या लोकांना काय वाटतं याची त्यांना जास्त चिंता असते.” रेवा म्हणाली.

आणखी वाचा : बघतोय रिक्षावाला… आरशातून !

“हो ना, आपलं शिक्षण, मग नोकरी, नंतर लग्न, मग मुलं… सगळं कसं वेळेवर (?) व्हायला हवं असं त्यांना. त्यात इतरांबरोबर तुलना… आपण काय कन्व्हेअर बेल्टवरची प्रॉडक्टस् आहोत का, एकसारखे असायला? त्यांचं कसं सगळं वेळेवर. हेच सारखं ऐकवत राहातात.” सम्याने पुस्ती जोडली.
“तरी बरं हल्ली कुणाचीच मुलं- मुली २८ वर्षांच्या आधी लग्न करत नाहीत. तरी हे कुठलं तरी अपवाद असलेलं उदाहरण शोधून काढतातच आणि मग तेच सारखं दाखवत बसतात.” पम्या म्हणाला.

आणखी वाचा : ‘विंटर कुर्त्या’चे दिवस आले!

“त्यांचं आपलं एकच म्हणणं, आता नोकरी बिकरी सगळं लागलं ना मार्गी, मग कशाला लग्न लांबवताय. जणू काही यांच्या दृष्टीने सेटलमेंट झाली की मिळणारच मनासारखा जोडीदार! अरे, पण त्या जोडीदाराच्या निवडीचे निकष काय याबद्दल ते काहीच रॅशनल बोलत नाहीत. पत्रिका, जात, नोकरी, पगार आणि असल्याच टँजिबल, वरवर दिसणाऱ्या गोष्टी जुळत आहेत ना, मग घ्या बाकीचं जुळवून…नाहीतरी लग्न ही अॅडजस्टमेंटच असते… कुणा बरोबर तरी करायचीच ना! आणि पाण्यात पडलं (की ढकललं!) की येतच पोहता! आम्ही केलेच ना संसार…” श्रुतीची गाडी थांबेचना.

आणखी वाचा : …त्याचं कारण फक्त ‘बिग बॉस’च!

“अगदी हाच सीन आहे आमच्या घरी पण…” सम्या म्हणाला.
अनय इतका वेळ सगळं ऐकत होता. मग म्हणाला,“नशीब माझं की माझ्या घरातलं चित्र थोडं वेगळं आहे. आई, बाबा म्हणतात, आधी लग्न नक्की करायचं आहे ना ते ठरव. लग्न कोणत्याही काळातील असो, कुणाशीही होवो, आपलं आयुष्य बदलतच. त्यासाठी मनाची आधी पूर्ण तयारी व्हायला हवी; आणि हल्लीच्या काळानुसार तुमचे जोडीदार तुम्हीच शोधलेले बरे. मात्र कौटुंबिक पार्श्वभूमी पूर्ण वेगळी नसलेली बरी. नाहीतर एकमेकांबरोबर जुळवून घेण्या बरोबर अगदी वेगळ्या प्रकारच्या कुटुंबाबरोबर जुळवून घेण्याचा आणखीनच ताण.”

आणखी वाचा : नातेसंबंध : नातं दुरावणाऱ्या भेटवस्तू द्याव्यातच कशाला?

मुग्धा म्हणाली, “माझे आई, बाबाही हेच सांगतात. ते म्हणतात, ‘करियर सांभाळून संसार सांभाळता येणार आहेत का तेही बघा. एकमेकांना वेळ देऊ शकणार आहात का, तेही बघा. लग्न नाही केलं तर एकटे राहू शकणार आहात का त्याचाही विचार करा. ही ना ती…तडजोड करावी लागणारच.”
अनय म्हणाला, “तुमचे जोडीदार तुम्ही शोधा हे ठीक. पण त्याचंही टेन्शन येतं यार.”
“या अन्याला कशाचंही टेन्शन येत असतं.” पम्या म्हणाला. “आता मुग्धाने सांगितलं ना आपल्याला त्या वर्कशॉपमध्ये तिला जे सांगितलं ते… वाटलं तर तूही अटेंड कर ते वर्कशॉप, नाही का गं मुग्धा.” मुग्धाला कोपरखळी मारत पम्या हसायला लागला.

आणखी वाचा : SRGMP L’il Champs: रिक्षा चालकाच्या ‘या’ मुलींनी घातलीय संपूर्ण देशाला भुरळ !

“करणारच आहोत आम्ही अटेंड.” रेवा आणि श्रुती एकदमच म्हणाल्या. “आणि सम्याला आणि तुलाही अटेंड करायला लावणार आहोत, कळलं ना पम्या.”
“नाहीतर करा लग्न आई बाबा आणतील त्या स्थळाशी. मग कुरकुरायचं नाही.”
“आई, बाबांनाही काहीतरी अनुभव असेलच ना पण!” पम्या म्हणाला.
“हो, पण त्यासाठी तुमचं आणि त्यांचं तसं नातं हवं.”
“मुग्धाच्या घरी कसं मोकळं वातावरण आहे. ते एकमेकांशी कोणत्याही विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारू शकतात. आपापली मतं मांडू शकतात. सशक्त वादही घालतात.”अनय म्हणाला. ते प्रीमॅरिटल वर्कशॉप अटेंड करायला तिच्या आई, बाबांनीच सांगितलं ना तिला. तिच्या दादानेही ते अटेंड केलं होतं. आपल्या आई, बाबांना माहीतही नाहीये त्याबद्दल काही. मात्र माझ्या आईने या संबंधातील बरीच कात्रणं मात्र कापून ठेवली होती माझ्यासाठी आणि लग्न हा विषय निघाल्यावर मला ती वाचायलाही दिली. त्याच्यामुळे माझ्या लग्नाबद्दलच्या विचारांना थोडी दिशा मिळाली. स्पष्टता आली. टेन्शन जरा कमी झालं.”

आणखी वाचा : कळ्यांचे ‘ते’ दिवस …

“अन्या, तुझं टेन्शन कमी झालं? मग तर वाचायलाच पाहिजेत ती कात्रणं.” पम्याने मस्करी केलीच अनयची.
“आपल्याला आईबाबांची मतं पटत नाहीत तर आपली स्वतःची मतं तरी हवीत की नको, नुसतीच त्यांना नावं ठेवून काय उपयोग” मुग्धा म्हणाली.
“ अगं ते त्यांच्याच काळातल्या गोष्टी सांगत बसतात म्हणून वैताग येतो,” सम्या म्हणाला.
“ बरोबर. म्हणून तर तुमच्या काळात काय बदललं आहे ते त्यांना पटवून द्या ना. पण त्यासाठी तरी मुद्दे हवेत ना तुमच्या जवळ.” श्रुती म्हणाली.
“ते लग्नाळू मुलांच्या पालकांसाठी घेत नाहीत का गं एखादा वर्कशॉप, मुग्धा? त्यात लग्नासाठी मुलांच्या सारखे मागे लागू नका… एवढं जरी त्यांना सांगितलं तरी खूप झालं. आपला बराच ताप, चिडचिड कमी होईल.” पम्या म्हणाला.
“पम्या, मी सांगते हं तुझा तसा तुझा निरोप त्यांना…” मुग्धा हसत म्हणाली….
सगळ्यांना पटलं ते …
(क्रमशः)
vankulk57@yahoo.co.in

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship pre marital counselling why parents are always after the marriage of their children vp
Show comments