‘संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच’ हे शब्द आपण अनेक वेळा आपल्या आई-वडिलांच्या, नातेवाईकांच्या तोंडून ऐकले असतील. कारण, त्यांना संसाराचा अनुभव असतो त्यांचे ते अनुभवाचे बोल असतात. मात्र, सध्याच्या जनरेशनमधील संसारांना लगेच तडा जातो, कित्येक वेळा किरकोळ भांडणं घटस्फोटापर्यंत जातात. नवरा मला वेळ देत नाही, समजून घेत नाही, ही अनेक विवाहित महिलांची तक्रार असते. परंतु अनेकदा ही कारणं खोटी असून शकतात, किंवा गैरसमजुतीतून आलेली असतात.
कारण, लग्नानंतर अनेक पुरुषांना कामाच्या व्यापामुळे इच्छा असून देखील आपल्या पत्नीला वेळ देणं जमतं नाही. त्यामुळे आपला नवरा आपल्याकडे दुर्लक्ष करतोय असं महिलांना वाटायला लागतं. अशा परिस्थितीत काही महिला आपल्या मनातील ही खदखद घरच्यांसमोर किंवा नवऱ्यासमोर बोलून दाखवतात, तर काही मुली या गोष्टीं आपल्या मनात ठेवतात आणि तणावात जातात.
हेही वाचा- लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मासिक पाळी बंद होण्याचा काळ कोणता?
मात्र, नवरा लग्नानंतर तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय, तुम्हाला वेळ देत नाही. असं तुम्हाला वाटतं असेल तर या गोष्टींचा सतत विचार करुन तणावात न जाता, तुमचं नातं जिवंत कसं ठेवता येईल यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. तर चला जाणून घेऊया तुम्हा दोघांच्या सुखी संसारासाठी काय करावं लागेल.
वेळ द्या –
तुम्हाला तुमचा जोडीदार दुर्लक्ष करतोय, काही बोलत नाही असं वाटत असेल तर तुम्ही काही दिवस शांत रहा. त्याला थोडा वेळ द्या, कारण काही वेळ गेल्यानंतर त्याच्या काही अडचणी दुर झाल्या की तो स्वत: त्याच्या मनातील गोष्टी तुम्हाला सांगायला सुरुवात करेल. पण त्यासाठी तुम्ही काही दिवस त्याला त्याची स्पेस द्यायला हवी.
शांत रहा –
कधी कधी असं होतं की, समोरच्या व्यक्तीला तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं. मात्र, तो जाणूनबुजून काही गोष्टी सांगणं टाळतो. कारणं तुम्हाला ती गोष्ट सांगण्यासाठी तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. त्याला जेव्हा योग्य वेळ आली आहे असं वाटेल तेव्हा तो मनातलं सर्व काही सांगेल त्यासाठी त्याला काही वेळ द्यायला हवा. त्यामुळए तुम्ही त्याला आपणाला मनातील काहीही सांगत नाही, असं म्हणत ओरडण्यापेक्षा शांत रहा आणि योग्य वेळेची वाट पाहा. असं केल्यामुळे त्याच्या मनातही तुमच्याबद्दलचा आदर वाढेल.
हेही वाचा- सोशल मीडियावर बराचसा वेळ वाया जातोय का? ‘या’ टिप्स वापरून राहा त्यापासून दूर
संवाद –
वैवाहिक जीवनात सुसंवाद असणं फार महत्वाचं आहे. संवादाने प्रत्येक गोष्टीवर उपाय सापडतो असं म्हणतात. त्यामुळे जेंव्हा तुम्हाला तुमचा नवरा तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय असं तुम्हाला वाटेल. तेव्हा तुम्ही स्वतः त्याच्याशी संवाद साधा. तो दुर्लक्ष करतोय असा दोष देण्याऐवजी त्याला काही अडचणी आहेत का? हे जाणून घ्या.
नात्यातील प्रेम वाढवा –
जर तुमच्या नात्यातील ओढ कमी झाली असेल तर ती कोणत्याही प्रकारे पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण नात्यात ओलावा राहिला तरच प्रेम वाढेल आणि प्रेम वाढलं तर जोडीदार तुम्हाला कधीच इग्नोर करणार नाही.
समुपदेशकाची मदत घ्या –
वरील सर्व उपाय करुनही जर तुमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे बोलणं होत नसेल, तर अशा गोष्टी दुर्लक्ष करण्यापेक्षा चांगल्या समुपदेशकाची मदत घ्या आणि नात्यातील दुरावा दुर करण्याचा प्रयत्न करा.