“ पंचवीसची झालीस की तू ! आता पुरे झालं शिक्षण. लग्न करू तुझं . वय वाढलं, की कोवळेपणा कमी होऊन चेहरा जरड दिसतो ग बाई ! ” संजनाच्या मागे मागे फिरत आजीची बडबड सुरू होती. संजनाचं मात्र त्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. ती तिच्या लॅपटॉपचा ‘पोर्टेबल माऊस’ कुठे गेला ते शोधत होती.
“मी काय म्हणतेय संजू … सुलू मावशीचा भाचा किती देखणा आहे, तू एकदा…” आजीचं वाक्य तोडत संजना म्हणाली ,
“माझ्या लग्नाशिवाय दुसरा विषय नाही न तुझ्याकडे? दुसरी काही करमणूक नाही, स्वतःचं असं जग नाही, मग लागते माझ्या मागे. बरं ते मरू देत. आज, तू ‘माऊस’ बघितलास का माझा? इथेच होता गं. माझा पसारा आवरत नको जाऊस ना आजी ! मग मला काहीच सापडत नाही जागेवर. ” तिचा स्वर चिडका झाला होता. आजकाल आजीची तिच्यामधील गुंतवणूक तिला खूप जाचक वाटायला लागली होती .

आणखी वाचा : यशस्विनी : दुबईमध्ये योग लोकप्रिय करणारी ‘ती’ आहे तरी कोण?

Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Loksatta editorial Copernicus Climate Change Service Report
अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ

“मी नसतं आवरलं तर आता तू घातलेस ते कपडे पण नसते सापडले.” इति आजी .
“म्हणजे हे कपडे तू उचलून ठेवले होते का ? नको ना यार, असं करत जाऊ. मला एक तास लागला माहितेय शोधायला. पहिलं लेक्चर गेलं आता या माऊसच्या नादात दुसरं पण जाणार. तू का हात लावतेस माझ्या वस्तूंना ? तुला काय कळतं यातलं ? ज्या विषयातलं कळत नाही, त्यात का पडते तू ? आणि आई बाबांना आहे काळजी माझ्या लग्नाची, पण शिक्षणाचं महत्व त्यांना कळतं, तुला नाही. या पुढे माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही. आणि माझ्या खोलीत यायचं पण नाही. कटकट आहे नुसती.”
तिच्या या तोडून बोलण्याने मात्र आजी एकदम मिटून गेली. काहीच न बोलता तिथून निमूटपणे निघून गेली .

आणखी वाचा : यशोगाथा : ‘ती’ने केली पोलिओवर मात अन् झाली डॉक्टर!

संध्याकाळी काहीच न बोलता आजी कोमट तेल तिच्या केसांना मालिश करायला घेऊन आली, तेव्हा संजनाला सकाळचा संवाद आठवून वरमल्या सारखं झालं, पण आता पुन्हा आजी लग्नाचा विषय काढेल म्हणून काहीतरी कारण काढून ती तिथून निघून शेजारच्या नीलमताईकडे गेली. नीलमताईला सगळा किस्सा समजला, तशी ती म्हणाली , “मला एक सांग संजू , तू लहान असताना शाळेतून आल्यावर तुला जेवण भरवणारी, तुझा छोटा मोठा अभ्यास घेणारी, फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तुला तयार करवून बक्षीस मिळवून देणारी… हीच आजी होती ना ? तू घरभर पसरवलेली खेळणी आणि तुझं कपाट आजीच आवरायची. ते तुला चालायचं …मग आता अचानक तिच्या वागण्याचा इतका त्रास होतो तुला ? आजी तर तीच आहे , पण तू बदललीय संजू. तिला समजून घेण्यात कमी पडतेय. ती चुकत नाही असं नाही. पण तिच्या ज्या गोष्टी तुला खटकतात त्या न चिडता तू प्रेमाने सांगू शकतेस . आपल्या चुका दाखवणारी आपलीच माणसं असतात गं . इतर लोकांना काय फरक पडतो तुम्ही वाट चुकलात तरी ! आता घरी जाऊन नीट शांतपणे बोल आजीशी. तुझी लग्नाबद्दलची भूमिका नीट सांग, समजेल ती .”

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे – परस्त्रीचं आकर्षण ?

लहानपणी आजोबांची खूप गुळपीठ असलेल्या आणि आता इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या विदिषाचं आजकाल तिच्या आजोबांशी अजिबात पटत नसे. रात्री उशिरा का आली?, बाहेरच का जेवली? असे अनेक प्रश्न , आणि मोबाईलच्या अडचणी सांग, ‘कॅब बुक’ करून दे, माळ्यावरून जुनी पेटी काढून दे, कारने नातेवाईकांकडे नेऊन सोड, अशी अनेक कामं सांगणे याचा तिला जाम कंटाळा येई. एक दिवस तोल जाऊन त्यांच्या हातातून कप निसटला आणि तिच्या युनिफॉर्मवर चहा सांडला. तिचा संयम सुटला आणि ती खूप भडकली. तो वाद विकोपाला गेला, आणि शेवटी बाबांपर्यंत विषय गेल्यावर बाबांनी तिला आजोबांची माफी मागायला लावली. तिच्या मनात विनाकारण आजोबाबद्दल अढी निर्माण झाली.

आणखी वाचा : कोण आहे ही शी- हल्क?

घरात ज्येष्ठ मंडळी असली की तीन पिढ्यातील मतमतांतराने थोड्याफार ठिणग्या उडणारच. फक्त त्या ठिणग्याचा वणवा होऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यायची असते. जुनी खोडं कधी कधी थोडा हटवादीपणा करतात तेव्हा कधी संयमाने तर कधी दुर्लक्ष करून ती वेळ सावरता येते. मुलांना कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये वरिष्ठांनी कारण नसताना रागावलं तर शांतपणे ऐकून घेता येतं न? मग आपल्याच प्रेमाच्या माणसांनी दोन गोष्टी भल्यासाठी सांगितल्या तर राग का येतो? घरातील मोठ्यांशी लहानांनी जुळवून घेताना त्या मोठ्यांनाही त्यांच्या चुका नीट समजावून सांगता आल्या पाहिजेत. अशा वेळी आई वडिलांची मध्यस्थीची भूमिका फार फार महत्त्वाची असते .

आणखी वाचा : महिला, शॉपिंग अन् खिशाला ‘फोडणी’

विभक्त कुटुंब पद्धती सुरू होण्यामागे अनंत कारणं आहेत त्यापैकी एक मोठं कारण ‘ नातवंडं आणि आजी आजोबा यांच्यातील चकमकी ‘ हे देखील आहे. आजी आजोबांच्या तुटपुंज्या सहवासात देखील त्यांच्याशी जुळवून घेताना त्रास होत असेल तर यावर सगळ्यांनीच डोळसपणे विचार करण्याची गरज आहे … कारण नातवंडं सुद्धा कधीतरी आजोबा-आजी होणारच की !
adaparnadeshpande@gmail.com

Story img Loader