ज्या घरात बहीण-भावंडांमध्ये बहीण तीन-चार वर्षांनी मोठी आहे, त्या घरात बऱ्याचदा बहिणींना आपल्या मोठ्या होत जाणाऱ्या भावाशी काही बाबतीत सबुरीनं आणि समजुतीनं जुळवून घ्यावं लागतं. मुलगे असोत वा मुली, एका विशिष्ट वयात त्यांच्यात हार्मोन्समुळे बरेचसे बदल होत असतात. मनात अनेक प्रश्न असतात, ज्यांची उत्तरं शोधण्याची प्रचंड जिज्ञासा असते. त्या प्रश्नांची उत्तरं योग्य वयात योग्य पद्धतीने मिळाली तर अनेक गोष्टी सोप्या होतात, पण तसं नाही झालं तर मुलं ती उत्तरं शोधण्याचे त्यांचे त्यांचे मार्ग अवलंबतात.

आणखी वाचा : Happy Birthday Barbie: बार्बी म्हणते, अवघे ६३ वयोमान; अमेरिकन बार्बी होती ‘मेड इन जपान’!

jui gadkari tharala tar mag actress celebrates diwali in shantivan orphanage
Video : अनाथ व निराधार वृद्धांसाठी मदतीचा हात…; ‘ठरलं तर मग’ जुई गडकरीच्या ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Father-Son Duo Shares Heartwarming Dance Moment
“बाप-लेकाची भन्नाट जोडी!”, मुलाने हटके स्टाईलमध्ये दिलं खास गिफ्ट, वडीलांची प्रतिक्रिया पाहून पोट धरून हसाल, पाहा Viral Video
Viral Video Shows Grandchildren Love
‘माझं तिच्यावर खूप प्रेम…’ आजीला झुमके, अंगठी घालणारी नात; VIRAL VIDEO पाहून तुम्हीही भावूक व्हाल
sandha badaltana manprasthashram
सांधा बदलताना : मन:प्रस्थाश्रम
A 15 year old girl was saved by advanced treatment in Pune print news
मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचूनही ‘ती’ बचावली! पंधरा वर्षीय मुलीची कहाणी
sister brother heart touching video
VIDEO : “मला गिफ्ट नको पण मला वचन दे की दारू कधी पिणार नाही” भावाचा हात धरून रडली बहीण
लेकीला अद्दल घडवण्यासाठी आईने लढवली शक्कल
“चिंची चेटकीण आली फ्रिजमध्ये”, लेकीला अद्दल घडवण्यासाठी आईने लढवली शक्कल, Viral Video पाहून पोट धरून हसाल

मुलगे जेव्हा मोठे होत असतात तेव्हा स्त्रीदेहाबद्दल अनेक प्रश्न आणि आकर्षण या दोन्ही गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं. अशा वेळी घरात जर मोठी बहीण असेल तर तिला आपल्या भावाची ही अवस्था लक्षात येते. कधी तिला आपल्या भावाची शोधक नजर अस्वस्थ करते तर कधी त्याचं बदललेलं वागणं. वयात येणाऱ्या भावाच्या मनातली खळबळ जर तिला समजली, तर तिला प्रसंगी भावाचा सखा होऊन त्याबद्दल मैत्रीच्या नात्याने तर कधी वडीलकीच्या नात्याने त्याला समजावणं जमलं पाहिजे. सर्वसाधारण या मुलग्यांचे प्रश्न हे असतात – जाहिरातीत दिसणारे पॅड इथे कपाटात कशासाठी आहेत? दर महिन्याला ताईच्या पोटात का दुखतं? तिला इतका त्रास होतो, तसा इतर मुलींनापण होत असतो का? ताईची अंतर्वस्त्र बदललेली दिसतात. आईपण असलं काही वापरते …ते का? बाबा आणि आई एकत्र का झोपतात? माझ्या शरीरात अचानक विचित्र बदल होत आहेत, ते का? काही सिरियल ताई बघते, पण मग मला का नाही बघू देत?

आणखी वाचा : International Women’s day 2023: २००० वर्षांपूर्वी स्वतःच्या नावाने नाणी पाडणारी मराठी आद्य राणी ‘नागनिका’

सिनेमात दाखवतात तसं माझे आईबाबासुद्धा करत असतील का? मग मला का नाही दिसत? यासारखे असंख्य प्रश्न त्यांच्या मनात घोंघावत असतात, ज्यांची उत्तरं त्यांना योग्य पद्धतीनं मिळणं खरंच गरजेचं आहे . अन्यथा ती उत्सुकता घातक ठरू शकते. अशा वेळी आईवडील मुलांचे मित्र झाले तर फारच उत्तम. पण थोडी मोठी असलेली बहीण जर त्याची मैत्रीण झाली तर त्याच्या प्रश्नांची उत्तरं खेळीमेळीच्या वातावरणात सहजतेने मिळतील. शिखाने तेच केलं. बायलॉजी शिकणाऱ्या शिखाचा लहान भाऊ आणि शिखा हे अगदी पक्के दोस्त. छोटा शेखर आजकाल घरातील मदतनीस आली की ती फरशी पुसताना तिच्याकडे टक लाऊन बघतो हे शिखाच्या लक्षात आलं. कधी तो आपल्याकडेही असंच बघताना तिला थोडंसं अवघडल्यासारखं झालं होतं. एक दिवस तिनं त्याला जवळ बसवलं आणि गप्पा गप्पांत स्त्रीच्या शरीरात असणारे अवयव, जे पुरुषांपेक्षा वेगळे आहेत, त्यांचं कार्य समजावून सांगितलं. लहान बाळाला आई कसं पोषण देते, त्यासाठी लागणाऱ्या दुधाच्या ग्रंथी कशा असतात, त्यांचं कार्य हे सांगितलं. पुरुषांची नजर स्त्रियांना कशी अस्वस्थ करते, त्यांना कसा त्रास होतो हेही सांगितलं. एक दिवस तर तिनं त्याला पाळीबद्दल माहिती देणारे व्हिडीओ दाखवले. मुलींना महिन्यातील काही दिवस का आणि कसा त्रास होतो हे सांगितलं, आणि शेखरला खूप मोठ्या कोड्याची उकल झाल्यासारखं वाटलं.

आणखी वाचा : Women’s Day 2023 : आकाशाला गवसणी घालणारी कॅप्टन कृतज्ञा

आज्ञा ही अकरावीत शिकणारी मुलगी, तर लहान भाऊ फक्त सहावीतला. एक दिवस ती कपडे बदलत असताना भाऊ डोकावून बघतोय हे तिच्या लक्षात आलं आणि तिनं खूप गोंधळ घातला. वडिलांनी भावाला दोन कानाखाली लगावल्या. त्या प्रसंगानंतर आज्ञा त्याच्याशी एकदम तुसडेपणाने वागू लागली. छोट्यानं अचानक असं का केलं, त्याच्या मनात काय खळबळ आहे याचा कुणी विचारच केला नाही. अशा वेळी मुलांना सोप्या आणि सहज भाषेत समजेल असं समजावून सांगायला हवं हे लक्षात आल्यावर आईनेच त्याला एका समुपदेशकाकडे नेलं. त्या काकांशी मैत्री झाल्यावर छोट्याच्या मनातील गुंता खूप सहजपणे सुटला. मनात प्रश्न निर्माण होणं आणि उत्सुकता वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आणि गरजेचंही आहे. फक्त त्या प्रश्नांचं समाधान योग्य पद्धतीने शास्त्रीय कारणांसहित असल्यास ते जास्त योग्य ठरतं.
प्रत्येक घराला या अशा प्रसंगातून जावं लागतं. मुलांच्या प्रश्नांची उत्तरं योग्य वयात न मिळाल्यास त्याचं समाधान चुकीच्या पद्धतीनं शोधल्या जाऊ शकतं. ते टाळण्यासाठी त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती माहिती समजावून सांगितली गेली पाहजे. नाहीतर त्याचे होणारे वाईट परिणाम आपण अवतीभवती बघतोच ना?
adaparnadeshpande@gmail.com