अपर्णा देशपांडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उच्च पदावर असणाऱ्या व्यक्ती ही नेहमी सर्वांना बरोबर घेऊन जाणारी, सगळ्यांना समजून घेत, समजावून देत पुढे जाणारी असते. तिचा आत्मविश्वास तिच्या देहबोलीतून झळकत असतो. सहकाऱ्यांना अशीच व्यक्ती ‘बॉस’ म्हणून हवी असते. तुम्ही आहात का तसे?
ती ऑफिसमध्ये आली, आणि सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. ती फार सुंदर होती का? तर नाही. तिने अत्यंत महागडे कपडे घातले होते असंही नाही, पण तिच्या चालण्या बोलण्यात एक वेगळाच रुबाब होता. तिला बघून कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांना नक्कीच वाटलं, की हिच्या येण्याने आपल्या बुडीत खात्यात जाणाऱ्या कंपनीला आता चांगले दिवस येणार.
हेही वाचा >>>Navjyot kayr : मिस वर्ल्ड स्पर्धेत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय वंशाची महिला आहे तरी कोण?
आपल्याला सांभाळून घेणारी, आणि आधार देणारी अशी महत्वाकांक्षी अधिकारी मिळाली आहे असा दिलासा त्यांना वाटला. काही दिवसांतच त्यांचा हा विश्वास तिनं खरा करून दाखवला. कंपनीची आर्थिक बाजू भक्कम झाली, काम करणाऱ्यांचे आपसातले नातेसंबंध थोडे जास्त दृढ झाले आणि वातावरणात एक सकारात्मकता आली.
सगळे म्हणायला लागले, की आपली नवीन सी.ई.ओ. ही एक ‘अल्फा वूमन’ आहे. कशी असते अल्फा वूमन? ती असते कायम चार लोकांत उठून दिसणारी, न मागता नेतृत्व मिळवणारी, आजूबाजूच्या वर्तुळात कायम मान दिला जाणारी आणि कणखर व्यक्तिमत्व असणारी स्त्री. अशा स्त्रीच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत ती प्रचंड आत्मविश्वास निर्माण करते, त्यांच्यामधील अंतर्गत क्षमतांचा त्यांनाच परिचय करून देऊन त्यांना प्रगतीपथावर नेण्यास कायम मदत करते आणि नेहमी केंद्रस्थानी असते. अल्फा स्त्रीची आणखी विशेषत: म्हणजे कठीण प्रसंगात न डगमगता ती स्थिर राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करते.
तारिणीच्या बाबतीतही तिच्या कंपूमधील सगळ्यांना असंच वाटत होतं. कुठे जाण्याचा किंवा मिळून काही करण्याचा प्लॅन असला आणि तारिणीनं जाण्यास नकार दिला तर कंपूमधील एकही जण तिला सोडून जाण्यास तयार होत नसे. तिच्या मैत्रिणींना ती एक भक्कम मानसिक आधार वाटत असे. तिनं तिच्या पतीलाही नोकरी सोडून व्यवसाय करण्याच्या त्याच्या इच्छेला पाठिंबा देत संपूर्ण मदत केली होती, त्याचं मनोबल वाढवलं होतं. तिनं तिच्या करिअरमधील मोठे मोठे निर्णय देखील फार ठामपणे घेतले होते.
हेही वाचा >>>‘आई, बाबांचं तुझ्यावर प्रेम नाही का?’
“तारिणी, तू इतके ठाम निर्णय कसे घेऊ शकतेस गं? आपले निर्णय चुकले तर काय होईल याची भीती तुला नाही का कधी वाटत?” असं मैत्रिणीनं विचारलं तेव्हा तारिणी म्हणाली, “माझे निर्णय चुकले तर त्याचं खापर मी इतरांच्या डोक्यावर नाही फोडणार. मी अयशस्वी झाले तर माझ्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी घ्यायला मी तयार आहे.” “ तू ना, एक पक्की ‘अल्फा लेडी’ आहेस बाई! तुझ्या ऑफिसमधील तुझ्या टीम मेंबरच्या पाठीशी ठामपणे उभी राहतेस. त्यांची जबाबदारी घेऊन त्यांच्या वतीनं वरिष्ठांना उत्तर देतेस, असं फार कमी लोक करतात.”
“माझ्या अशा वागण्याने त्यांना खात्री पटते, की आपली टीमलीडर आपल्या कामावर विश्वास ठेवते. प्रसंगी सांभाळून घेते, मग तेही खूप मन लावून काम करतात.” “ घरी मुलांच्या बाबतीतही अशीच वागतेस का?”
“ हो, बहुतेकवेळा.मीमुलांना सांगते, की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण उद्यातुम्हाला वाटलं, की आपणकाहीचुकीचंवागलोकिंवामनातचोरटेपणा आला तर विनासंकोचमाझ्याशीबोलायचं.तुमची आई कायम तुमच्यापाठीशीअसेल.फक्त तुम्ही प्रामाणिक राहा.”
हेही वाचा >>>देखभाल खर्च एकतर्फी कमी करणे गैरच!
“उद्या नवराच जर तुझ्याशी अप्रामाणिक राहिला तर?” तिनं मुद्दाम चिडवून विचारलं. तारिणी हसून म्हणाली, “एकतर तो असं वागणारच नाही, आत्तापर्यंत त्याचा स्वभाव मला नीट माहीत झालाय, पण तसं झालंच तर त्याला त्याच्या वागण्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. मला वाईट वाटेल, पण मी दृढ निश्चयानं माझा मार्ग वेगळा करेन.” तिचं उत्तर ऐकून मैत्रिणीनं प्रेमानं तिला मिठी मारली.
प्रत्येक स्त्रीला ‘अल्फा’ स्त्री होणं जमेलच असं नक्कीच नाही, पण किमान आपली किंमत कळली आणि त्यातून संसारात किंवा समाजात आपला आत्मसन्मान टिकवता आला, स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची ताकद आली तरी खूप काही कमावलं असं नक्कीच म्हणता येईल.
adaparnadeshpande@gmail.com