अपर्णा देशपांडे

अजूनही लग्नाचा ‘सीझन’ सुरू आहे. नुकताच संपलेल्या सुट्ट्यांचा काळही अनुभवला आहे . तेव्हा बऱ्याच जणांना मामाच्या गावाला जाणे आणि शुभकार्यात उपस्थिती लावणे अशी दुहेरी पर्वणी लाभली असणार. आईच्या माहेरी पोरंसोरं तुफान मजा करतात आणि पोरांची आईदेखील माहेरचं सुख अंगी लावून घेते. माहेरी जर कुणाकडे शुभकार्य असेल तर आईची लगबग बघण्यासारखी असते.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Interesting story of father-son relationship Shri Ganesha movie Milind Kavade
बापलेकाच्या नात्याची रंजक गोष्ट
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Raqesh Bapat And Riddhi Dogra
“तो माझा एक्स असला तरी…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम एजेबाबत पूर्वाश्रमीच्या पत्नीचे मोठे विधान; म्हणाली…

पण जर पोरांचे बाबादेखील अशा कार्यात उपस्थित असतील, तर मात्र आईची अनेकदा ‘गोची’ होते. तिला सारखी काळजी असते, की आपल्या घरचे लोक नवऱ्याकडे लक्ष देत असतील की नाही? कुणाशी तो बोलत असेल की एकटा पडला असेल? त्याला वेळेवर स्नानासाठी गरम पाणी मिळालं असेल का? त्याला अंघोळी नंतर निवांत कपडे घालायचे असतात. आता इथे कुठे आला निवांतपणा? नाश्ता संपायच्या आत हजर असेल ना हा बुवा? नाहीतर दोन्ही बाजूने माझी कोंडी! ‘सुमे, तुझा नवरा फारच ‘स्लो’ आहे बाई’ हा टोमणा आणि ‘काय हे? जावई मंडळीसाठी थोडं थांबत जा म्हणावं गं! आता सुट्टीवर आलोय, तर जरा निवांतपणा नको का?’ असा नवऱ्याचा उलट सवाल. मधल्या मध्ये ‘सुमी’ची पंचाईत! ती बिचारी काहीबाही बोलून वेळ मारून नेते.

आणखी वाचा-‘साक्षी’चं ‘कौमार्य’ सिद्ध होईल का?

तिकडे लग्नाच्या मांडवात वेगळीच घाई. सगळ्यांना भरपूर फोटो काढायचे असतात आणि सुमीच्या ‘नवरोजीं’ना फोटोचा भयंकर कंटाळा ! असा मख्ख चेहरा करून उभे राहतील, की साऱ्या माहेराला सुमीची काळजी वाटावी! ‘कसं निभावते गं ही ‘ह्यां’च्यासोबत ? ‘ असं वाटतं सगळ्यांना! आणि घरी आलो की नवरोबा दात काढत बसतात. ‘काय तुझ्या घरचे लोक फोटो फोटो करतात गं!’ म्हणत हसत बसतात. आता हेच दात जरा तिथे कॅमेऱ्यासमोर दाखवले असते तर? पण नाही. अख्ख्या मांडवात सगळे लोक गुरुगुरू फिरत असताना सुमीचे नवरोजी मात्र बुडाला डिंक लावल्यासारखे एका खुर्चीत घट्ट जाम बसून राहिलेले! मग सुमीनं सारखं ‘पाणी हवं?’, ‘स्टार्टर घेतलं?’ वगैरे विचारत पुढ्यात नाचायचं. म्हणून तिला वाटतंय की नवऱ्याला सोबत नेण्यापेक्षा घरीच बसवून निवांत एखादा सिनेमा लावून द्यावा! म्हणावं, ‘काय हवं ते बाहेरून मागवून घ्या आणि मजा करा. उगाच तिथे सजा दिल्यासारखे यायला नकोय!’

कधी कधी तर गंमतच होते. कुणी एखादा नातेवाईक असतो, ज्याच्या कार्याला जायला जमलेलं नसतं. मग बहुतेकदा बायको नवऱ्याला वारंवार सांगते, “हे बघा, तो भेटला आणि विचारलं की आमच्याकडे कार्याला का नाही आलात… तर मी ऑफिसच्या कामाने बाहेरगावी गेलो होतो, असं सांगायचं.” हे उत्तर नवऱ्याकडून जवळजवळ ती पाठ करवून घेते. पण नवरा शेवटी नवराच! त्या नातेवाईकांनी विचारलं, की ‘ह्यां’ना वेळेवर जे सुचेल ते उत्तर देतात. बायको पार तोंडावर पडते!

आणखी वाचा-नातेवाईक टोमणे मारतायत? मग हे वाचा!

बऱ्याचदा लग्नकार्य असलं, की बायको दोन दिवस आधी जाते आणि नवरा- म्हणजे जावईबापू दोन दिवसांनी कार्याच्या वेळेवर येतात. एरवी ऑफिस मध्ये किंवा पार्टीला झोकात राहणारा नवरा नेमका त्या वेळेला गबाळे कपडे घेऊन येतो. त्याला वाटत असतं, की आपण या कपड्यात ‘कूल ‘ दिसतो! पण तिच्या नजरेतून तसं दिसत नसतं. ” मी निवडून ठेवलेले कपडे का नाही आणले? नेहमीच आपल्या मनाचं का करता? ” म्हणून तिची चिडचिड होते. बायकोला वाटत असतं, माहेरच्या समोर नवऱ्यानं छान ‘साहेबी’ दिसावं. पण नवऱ्याला बरोबर या वेळी जे हातात लागले तेच कपडे वापरायचे असतात. मोकळं ढाकळं राहायचं असतं. तिला ते आवडत नाही.

मागून येणाऱ्या नवऱ्याला त्यानं येताना बरोबर काय काय आणायचं याची भली मोठी यादी बाायकोनं दिलेली असते. पण हे गृहस्थ नेमकं त्यातलं काहीतरी आणायला विसरतात आणि तिची जाम फजिती होते. हे असे अनुभव कधी ना कधी तुम्हालाही आले असतील ना?

यावर उपाय सांगावा तरी कसा! कारण बायकोनं कोणताही उपाय योजायचं ठरवलं, तरी नवरा आयत्या वेळी आपल्या मनासारखंच वागणार, हे ठरलेलं असतं. त्यामुळे आपलं डोकं शांत ठेवणं आणि नवऱ्याला पुन्हा पुन्हा सूचना देत राहणं, हेच काय ते करणं शक्य आहे!

adaparnadeshpande@gmail.com

Story img Loader