पती-पत्नी म्हणजे एका रथाची दोन चाकं वगैरे खरं असलं, तरी ती सगळी घासून गुळगुळीत झालेली वाक्यं आहेत. काही वर्षांनी म्हणे न बोलताच एकमेकांच्या मनातलं कळतं… ‘शब्दे विणू संवाद’ होतो म्हणे! रियली? खरंच सगळ्यांचं असं होतं का हो? मनातलं नेमकं समजलं असतं तर सगळेच संसार किती यशस्वी झाले असते. ज्यांच्या बाबतीत हे सत्य आहे, ती जोडपी आणि प्रामुख्याने ती पत्नी नशीबवान म्हणायला हवी.

आजचा आपला विषय हा पत्नीचं म्हणणं (किंवा कैफियत म्हणूयात ) पतीपर्यंत नेमकं पोहोचत नसेल तेव्हा काय? हा आहे. अनेकांनी अनेकदा अनुभवलं असेल, की एकत्र कुटुंबात अनेक छोट्या-मोठ्या कुरबुरी असतात, अप्रिय घटना घडतात, त्या मनाविरुद्ध असल्या की घरातील स्त्री थोडी नाराज होते. तिचं मन दुखावलं जातं. त्यावर फुंकर म्हणून तिला फक्त व्यक्त व्हायचं असतं. फार काही मोठी अपेक्षा नसते, फक्त नवऱ्यानं म्हणजे आपल्या हक्काच्या माणसानं आपलं ऐकून घ्यावं इतकीच माफक इच्छा असते. पण प्रत्यक्षात घडतं वेगळंच. पत्नी त्याच्या आई- वडिलांबद्दल किंवा बहिणीबद्दल काही बोलतेय म्हणजे आता ती तक्रार करणार या विचारानेच नवरे मंडळी काही ऐकण्याआधीच शाब्दिक वार झेलण्यासाठी ढाल पुढे करतात. त्यानं लगेच जाऊन कुणाला जाब विचारावा अशी बायकोची अजिबातच अपेक्षा नसते, पण त्याच्या मनात तसं असल्याने तिच्या बोलण्याचा तो वेगळाच अर्थ लावून तिलाच चार गोष्टी ऐकवतो. ती आणखीनच दुखावते. छोट्या मुद्द्याचा मोठा बागुलबुवा होतो. तिच्या मनात घरातील इतर सदस्यांबद्दल अढी निर्माण होऊ शकते. हे असं पुन्हा पुन्हा घडल्यास पत्नी नवऱ्याजवळ मन मोकळं करण्यासाठी धजावतच नाही. त्यांच्या नात्यात दरी निर्माण व्हायला सुरुवात होते. हे सहज टाळता येऊ शकतं. पत्नीला आपली भूमिका प्रेमाने, पण स्पष्ट करून सांगता आली पाहिजे. हवं तर पतीचा विश्वास असलेली एखादी व्यक्ती यात मदत करू शकते, पण तिचं मन मोकळं होणं गरजेचं आहे.

Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
bhagare guruji son Akhilesh bhagare will get marriage anagha atul share video
भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लेकीने लग्नघराचा व्हिडीओ केला शेअर
Aasiya Kazi Gulshan Nain Wedding date
८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?

राधिका एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंजिनीअर होती. घरापासून कंपनी खूपच दूर असल्याने ती एका सहकाऱ्यासोबत ‘कार पुलिंग’ करायची. तिच्या येण्याच्या वेळेस तिचे सासरे बाहेर उभे असायचे. ती कारमधून उतरली, की तिच्या सहकारी मित्रास त्यांच्या अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागे. त्या प्रश्नात संशय किंवा कुजकट भाव नसायचा, साधे सहज प्रश्न असत. त्या मित्राची किंवा राधिकाची याला फारशी हरकत नव्हती. एक दिवस तिनं हसत हसत नवऱ्याला याबद्दल सहजपणे सांगितलं तेव्हा तो तिच्यावरच उखडला. “ इतकं वाटतंय तर उद्यापासून त्याच्यासोबत येणं बंद करून टाक. तुझी दुसरी सोय बघू आपण,” असं म्हणून त्यानं विषय बंद केला. त्याची ही प्रतिक्रिया तिला अजिबातच अपेक्षित नव्हती. इतक्या शिकलेल्या आपल्या नवऱ्याला इतकं साधं निवेदनही समजू नये याचं तिला वाईट वाटलं. हे असं होता कामा नये. तक्रार आणि साधं निवेदन किंवा नुसती घटना सांगणं यातील फरक समजणं गरजेचं आहे.

आणखी वाचा-नातेसंबंध : एंगेजमेंट झाली, पण आता लग्न नकोय ?

काही घरात याच्या उलट अनुभव येऊ शकतो. जसं श्रेयाच्या बाबतीत झालं. तिच्या सासूबाई अजूनही त्यांच्या मुलाचे कपडे स्वतः धूत असत. श्रेयाला अवघडल्यासारखं होई म्हणून तिनं त्यांना तशी विनंती करूनही त्यांनी ऐकलं नाही. तिची भावना तिनं नवऱ्याजवळ बोलून दाखवली, तर तो आईवरच ओरडला. “ आता माझी बायको आली आहे, तर माझं सगळं तिलाच बघू देत. तू नको त्यात पडूस!” हे ऐकून आई दुखावली. सुनेनं नेमकं काय सांगितलं असंही वाटलं असणार. श्रेयाला हे मुळीच अपेक्षित नव्हतं. कुठून आपण नवऱ्याजवळ बोललो असं झालं तिला. वरवर बघता गोष्ट अत्यंत मामुली आहे, पण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातील नेमका रोख समजला नाही, आणि आतातायीपणा केला तर नात्यात दरी पडू शकते.

मुलांच्या बाबतीत नवऱ्याकडून येणारा अनुभव तर बहुतांश स्त्रियांना आलाच असणार. घरातील मुलं आईला अनेक पद्धतीनं त्रास देतात. त्या त्रासातदेखील आईला आनंदच मिळत असतो. ती बोलताना म्हणाली की, “ मुलं बघा ना कसं वागतात. हजारदा सांगितलं की चपला बुट रॅक वर ठेवा, पण आल्याबरोबर असे काही पाय झटकतात की बूट सिक्सर मारल्यासारखा उडून सीमारेषेबाहेर ! पोरं पण ना …” या अशा तक्रारी या बऱ्याचदा प्रेमाच्या असतात. लगेच वडिलांनी उठून पोरांना शिक्षा करणं तिला मुळीच अपेक्षित नसतं, पण नेमकं तेच घडतं… आणि तिला प्रचंड वाईट वाटतं. आपण का बोललो असा अपराधी भाव येतो तिच्या मनात.

हे टाळण्यासाठी तिलाच बोलण्याआधी अत्यंत सावध पवित्रा घेऊन हे नमूद करणं गरजेचं आहे, की नवऱ्यानं आधी तिचं फक्त ऐकून घ्यावं. विचार न करता त्यावर उपाय शोधण्याची घाई करू नये. तिला फक्त ऐकून घेणारा कान हवा असतो. घरातल्या ‘पतीदेवांनी’ तो द्यायला हवा.

adaparnadeshpande@gmail.com