Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत होणारी परेड म्हणजे आपल्या देशाच्या सामर्थ्याचं दर्शन असतं. यामध्ये आपल्या नारीशक्तीच्या सामर्थ्याचंही दर्शन घडतं. गेली काही वर्षे या परेडमध्ये महिला लष्करी अधिकारीही सन्मानाने सहभागी होत आहेत एवढेच नव्हे तर नेतृत्वही करत आहेत. आपल्या देशाची ही गौरवशाली परंपरा याही वर्षी सुरुच राहणार आहे.

यावर्षीही महिला अधिकारी महत्त्वाच्या तुकड्यांचं नेतृत्व करणार आहेत. आकाश या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचं यावेळच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सादरीकरण होणार आहे आणि याचं नेतृत्व करणार आहेत लेफ्टनंट चेतना शर्मा . क्षेपणास्त्र तुकडीचं नेतृत्व पहिल्यांदाच महिला अधिकारी करणार आहेत. तर लेफ्टनंट डिंपल भाटी या भारतीय लष्कराच्या डेअरडेव्हील्स मोटरसायकल टीममध्ये बाईक राईडर म्हणून सहभागी असतील. डिंपल या कोअर ऑफ सिग्नल्स या रेजिमेंटमध्ये आहेत. तर भारतीय नौदलाच्या एअर ऑपरेशन्स ऑफिसर लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत या परेडमध्ये १४४ नौसैनिकांच्या तुकडीचं नेतृत्व करतील.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य

आणखी वाचा : भारतीय महिला लष्करी अधिकाऱ्यांची ब्लू हेल्मेट सूदानमध्ये तैनात

आकाश हे क्षेपणास्त्र पूर्णपणे भारतीय बनावटीचं म्हणजे ‘मेड इन इंडिया’ क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करण्यासाठी सक्षम आहे. अर्थातच ‘आकाश’ भारतीय संरक्षण दलासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर संचलनाची ही जबाबदारी मिळाल्यानंतर लेफ्टनंट चेतना शर्मा यांनी साहजिकच आनंद व्यक्त केला आहे. चेतना शर्मा या सध्या भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स रेजिमेंटमध्ये तैनात आहेत. शत्रूच्या विमाने आणि ड्रोनपासून भारतीय हवाई क्षेत्राचं संरक्षण करण्याची मुख्य जबाबदारी या रेजिमेंटकडे आहे.

प्रजासत्ताक दिनी राजधानीतील संचलनात सहभागी होता यावे हे अनेकांचं स्वप्नं असतं. पण अत्यंत कठोर मेहनत केल्यानंतरच काहीजणांचं हे स्वप्नं पूर्ण होतं. दरवर्षी आपण टीव्हीवर हे संचलन पाहायचो, मात्र आपल्याला ही संधी नक्कीच कधीतरी मिळेल असं वाटत होतं. यावर्षी ही संधी मिळाल्यानं या स्वप्नाची पूर्तता झाल्यासारखं वाटतंय, अशी प्रतिक्रिया चेतना शर्मा यांनी व्यक्त केली आहे. या संचलनामध्ये आपल्या युनिटीचं प्रतिनिधित्व करणं ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा : Republic Day 2023: २६ जानेवारीला पंतप्रधान तिरंगा का फडकवत नाहीत? जाणून घ्या कारण

चेतना शर्मा या मूळच्या राजस्थानच्या खाटू श्याम गावच्या आहेत. त्यांनी एनआयटी भोपाळमधून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतले. त्यानंतर सीडीएस परीक्षा देऊन त्या सैन्यात दाखल झाल्या. सलग पाच वेळा परीक्षा दिल्यानंतर सहाव्या प्रयत्नात त्यांना यश आले. दरवर्षी परीक्षा देताना लोकांच्या टीकेलाही सामोरं जावं लागलं पण चेतनाने हार मानली नाही. अथक प्रयत्न, कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं. “जोपर्यंत तुमचं ध्येय साध्य होत नाही, तुमचं स्वप्नं पूर्ण होत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणं हेच महत्त्वाचं आहे,”असं चेतना सांगतात.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दरवर्षी आपण बाईकस्वारांची थरारक प्रात्यक्षिकं पाहतो. या वर्षी लेफ्टनंट डिंपल भाटी या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होऊन बाईक स्टंट करणार आहेत. गेले वर्षभर त्यांचं टीमबरोबर याबाबतचं प्रशिक्षण सुरु होतं. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मधून त्यांनी ११ महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं आहे. तिथून पास आऊट होताना लेफ्टनंट भाटी यांनी सिल्व्हर मेडल पटकावलं होतं. लेफ्टनंट भाटी यांच्या घरातच सैन्याची परंपरा आहे. परमवीरचक्र विजेते शैतान सिंग भाटी हे त्यांचे आजोबा. तर डिंपल यांच्याबरोबरच त्यांची मोठी बहीण दिव्या याही भारतीय लष्कर सेवेत आहेत. लेफ्टनंट दिव्या या २०२० मध्ये कॅप्टन म्हणून तैनात झाल्या.

आणखी वाचा : २१ हजार फूट उंचीवर लिंगभेदाला मूठमाती कशी ते जाणून घ्या

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाध्ये नौदलाचंही दिमाखदार संचलन असतं. यावर्षी नौदलाच्या एअर ऑपरेशन्स ऑफिसर लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत यांच्या नेतृत्वाखाली संचलन होईल. त्याशिवाय तीन महिला आणि पाच पुरुष अग्निवीर कर्तव्य पथावरील या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. सब लेफ्टनंट वल्ली मीना एस याही दिशा अमृत यांच्याबरोबर या परेडमध्ये असतील. दिशा या मूळच्या मंगळुरुच्या असून सध्या त्या अंदमान-निकोबारमध्ये तैनात आहेत. कर्नाटकच्या बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून संगणक शास्त्रातील पदवी त्यांनी घेतली आहे. लेफ्टनंट दिशा या डॉर्नियर विमानाच्या वैमानिक आहेत.

यावेळच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावर नारी शक्तीची खास छाप दिसते आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यांना हवाई दलाच्या युवा अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट कमल रानी मदतनीस असतील. तर हवाई दलाच्या संचलन करणाऱ्या तुकडीचं नैतृत्व अधिकारी आणि एमआय-१७ या लढाऊ विमानाच्या वैमानिक स्क्वाड्रन लीडर सिंधू रेड्डी करणार आहेत. उत्तरेकडील आणि पूर्वेकडील सीमांवरील भागांमधील उड्डाणांमध्ये सिंधू रेड्डी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याशिवाय पहिल्यांदाच बीएसएफच्या उंटांच्या ताफ्यामध्ये महिला अधिकारी सहभाही होत आहेत. पाकिस्तानी सीमेवर वाळवंटात तैनात असणाऱ्या महिलांचे उंटावरील संचलन हेही आकर्षण ठरणार यात शंका नाही.

आणखी वाचा : भारतीय महिलांच्या नेतृत्त्वाखालील स्टार्टअपना गुगलकडून ७५ दशलक्ष …

यावेळेस पश्चिम बंगालच्या चित्ररथात दुर्गादेवीच्या प्रतिमेतून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश दिला जाणार आहे. फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगभरात आपल्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन आवर्जून पाहिले जाते. अनेक वर्षे फक्त प्रेक्षक म्हणून पाहिल्यानंतर आता महिला या परेडमध्ये सहभागी होत आहेत. इतकंच नाही तर आपापल्या तुकड्यांचं नेतृत्वही करत आहेत. भारतातली स्त्री शक्ती आता आणखीनच भरारी घेण्यासाठी, यशाची नवनवीन शिखरं गाठण्यासाठी, सज्ज आहेत. भारताचं खरं सामर्थ्य ही स्त्री शक्ती आहे आणि देशाच्या संरक्षणाची जबाबदारीही स्त्री शक्ती तितक्याच समर्थपणे पार पाडत आहे हेच यावरुन दिसून येतं.

Story img Loader