केतकी जोशी

संपूर्ण जगाचं लक्ष गुरुवारी दुपारी लागून राहिलं होतं ते श्रीहरिकोटामध्ये. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून चांद्रयान अवकाशात झेपावलं आणि देशातल्या नागरिकांची छाती अभिमानानं फुलून आली. तमाम भारतीयांसाठी चांद्रयान-३ या मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण हा अभिमानाचाच क्षण होता. श्रीहरिकोटामधून जेव्हा हे यान अवकाशात झेपावलं आणि संपूर्ण देशभरातून या शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला.

PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
India successfully tests anti tank missile Nag Mk 2
शत्रूचा थरकाप उडवणाऱ्या ‘नाग’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; पाकिस्तान-चीनच्या कारवायांना चाप बसणार?
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
minister ashish shelar criticized sharad pawar over conflict in mva
शरद पवारांच्या राजकीय ऱ्हासाला सुरुवात : आशिष शेलार
Indian Armed Forces are undergoing bold transformation and consolidation of services.
सशस्त्र दलातील सुधारणांचे वारे कसे असणार ?
truti dimri left aashiquie 3
Aashiqui 3 चित्रपटातून ‘या’ अभिनेत्रीचा पत्ता कट? याआधीच्या बोल्ड भूमिका ठरल्या कारणीभूत

अर्थात हे कुणा एकट्याचं काम नाही, तर याचं श्रेय संपूर्ण टीमला जातं. चार वर्षांपूर्वीची मोहीम अपयशी ठरली म्हणून रडत न बसता, जिद्दीनं त्यातल्या कमतरता दूर करून पुन्हा नव्या जोमानं इस्रोने हे यश मिळवलं. सातत्य, अविरत मेहनत, जिद्द यांच्या जोरावर इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या टीमनं हे करुन दाखवलं. या मिशनच्या यशामुळे भारत आता अवकाश तंत्रज्ञानात जगातील पहिल्या चार देशांमध्ये सहभागी झाला आहे. यापूर्वी अमेरिका, चीन आणि रशियानं या मोहीमा यशस्वी केल्या आहेत.

आणखी वाचा-‘बाईपण भारी देवा’… एका पुरूष डॉक्टरच्या नजरेतून!

या मोहीमेत सहभागी असलेले इस्रोचे सगळेच वैज्ञानिक कौतुकास पात्र असले यामध्ये विशेष उल्लेख केला जात आहे तो ‘भारताची रॉकेट वुमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रितू करिधाल यांचा. रितू करिधाल या चांद्रयान- ३ च्या मिशन डायरेक्टर आहेत. इस्रोमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ असलेल्या रितू करिधाल-श्रीवास्तव या भारताच्या यशस्वी मिशन मंगळच्याही डेप्युटी ऑपरेशन्स डायरेक्टर होत्या. त्यानंतरच त्यांना भारताची ‘रॉकेट वुमन’ म्हणून संबोधलं जाऊ लागलं. पण या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी रितू यांनी आतापर्यंत अफाट मेहनत केली आहे.

रितू करिधाल या मूळच्या लखनऊच्या. त्यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी. मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या रितू यांना अगदी लहानपणापासूनच अवकाश,चंद्र-तारे यांच्याबद्दल विशेष आकर्षण होतं. त्यामुळे त्यामध्येच करिअर करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. पण तसं पुरेसं मार्गदर्शन देणाऱ्या संस्था किंवा ट्यूशन्स त्यावेळेस उपलब्ध नव्हत्या. रात्रभर आकाशातल्या ताऱ्यांचं निरीक्षण करणाऱ्या रितू यांनी स्वत:ची वाट निवडली; खरंतर तयार केली. चमचमणाऱ्या ताऱ्यांमागे, गडद काळ्या आकाशामागे, चंद्र, त्याच्या बदलत्या कळांमागे नेमकी काय रहस्ये दडली असतील याचं त्यांना कायम कुतूहल वाटत असे आणि त्याची उत्तरे शोधण्याचा त्या स्वत:च प्रयत्न करीत.

आणखी वाचा-प्रीती अघालयम… संचालक, ‘आयआयटी झांझिबार’!

इस्रो, नासा या संस्थाबद्दल, अवकाश मोहिमांबद्दल जी काही माहिती, फोटो मिळत, ती कात्रणांच्या रुपांमध्ये जमवून ठेवायचा त्यांना छंद होता. लखनऊमधून फिजिक्समध्ये त्यांनी एम. एस्सी. पदवी मिळवली आणि ज्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्समधून पदवी मिळवली तिथंच त्यांनी सहा महिने शिकवलंही. त्यानंतर बंगळुरुच्या इंडियन सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं.

बंगळुरुमधील आयआयएससीमध्ये रितू यांनी एरोस्पेस इंजिनियरिंगमध्ये उच्च शिक्षण घेतलं. १९९७ मध्ये त्या इस्रोमध्ये दाखल झाल्या. तेव्हापासूनच आजवर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पण त्यात उल्लेखनीय म्हणजे माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळालेला युवा शास्त्रज्ञ पुरस्कार. अवकाश विज्ञानात विशेष कामगिरी केल्याबद्दल त्यांना २०१७ मध्ये वुमन अचिव्हर पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर २०१५ मध्ये मंगळयान मोहिमेबद्दल त्यांना इस्रो टीम अवॉर्डचा सन्मान देण्यात आला आहे.

आणखी वाचा-मालविका हेगडे यांनी तारली ७००० कोटींच्या कर्जातली ‘सीसीडी‘

अत्यंत बुध्दीमान इंजिनीअर आणि आपल्या टीममधील सदस्यांना एकत्र घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून रितू यांना ओळखलं जातं. बुध्दीमत्तेबरोबरच आपल्या जबरदस्त मेहनतीच्या जोरावर त्यांनी अवकाशविज्ञानात भरीव योगदान दिलं आहे. विज्ञान क्षेत्रात करिअर करणाऱ्या अनेक तरुण मुलींसाठी रितू या आदर्श आहेत.

भारताला अवकाश विज्ञानात परिपूर्ण करणे हाच ध्यास असलेल्या रितू या इस्रोच्या अनेक मोहिमांमध्ये सहभागी झाल्या आहेत. यामध्ये मंगळयान (मंगळ मोहीम), चंद्रयान-१ मोहीम, चंद्रयान- २ मोहीम, जीएसटीए- ६ ए मोहीम, जीएसटी- ७ ए मोहीम अशा यशस्वी मोहिमांचा समावेश आहे. रितू श्रीवास्तव यांना एक मुलगा, एक मुलगी अशी अपत्ये आहेत.

आणखी वाचा-‘माणूस’ नसलेली ‘बाई’ टीव्हीवर बातम्या वाचते, तेव्हा…

आपल्याकडे तसंही विज्ञान क्षेत्रात मुलींची संख्या कमी आहे. मेडिकल,इंजिनीअरिंग करुन नोकरी करणाऱ्या लाखोजणी आहेत. पण विज्ञान क्षेत्रात आणि विशेषत: अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रात उच्चशिक्षण घेऊन संशोधन करणाऱ्या मुलींची संख्या अगदी कमी आहे. खरंतर संधी मिळाली तर महिला काय करु शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे रितू करिधाल आहेत. स्त्री शिकली, प्रगती झाली अगदी चंद्रावरही गेली असं हजारवेळा म्हटलं जातं. पण चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते तीही स्त्री करुच शकते.

प्रचंड वेळ, एकाग्रता, जिद्द, अभ्यास लागणाऱ्या अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात ऋतू करिधार यांनी तर आपली मोहोर उमटवली आहे. पण त्यांच्यासारख्या हजारो वैज्ञानिकांनी आपल्या देशाची मान कायम उंच ठेवली आहे. विज्ञानावर, अवकाश तंत्रज्ञानावर मनापासून प्रेम करणाऱ्या, त्यात काहीतरी करु इच्छिणाऱ्या कितीतरी मुलींना रितू करिधाल यांनी वाट दाखवली आहे. देशाच्या सर्वोच्च अभिमानास्पद कामगिरीमध्ये फक्त खारीचा नाही, तर सिंहाचा वाटा आपणही उचलू शकतो ही ज्योत असंख्य मुलींच्या मनात जागवणाऱ्या रितू करिधाल यांना सलाम!

ketakijoshi.329@gmail.com

Story img Loader