डॉ. नागेश टेकाळे

हल्लीचे अनेक हाऊसिंग कॉम्प्लेक्स कमीत कमी ८-१० मजली असल्यामुळे घरात विशेषत: हॉलमध्ये भरपूर उजेड, सूर्यप्रकाश आणि वारं असतं. या गोष्टी लक्षात ठेवूनच हॉल डेकोरेशनसाठी योग्य गोष्टींची निवड करावी लागल्यामुळे बऱ्याच मर्यादा येतात. त्यामुळे हॉलमधली बरीच जागा मोकळी राहते. पण ‘क्रॅस्युला’च्या विविध जाती कुंडीत वेगवेगळ्या ठिकाणी, कोपऱ्यात वाढवल्या तर त्याच्या तजेलदार, जाड, रसरशीत पानांमुळे हॉल भरल्यासारखा दिसेल. या जातीतल्या झाडांना पाणी पण खूप कमी लागतं, आठ-आठ दिवस कॅस्युला पाण्याशिवाय सहजी जगू शकतं.

nisargalipi A sign of arrival of spring season
निसर्गलिपी : वसंतागमनाची चाहूल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Excavation in Boisar East Violation of quarry rules in excavation Palghar news
बोईसर पूर्वेला बेसुमार उत्खनन; खोदकामात खदानी नियमांचे उल्लंघन
uran Kandalvan forest latest news in marathi
कांदळवनाची सुरक्षा धोक्यात, उरणमधील कांदळवने विविध मार्गांनी नष्ट करण्याचे प्रयत्न
Nagpur, mango tree , Bhonsale period ,
भोसलेकालीन ‘आमराई’ ओसाड होण्याच्या मार्गावर!
mumbai Municipality action under hawker-free area campaign
फेरीवालामुक्त परिसर मोहिमेअंतर्गत पालिकेचा कारवाईचा बडगा
maternity hospital plot for parking Borivali
बोरिवलीत प्रसूतिगृहाच्या भूखंडावर वाहनतळ; प्रसूतिगृहाची प्रतीक्षाच
tabebuia rosea trees bloom along vikhroli highway
टॅब्यूबियाच्या फुलांनी विक्रोळी परिसर बहरला

‘बेबी नेकलेस’ म्हणजे ‘क्रॅस्युला परफोरॅटा’ किंवा ‘रूपेस्ट्रीस’ हे कॅस्युलाची जात अतिशय मोहक दिसते. याचं बारीक खोड पसरत वाढतं, त्यांच्या पेरांवर विरुद्ध बाजूला एकेक त्रिकोणी फिकट पिवळी हिरवी पानं येतात. एकावर एक असलेल्या पेरांवरची पानं एकमेकांशी काटकोनात आणि जवळजवळ वाढतात. खोड बारीक असल्यामुळे ही पानं खोडात ओवल्यासारखी दिसतात. फांद्या जेव्हा बारीक असतात तेव्हा तर पानांची रचना ‘बेबी नेकलेस’सारखी दिसते. त्यामुळेच कुंडीमध्ये छोटं झाड लावलं तरी ते मोहक दिसतं आणि फांद्या फुटून त्यावर आलेल्या पानांमुळे हॉलच्या खिडकीला ‘हूक’ लावू त्याच्या हँगिंग बास्केट्स वाढवल्या तर हॉलमधल्या प्रकाशाची तीव्रताही कमी होईल. बास्केट्समध्ये फांद्या लांब पसरतात. पण त्या जास्त लांब झाल्या की त्यांचं सौंदर्य कमी होतं, म्हणून फांदीच्या टोकाकडचा शेंडा खुडून तो दुसऱ्या कुंडीत लावा, म्हणजे नवीन झाड वाढायला लागेल. ते तुम्हाला ‘प्रेझेंट’ म्हणून दुसऱ्यांनाही देता येईल.

‘रॅटल स्नेक’ ही क्रॅस्युलाची जात खरोखरच मोहात पाडणारी आहे. यात, खोडावर पानं- इतकी जवळजवळ आणि दाट-घट्ट वाढतात की हे झाड वरून पाहिलं तर अनेक ‘रॅटल स्नेक’च्या शेपट्या एकत्र वाढत असल्याचा भास होतो. म्हणून ‘रॅटल स्नेक’ची कुंडी हॉलमध्ये उंचीवर न ठेवता जमिनीवर ठेवावी. कुंडीखाली एखादी ताटली ठेवावी, म्हणजे पाणी जमिनीवर पडणार नाही किंवा दुसऱ्या मोठ्या कुंडीतही कुंडी ठेवावी. याही प्रकाराला पाणी अगदीच कमी लागतं.

हॉलमध्ये सूर्यप्रकाश खूप येत असेल तर ‘कॅम्प फायर’ या क्रॅस्युलाच्या प्रकाराची निवड करावी. फांद्या असलेल्या खोडावर पोपटी कोवळी पानं येतात. पानं जसजशी वाढत जातात आणि त्यांना जसजसा जास्त सूर्यप्रकाश मिळत जातो. तसा पानांचा रंग पिवळसर नारिंगी, लालसर होतो आणि टोकाकडे रंग गडद होतात. तेव्हा एखाद्या शांत होत असलेल्या शेकोटीत निखारे धगधगत असल्याचा भास होतो. हे झाड सावलीत वाढवलं तर पानांचा रंग हिरव्या सफरचंदासारखा होतो. पानांचा रंग सूर्यप्रकाशात आणि सावलीत पालटत असल्यामुळे एकच झाड वेगवेगळे असल्यासारखे दिसते. याचे खोड पसरणारे आहे, एका खोडातून दुसरे पसरणारे खोड उगवते आणि झाड वाढत जाते. खोडाची आणि त्यावरची पानांची रचना यामुळे कुंडीत छोटी चटई पसरल्यासारखी दिसते. खोडाच्या मातीजवळच्या भागावर छोटी मुळं फुटतात. ती कुंडीतल्या मातीत वाढतात आणि काही दिवसातच कुंडी पूर्ण भरून जाते, अशी कुंडी ‘हँगिंग बास्केट’ म्हणूनही खिडकीच्या फ्रेमवर टांगता येते. खोडाचा शेंडा किंवा एखादी फांदी तोडून दुसऱ्या कुंडीत लावली तरी त्यापासून नवीन झाड तयार होते.

Story img Loader