आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी अपयशाला सामोरे जावेच लागते. पण, त्या अपयशातून जो शिकतो तोच पुढे जातो. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रुची कालरा. रुचीने आपल्या आयुष्यात अनेकदा अपयशाचा सामना केला आहे. मात्र, तिने कधीही हार मानली नाही. रुचीने २०१७ मध्ये ऑक्सीजो’ (Oxyzo) नावाच्या कंपनीची स्थापना केली. यूनिकॉर्न क्लबमध्ये या कंपनीचा समावेश झाला आहे. रुचीप्रमाणे तिचे पती आशीष महापात्रासुद्धा प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांनी २०१६ मध्येऑफ बिजनेस’ (OfBusiness) नावाची कंपनी सुरू केली. रुची व आशीष जगातील एकमेव पती-पत्नी आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांची सुरुवात केली.

कोण आहे रुची कालरा?

रुची कालराचा जन्म दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच रुचीमध्ये नेतृत्व गुणवत्ता होती. शाळेत ती विद्यार्थी संघटनेची सदस्या होती. रुचीने इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए पदवी मिळवली आहे. एमबीएनंतर तिने आयआयटी दिल्लीतून बीटेक केले आहे, तर रुचीचे पती आशीष हे मूळचे ओडिशाचे रहिवासी आहेत. कटक, ओडिशात जन्मलेल्या आशीषने सुरुवातीचे शिक्षण एससीबी मेडिकल पब्लिक स्कूलमधून घेतले. आशीषने इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए आणि आयआयटी खरगपूरमधून बीटेक केले.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sustainability Crusader Award Announced to Alok Kale Founder and Managing Director of Magnus Ventures Pune news
औद्योगिक कचऱ्यातून नवव्यवसायाची निर्मिती! पुण्यातील तरुण उद्योजकाचा प्रवास
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
phanindra sama success story
Success Story : दोन मित्रांच्या मदतीने ५ लाखांत व्यवसायास प्रारंभ; मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल ७ हजार कोटींचे साम्राज्य
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Thane Water pipe connection, Thane arrears Water connection, Thane Water, Thane latest news, Thane marathi news,
ठाण्यात थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत, ठाणे महापालिकेची कारवाई
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा

हेही वाचा- घटस्फोटानंतर बनली जगातील सर्वात श्रीमंत महिला, १,३८,०१५ कोटी रुपये केले दान; एकूण संपत्ती तब्बल…

आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर दोघांनी मॅकिन्से अँड कंपनीत पहिल्यांदा एकत्र काम केले होते. दोघांचेही एकच स्वप्न होते, उद्योजक बनण्याचे. सुरुवातीला दोघांची आधी मैत्री झाली, नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले व पुढे जाऊन दोघांनी लग्नगाठ बांधली.

त्यानंतर २०१६ मध्ये आशीषने ऑफ बिझनेस नावाचा स्टार्टअप सुरू केला. उत्पादन आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात कच्चा माल आणि कर्ज सुविधा पुरवणारे हे व्यासपीठ आहे. त्यानंतर बरोबर एक वर्षानंतर, म्हणजे २०१७ मध्ये रुचीने आशीष व इतर तीन लोकांना बरोबर घेऊन ऑक्सिजो नावाचा स्टार्टअप सुरू केला. ही कंपनी लघु आणि मध्यम उद्योगांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज देते. रुचीची कंपनी ७२ तासांच्या आत कमी व्याजदरात इतर कंपन्यांना कर्जाची रक्कम देते, म्हणूनच अल्पावधीतच तिची कंपनी लोकप्रिय झाली. आज रुची जवळपास दोन हजार ६०० कोटी रुपये संपत्तीची मालकीण आहे.

हेही वाचा- वडिलांना लहानपणीच गमावले, आई शेतावर मजूर; क्लास न लावता बनलेल्या IAS अधिकारीचा खडतर प्रवास पाहा..

आशीषने एका मुलाखतीत सांगितले होते की, स्टार्टअप कंपनीची सुरुवात करणे दोघांसाठी सोपे नव्हते. २०१६ मध्ये जेव्हा ते त्यांच्या स्टार्टअपसाठी निधी उभारत होते, तेव्हा त्यांना सुमारे ७३ वेळा नकाराचा सामना करावा लागला होता. मात्र, आता त्यांचा स्टार्टअप यशस्वी असल्यामुळे लोक त्याची चर्चा करत आहेत. आज बाजारात या दोन्ही कंपनीची किंमत जवळपास ५२ हजार कोटी रुपये आहे.

Story img Loader