काहींसाठी यशाचा मार्ग हा सोपा असतो; तर काहींना एक ध्येय गाठण्यासाठी हजारो अडथळ्यांचा सामना करावा लागतो. आज आपण अशाच ग्रामीण भागातील, अतिशय खडतर प्रवासातून, मेहनतीने वर आलेल्या संतोष वासुनिया आणि लक्ष्मी वाणी यांचा प्रवास पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संतोष वासुनिया मध्य प्रदेशातील झाबुआ या लहानशा शहरातील रहिवासी आहेत. इतरांप्रमाणे त्यांनीही कोविडच्या काळात देशातील लहानातील लहान गावांपासून ते मोठमोठ्या शहरांत पसरलेल्या कोरोना साथीचा हाहाकार पाहिला. मात्र, अशा परिस्थितीतही घर चालविण्यासाठी किरकोळ पगाराची नोकरी न करता, त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग शोधला. “मी माझ्या आयुष्यात अनेक संकटे आणि आव्हानांना सामोरी गेली आहे; परंतु माझा हा प्रवास इतरांसाठी आशादायी आहे,” असे संतोष या सांगतात.

कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा स्वतःचा व्यवसाय नसतानादेखील ४४ वर्षांच्या या महिलेने स्वतःच्या हिमतीवर तिचा व्यवसाय सुरू केला.

हेही वाचा : गरिबीवर मात करून स्वतःच्या हिमतीवर बनली भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी! कोण आहे जाणून घ्या…

“मी चार वर्षांची असताना माझे वडील गेले. तेव्हापासून माझ्या आईवर घराची सर्व जबाबदारी आली होती. तिने घर चालविण्यासाठी रोजंदारीवर काम केलं. मी दहावीपर्यंत शिकून घेतलं आणि त्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मी, माझ्या पती आणि दोन मुलांसह पेटलावाडमध्ये राहण्यास आले,” अशी माहिती संतोष यांनी इंडिया डॉट कॉमशी बोलताना दिली.

असं असलं तरीही स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे हे स्वप्न संतोष यांनी कधीच सोडले नाही. त्यांनी त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी स्वतःचे सौंदर्य उत्पादनांचे दुकान सुरू केले.

“सुदैवानं मी ट्रान्स्फॉर्म रूरल इंडियाच्या (TRI) एंटरप्रेन्योरशिप फॅसिलिटेशन हब टीमच्या संपर्कात आले आणि त्यांच्या मदतीनं मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दिशेनं वाटचाल करू लागली,” असे संतोष यांनी सांगितले.

संतोष यांनी स्वतःच्या बचतीमधील एक लाख रुपये गुंतवले. या गुंतवणुकीसह पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अंतर्गत त्यांना ३.७५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली. या व्यावसायिक प्रवासामधून संतोष या आता रिफ्रेशमेंट्स, सौंदर्य उत्पादने, सौंदर्यप्रसाधने इत्यादींचे दुकान चालवून स्वतःचा व्यवसाय उत्तमरीत्या चालवत आहेत. इतकेच नव्हे, तर संतोष या यशस्वीपणे त्यांचे कुटुंब चालविण्यासही हातभार लावत आहेत.

हेही वाचा : लहान वयात लग्नाला नकार; घर सोडले, नोकरी केली, परदेशात जाऊन पूर्ण केले मास्टर्स! ही तरुणी ठरतेय सर्वांचा आदर्श

लक्ष्मी वाणी यांचा व्यावसायिक प्रवास

संतोष यांच्याप्रमाणेच लक्ष्मी वाणी यांचा प्रवासही प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्वप्नांवरून समजते की, ग्रामीण भागातील एखादी सामान्य व्यक्तीसुद्धा अनेकांना प्रेरणा देण्याचे काम करू शकते. लक्ष्मी वाणी या नेवाली ब्लॉक, बारवानी येथील नेवाली बुजुर्ग गावातील रहिवासी आहेत. लक्ष्मी या ग्रामीण भागातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील असल्याने, त्यांचे अकरावीचे शिक्षण झाल्यांनतर लगेच त्यांचे लग्न लावून देण्यात आले. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराची बायको आणि तीन मुलांची आई म्हणून लक्ष्मी यांना आर्थिक परिस्थितीची चांगलीच जाणीव होती. घर चालविण्यासाठी दुसऱ्या उत्पन्नस्रोताची गरज त्यांच्या लक्षात आली होती.

“मी नेवाली बुगुर्ग गावात TRI इंडियाच्या युथ हब टीमने आयोजित केलेल्या एंगेजमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी झाले आणि तिथून माझ्यात उद्योजकतेची आवड निर्माण झाली. मला संगणक विषयातील थोडीफार माहिती होती. त्यामुळे आपण स्वतःचे कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) सुरू करावे, ही इच्छा मला स्वस्थ बसू देत नव्हती,” असे लक्ष्मी यांनी ‘इंडिया डॉट कॉम’शी बोलताना सांगितले.

लक्ष्मी यांनी स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी हालचाल सुरू केली. युथ हब टीमने बरवानी येथील ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेशी (आरएसईटीआय) संपर्क साधून, लक्ष्मीची सहा दिवसांच्या रेसिडेन्शियल सीएससी [CSC] आयडी [ID] प्रशिक्षण व प्रमाणन अभ्यासक्रमासाठी नोंदणी करून घेतली. आवश्यक प्रशिक्षण घेऊन, लक्ष्मी यांनी आता स्वतःचा सीएससी [CSC] व्यवसाय सुरू केला असून, गावातील महिलांसाठी त्या एक उत्तम उदाहरण बनल्या आहेत.

“अशा यशस्वी महिलांच्या प्रेरणादायी गोष्टी, तळागाळातील एनजीओंचे महत्त्व, आर्थिक साक्षारता, तसेच उद्योजकता, बाजार संशोधन, उत्पादन यांसारख्या मूलभूत गोष्टींचे प्रशिक्षण हे गावातील तरुणांसाठी आणि महिलांना सक्षम बनविण्यासाठी किती आवश्यक आहे हे स्पष्ट करतात,” असे युथ इनिशिएटिव्ह ऑफ ट्रान्स्फॉर्म रूरल इंडियाचे अभ्यासक राणू कुमार सिंग यांनी इंडिया डॉट कॉमला माहिती देताना सांगितले.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rural women santosh vasuniya and lakshmi wani who achieved their goals and becomes entrepreneur in village chdc dha
Show comments