भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही देशातील सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. साराला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. सारा आपल्या आयुष्यातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते. साराने औषध वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आहे, पण ती या ग्लॅमर इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सारा तेंडुलकर ही सचिन आणि अंजली तेंडुलकर यांची मुलगी आहे. ती क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरची मोठी बहीण आहे. तिचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला. सचिनने १९९७ साली त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पहिल्यांदा ‘सहारा कप’ जिंकून दिला. या खास क्षणाची आठवण म्हणून सचिनने आपल्या मुलीचे नाव ‘सारा’ ठेवले, असं म्हटलं जातं.

…अन् तिने लग्नाच्या आठ दिवसाआधी त्याला दिला नकार

सारा तेंडुलकरने तिचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले. यानंतर ती इंग्लंडला गेली, लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून तिने औषध वैद्यकशास्त्रात पदवी प्राप्त केली. साराला प्रवासाची खूप आवड आहे. तिने फ्रान्स, इंग्लंड, इंडोनेशिया आणि दुबई सारख्या देशांना भेटी दिल्या आहेत.

“मी घटस्फोट घेण्याचा निर्णय…”; मलायका अरोराचे विधान, पोटगीचा उल्लेख करत म्हणाली…

पदवीचे शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यावर साराने आपल्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात एका कपड्याच्या ब्रँडपासून केली होती. ती काही लोकप्रिय ब्रँड्ससाठी मॉडेलिंग करते, अनेक फॅशन शोचा ती भाग असते. साराची बॉलीवूडमधील कलाकारांशी चांगली मैत्री आहे, ती फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असते. औषध वैद्यकशास्त्रात अभ्यास केला असला तरी त्यात करिअर करायचं नाही. तिला ग्लॅमर इंडस्ट्रीची आवड असून ती त्यात करिअर करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar daughter sara tendulkar education in medicine doing career in modelling hrc