-वनिता पाटील

साक्षी, आपल्या आवडत्या क्षेत्राचा निरोप घेताना मनात एक हूरहूर असते आणि डोळ्यांत असतात अनावर अश्रू. पण काल निवृत्ती जाहीर करताना पत्रकार परिषदेमधलं तुझ्या डोळ्यांतलं पाणी हूरहूर लावणारं नव्हतं, तर निराशा, अगतिकता, हतबलता, हताशा यांनी डबडबलेलं होतं ते. कुस्तीच्या मॅटवर प्रतिस्पर्ध्याला चारी मुंड्या चीत करायची धमक बाळगणारी आणि तसं करत पदकं खेचून आणणारी तू इतकी हताश झालीस तर मग आम्ही बाकीच्यांनी कुणाकडे बघायचं?

student wing agitation
‘वंचित’कडून महाविकास आघाडी समर्थक विचारवंत लक्ष्य
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
Dentists are challenged to perform cosmetic and hair transplant surgery Mumbai print news
दंतचिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याला आव्हान
loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?

तू आम्हा सगळ्यांना फार फार प्यारी आहेस. अगदी जीवाभावाची आहेस. प्रत्येक बाईला कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या रुपात ज्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, त्याला तुझं क्षेत्र पण अपवाद नाही, ही खरं तर किती खेदाची गोष्ट. पण आपल्या किंवा आपल्या सख्यांच्या अन्यायाविरुद्ध प्रत्येकजण उभी राहतेच असं नाही. कितीही इच्छा असली तरी लैंगिक पातळीवर होणाऱ्या शोषणाविरुद्ध, मुस्कटदाबीविरुद्ध उभं राहणं प्रत्येकील झेपतंच असं नाही.

पण तू उभी राहिलीस. तुझी सखी तुझ्याबरोबर उभी राहिली. द्रौपदीची लाज राखणाऱ्या कृष्णासारखा बजरंग पुनियाही तुमच्याबरोबर होता. रीतसर तक्रारी करून काहीच झालं नाही, तेव्हा ही वेदना घेऊन तुम्ही रस्त्यावर उतरलात. महिना महिना तिथंच ठाण मांडून बसलात. सगळा देश तुमच्या पाठीशी होता. कारण तुम्ही फक्त देशासाठी खेळणाऱ्या, पदकं आणणाऱ्या खेळाडू नव्हतात. तुम्ही या देशाच्या लेकी होतात. प्रत्येकाच्या घरात असतात तशाच. तुम्हाला न्याय मिळावा अशी अगदी प्रत्येकाची इच्छा होती.

आणखी वाचा-पतीच्या निधनानंतर दुसर्‍या पत्नीला निम्म्या निवृत्तीवेतनाचा हक्क- कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय

पण तुम्हाला काय मिळालं, तर तिकडे लोकशाहीचं नवं मंदिर खुलं होत असताना एखाद्या अटट्ल गुन्हेगाराला मिळते तशी वागणूक. त्यांनी तुम्हाला रस्त्यावरून फरफटत नेलं. सगळा देश धृतराष्ट्र होऊन ते बघत राहिला. तुमची लाज राखणारा एकही कृष्ण या रामराज्यात कसा असेल, असा आम्हा कुणालाच खरं तर प्रश्न पडला नाही. तू आणि तुझ्या सहकारी, सख्या… तुम्ही जे भोगलंत, ते या देशातली प्रत्येक स्त्री कुठल्या ना कुठल्या पातळीवर या ना त्या प्रकारे भोगत असते. ती शिकलेली असो की नसो, ती कमावती असो की नसो, ती कणखर असो वा नसो… कशानंच काहीही फरक पडत नाही गं…

एखादीला घरूनच उभारी मिळत नाही… मग ते माहेर असो की सासर. तिथे कुणी काका, मामा, जवळचा मित्र म्हणत तिचा फायदा घ्यायला टपलेला असतो. एखादीला घरून प्रोत्साहन मिळतं आणि ती घराबाहेर पडते, तर तिचे लचके तोडायला कोल्हे, कुत्रे, लांडगे टपलेले असतात. हातातली सत्ता चांगल्या गोष्टींसाठी राबवण्याऐवजी त्यांना त्यांचे पुरुषी अहंकार कुरवाळून हवे असतात. त्यासाठी आसपासच्या स्त्रिया ही त्यांची जणू मालमत्ताच. तुमच्याकडे भलेही लायकी असेल, पण मला हवं ते द्याल तर तुम्हाला हवं ते मिळेल, अशी नीच वृत्ती पावलोपावली असते गं…

हा सौदा मान्य करून काहीजणी त्यांना हव्या त्या वाटेनं पुढे जातात, त्याबद्दल काहीच बोलण्याची गरज नाही. पण हा सौदा ज्यांना मान्य नसतो, आपल्या आत्मसन्मानाला ज्यांना धक्का लागून द्यायचा नसतो अशांनी काय करायचं? त्या दुखावतात, तडफडतात, कधीतरी ब्र काढण्याची हिम्मत करतात, पण काहीच उपयोग होत नाही तेव्हा क्षमता असतानाही ती वाट सोडून घरी जातात. सामान्य घरातल्या मुलीनं हे सगळं गृहीतच धरलेलं असतं.

आणखी वाचा-महिलांनो, नवीन वर्षात ‘या’ दहा चुका करू नका

पण दुसऱ्याला चारी मुंड्या चीत करायची क्षमता असलेल्या कुस्तीगीर महिला त्यांच्याच वरिष्ठावर लैंगिक शोषणाचे आरोप करतात, त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची हिम्मत दाखवतात. सर्वस्व पणाला लावतात आणि त्यांच्या वाट्याला आज पुन्हा अपमानच येतो. या देशात ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ असं म्हटलं जातं यावर विश्वासच बसत नाही आजकाल. तुम्ही ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करता, तोच पुन्हा बलाढ्य होऊन शड्डू ठोकणार असेल तर काय करायचं, कसं उभं रहायचं? कुठले आईवडील कुस्तीच काय, इतर कुठलाही क्रीडाप्रकार खेळू पाहणाऱ्या आपल्या मुलीला पाठवतील यापुढच्या काळात? कशा घडतील पुढच्या खेळाडू मुली?

ही कसल्या अराजकाची नांदी आहे काय माहीत… कुठेतरी दूरवर वाजणाऱ्या धोक्याच्या घंटांचे आवाज जवळ येऊ लागले आहेत… साक्षी तुझ्यासारख्या कुस्तीगीर मुलीच्या डोळ्यांत विषादाचे अश्रू असतील, तर आम्ही कुणाकडे बघायचं?…

lokwomen.online@gmail.com