-सिद्धी शिंदे

Sania Mirza- Shoaib Malik Divorce: आज ट्रेनच्या डब्यात सानिया मिर्झाच्या घटस्फोटाच्या गप्पा रंगल्या होत्या… “एवढं ट्रोलिंग सहन करून लग्न केलं त्या पाकिस्तान्याशी पण असं अर्ध्यावर काय सोडायचं”? माझ्या शेजारच्या साधारण नव्याने जॉबला लागलेल्या तरुणींनी या प्रश्नाने चर्चा सुरु केली. पंचविशीतल्या त्या तरुणींचा प्रश्न ऐकून आजूबाजूच्या मध्यम वयाच्या बायकाही कुजबुजू लागल्या. खरंय, आपल्यात धमक असेल ना तरच प्रेम विवाह करावा, जरा काही झालं की आपले घटस्फोट घ्यायला जायचं, काय अर्थ आहे त्यात?, संसार म्हणजे भांड्याला भांडं लागतंच असा पुढचा डायलॉग कानी आला. मला वाटलं जाऊदे डोंबिवली येईपर्यंत या सानियाच्या चुकांवर चर्चा ऐकण्यापेक्षा इयरफोन घालून ऑडिओबुक ऐकूयात, फोन हातात घेणार इतक्यात समोरच्या एका साठीतल्या काकूंचं वाक्य ऐकलं आणि मला राहवलंच नाही, त्या म्हणाल्या “बरं झालं घेत असेल तर घटस्फोट, नाही पटत तर व्हावं वेगळं, त्यात काय?

Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?

काकूंच्या त्या ‘त्यात काय’ या प्रश्नाने मला पार गोंधळून टाकलं. मुळात हा प्रश्न जर त्या पंचविशीतल्या तरुणीने विचारला असता तर मला फार अप्रूप वाटलं नसतं पण ‘पती हा परमेश्वर’ अशा पिढीतून येणाऱ्या या बाईने इतक्या सहज घटस्फोट कसा मान्य केला. पुढे त्या आणखी काय म्हणताहेत म्हणून मी ऐकू लागले, त्या म्हणाल्या, मी आणि आमच्या यांनी लग्नाच्या पहिल्या रात्रीच एक निर्णय घेतला होता, यापुढे जेव्हा आपल्याला एकमेकांमुळे गुदमरल्यासारखं वाटेल तेव्हा आपण ब्रेक घ्यायचा, वाटल्यास एकेकट्याने फिरून यायचं, अर्थात माझं फिरणं माहेरापर्यंत आणि त्यांचं मित्रांकडे एवढंच होतं पण तरीही समोरासमोर राहून होणारा वाद टळायचा. त्यात एक अट मात्र होती, बाहेर पडल्यावर जर काही तासात, फार फार तर चार दिवसात एकमेकांची आठवण आली नाही किंवा घरी परत यावंसं वाटलं नाही तर मात्र आपलं नातं संपण्याच्या टप्प्यावर आहे हे समजून जायचं.

नात्यात जीवाची घुसमट होत असेल तर तुम्ही स्वतःवर, तुमच्या जोडीदारावर आणि अर्थात जोडून असलेल्या प्रत्येक भागीदारावर अन्याय करता. सानियाचं काय गं, मला कौतुक वाटतं तिचं, एवढी कर्तबगार आहे ती, आणि खेळाडू म्हणजे अर्थात ताण कसा हाताळायचा हे तिला कळणार नाही का? काकूंचं हे वाक्य संपतं ना संपतं तेवढ्यात त्यांच्या समोरच चौथ्या सीटवर अंग आखडून बसलेल्या ताई बोलू लागल्या, “अहो काकू ही कर्तबगारीचं नडते, जसं ‘बाई’ला जास्त समज येते ना तसं तिला कुणाशी जुळवून घेणं आवडेनासं होतं.” ऍडजस्टमेन्टच्या पुरस्कर्त्या त्या ताई सीटवरच्या सगळ्यांना “सरको ना” म्हणण्यासाठी थांबल्या, श्वास घेतला आणि पुन्हा सुरु झाल्या, राग येईल कदाचित पण जास्त शिक्षण, प्रसिद्धी, यशाची हवा डोक्यात गेली ना की आपणच कसे सगळ्यात भारी असं वाटू लागतं आणि मग मी का पडती बाजू घ्यावी असं म्हणून तोडायची भाषा केली जाते”

आता काकूंची सर्विस होती… त्या आता समोरच्या बाईचा मुद्दा हाणून पाडणार का? हे पाहण्यासाठी आम्ही बघे थांबलो, सानियाच्या टेनिस मॅचमध्ये चेंडू कोर्ट बदलतो तेव्हा प्रेक्षक ज्या चपळाईने मान फिरवतात तशा ट्रेनमधल्या बायकांच्या माना वळल्या. काकूंनी उलट त्या बाईला अनुमोदन दिलं, त्या म्हणाल्या, खरंय जेव्हा बाई शिकते, अनुभवी होते तेव्हा तिला कळू लागतं आपल्याबरोबर काय चुकीचं घडतंय, आणि हे कळल्यावर चर्चा करून उत्तर निघत नसेल तर तिथून बाहेर पडणं अधिक योग्य नाही का?

नात्याच्या धाग्यात गाठ बसली की, ती सोडवताना कधी कधी गुंता वाढत जातो, ती गाठ कापून दूर केली नाही तर धागा वाया जातो. दोन वेगळे धागे दोन वेगळ्या कापडांचा भाग होऊ शकतात मग अशावेळी हट्ट करण्याला काय अर्थ आहे. धागा वेगळा झाला तरी तो एकत्र कधीच सुंदर नव्हता असंही नाही. त्याने बनवलेलं कापड जीर्ण झालं होतं त्या फाटक्या कपड्यात स्वतःची शोभा करण्यापेक्षा किंवा थंडीने कुडकुडण्यापेक्षा त्या धाग्याने वेगळं झालेलंच बरं नाही का?

मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!

काकूंचं बोलणं ऐकून डब्ब्यात शांतता पसरली होती. ठाणे आलं, काकू ट्रेनमधून उतरायला गेल्या, त्यांचे अहो त्यांना घ्यायला प्लॅटफॉर्मवर आले होते. खरंतर एवढा वेळ मला वाटलं होतं त्यांचाही घटस्फोट झाला असेल म्हणून एवढं तळमळीने सांगतायत पण ट्रेनमधून उतरणाऱ्या काकूंना त्यांच्या अहोंनी दिलेला ‘आधार’ माझा सगळा गैरसमज पुसून गेला.

गौतमी पाटील ‘१०० टक्के’ चुकलेली नाही!

कमाल आहे नाही, स्वतःचं सगळं चांगलं सुरु असताना दुसऱ्याचं दुःख या बाईला नाटकी वाटलं नाही, कुठे असतात अशी माणसं? असं म्हणत मी ऑडिओ बुक ऐकायला इयरफोन लावले, पहिलंच वाक्य कानी पडलं, ज्ञानी माणूस तो ज्याला कुठे सुरु करायचं हे कळतं, आणि अनुभवी माणूस तोच ज्याला कुठे थांबायचं हे कळतं!

Story img Loader