Sanitary Pads Health Issues:दिल्लीस्थित एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, भारतात विकल्या जाणार्‍या लोकप्रिय सॅनिटरी नॅपकिन्समध्ये हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाशी संबंधित रसायने आढळून आली आहेत. ‘टॉक्सिक्स लिंक’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या अभ्यासात, बाजारात उपलब्ध असलेल्या एकूण दहा नमुन्यांपैकी सहा अकार्बनिक आणि चार कार्बनिक सॅनिटरी पॅडमध्ये phthalates आणि volatile organic compounds (VOCs) आढळून आले. ‘मेन्स्ट्रुअल वेस्ट 2022’ (Menstrual Waste 2022) या अहवालात हे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

सॅनिटरी पॅड्समुळे गंभीर आजार होऊ शकतात

phthalates च्या संपर्कात आल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, मधुमेहाचे विकार, विशिष्ट कर्करोग आणि प्रजनन विकार झाल्याचे नोंदवले गेले आहे. VOCs च्या संपर्कात येण्याने मेंदूमध्ये कमजोरपणा, दमा, अपंगत्व, विशिष्ट कर्करोग आणि प्रजनन प्रणालीचे कार्य बिघडण्याचा धोका वाढतो.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम
minister nitesh rane put on onion garland by the farmer
नाशिक : नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ; शेतकरी ताब्यात
BCG vaccination Mumbai, tuberculosis in Mumbai,
मुंबईत क्षयरोग प्रतिबंधात्मक प्रौढ बीसीजी लसीकरण, पहिल्याच दिवशी १ हजार ९९० नागरिकांचे लसीकरण पूर्ण
Larvae found in oranges
महिलांनो तुम्हीही बाजारातून संत्री विकत घेताय का? थांबा! ‘हा’ VIDEO पाहून संत्री घेताना आता १०० वेळा विचार कराल

अभ्यासानुसार स्वयंघोषित ‘ऑरगॅनिक’ सॅनिटरी पॅडमध्ये फॅथलेट्सचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. अभ्यासानुसार, सर्व प्रकारच्या सॅनिटरी पॅड्समध्ये DIPB, DBP, DINP, DIDP आणि इतर phthalates च्या उपस्थितीसाठी चाचणी करण्यात आली. यामध्ये केमिकलचे प्रमाण खूप जास्त असल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे पॅड वापरणाऱ्या महिलांच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचू शकते.

( हे ही वाचा: महिलांना व्हाईट डिस्चार्ज का होतो? जाणून घ्या किती दिवसापर्यंत डिस्चार्ज होणे सामान्य आहे)

अमेरिकेतही याचा खुलासा झाला आहे

२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात अमेरिकेत विकल्या जाणार्‍या पॅडमध्ये या हानिकारक रसायनांची उपस्थिती उघड झाली होती. २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात चीनमध्ये विकल्या जाणार्‍या मासिक पाळीच्या उत्पादनांबाबत असेच निष्कर्ष आढळले. या दोन अभ्यासांव्यतिरिक्त अशा अनेक अभ्यासांचाही अहवालात समावेश करण्यात आला आहे.

‘या’ प्रकारची रसायने कोठे वापरले जातात?

सॅनिटरी पॅडमध्ये आढळणारे रसायन VOC सर्वात जास्त हानिकारक आहे. वास्तविक, ही रसायने सहजपणे बाष्पीभवन होऊन वातावरणातील हवेत विरघळतात. हे रसायन मुख्यतः पेंट्स, डिओडोरंट्स, एअर फ्रेशनर, नेल पॉलिश, कीटकनाशके आणि ऑटोमोटिव्ह उत्पादनांमध्ये वापरले जाते. या रसायनांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अहवालाच्या लेखकांचे म्हणणे आहे की अशा रसायनांचा वापर सॅनिटरी पॅडमध्ये सुगंध आणण्यासाठी केला जातो.

( हे ही वाचा: Caesarean Delivery: सिझेरियन डिलिव्हरीनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येतील? तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती नक्की वाचा)

महिलांनी सॅनिटरी पॅडऐवजी काय वापरावे?

जास्त वेळ सॅनिटरी पॅड वापरल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे कॉटन क्लॉथ पॅड वापरण्याचा प्रयत्न करा. हे पॅड विंग्स असलेले आणि लीक प्रूफ आहे. आजकाल हे पॅड्स बाजारात अनेक सुंदर डिझाइन्समध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या ड्रेसनुसार हे पॅडही निवडू शकता.

‘कॉटन क्लॉथ पॅड’ कसे वापरावे

ते सामान्य पॅड्सप्रमाणेच वापरावे लागतात. असे पॅड पुन्हा वापरता येण्याजोगे असतात आणि त्यांच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे तर ते आतून कापडी आणि बाहेरून लीकप्रूफ असतात. हे पॅड तुम्ही ४ ते ६ तास वापरू शकता. हे इको-फ्रेंडली कापडी पॅड आहेत. ते सहजपणे धुतले जाऊ शकतात आणि वापरल्यानंतर पुन्हा वापरले जाऊ शकतात, धुताना चालू नळाखाली ठेवा, नंतर ब्रश न वापरता साबणाने पॅड हळूवारपणे धुवा. डाग पाहून काळजी करू नका, ते निघण्यासाठी गरम पाणी वापरा. यानंतर बॅक्टेरिया टाळण्यासाठी उन्हात सुकवा.

Story img Loader