उपवस्त्र ते प्रतिष्ठितवस्त्र – उत्क्रांतीचा भारतातील प्रवासभारतीय स्त्रीचं सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलतं ते साडीमध्ये. इथल्या संस्कृतीमध्ये साड्या नेसण्याच्या प्रकारातही खूप वैविध्य आढळतं. बहुतांश महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या साड्या आजकाल त्यासोबत परिधान केल्या जाणाऱ्या ब्लाऊजमुळे अधिक आकर्षक दिसू लागल्या आहेत.

हेही वाचा- ‘ये लडकी बहुत आगे जाएगी!’

nyaymurti mahadev govind ranade lokrang article
प्रबोधनयुगाच्या प्रवर्तकाचे विचार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Expectations have risen in the textile industry the countrys second largest business with the budget announcement
आजच्या अर्थसंकल्पाकडे वस्त्रोद्योगाचे लक्ष, निर्यात परतावा कर, जीएसटी आकारणी, कर्ज पुरवठ्याबाबत अपेक्षा
Spontaneous response to exhibition of Shiva era weapons in Karad
शिवकालीन शस्त्रे पाहताना आबालवृद्ध भारावले, कराडमधील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Bride introduction meet for those with white spots in Nagpur
पांढरे डाग असणाऱ्यांसाठी वधुवर परिचय मेळावा नागपुरात
Vitiligo , Vitiligo groom bride, white spot,
कोड, पांढरे डाग असणाऱ्यांसाठी वधुवर मेळावा
Siddhivinayak Temple News
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, तोकडे कपडे घातल्यास प्रवेश बंदी; ‘अशी’ आहे नियमावली
painting show woman in the Byzantine period
दर्शिका: बाईच्या जातीनं कसं दिसायला हवं…?

आज जेव्हा डिझायनर रोहित बाल याने डिझाइन केलेली ‘कामसूत्र चोली’, तरूण ताहिलियानीचा ‘ऑफ शोल्डर प्लेटेड ब्लाऊज’, सव्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेला ‘बिपाशा ब्लाऊज’ यांची ग्लॅमवर्ल्डमधे चर्चा होते तेव्हा लक्षात येतं की, ब्लाऊजशिवाय साडीचा विचारच केवळ अशक्य आहे. परंतु एक काळ असा होता की, साडीवर ब्लाऊज घालण्याची संकल्पना भारतीय समाजात सर्वत्र अस्तित्वातच नव्हती.

समाजातल्या कोणत्या स्तरातील महिला आहेत त्यावर स्तन झाकण्यासाठी त्या कापडीपट्ट्याचा किंवा उपवस्त्राचा वापर करतात किंवा करतच नाही, हे अवलंबून होतं. किंबहुना, ब्रिटिशराजमुळे भारतीय स्त्री आणि पुरूषांच्या पेहरावामधे यापूर्वी कधीही न पाहिले वा अनुभवलेले नाविन्य आले. गमतीचा भाग म्हणजे आज स्त्रियांच्या शब्दकोशात रूळलेले पेटीकोट, ब्लाऊज शब्द हेदेखील ब्रिटीशांचीच देणगी आहे.

हेही वाचा- सेवानिवृत्तीनंतर काय करू…

ब्रिटीशांच्या मते स्त्रीचे स्त्रीत्व झाकण्याची गोष्ट असून स्त्रियांनी स्तनाचा भाग उघडा टाकणे किंवा तो अर्धा झाकण्याला पाश्चात्य समाजामधे मागासलेपणाचे, अनैतिकतेचे लक्षण समजले जाई. ही वस्त्रं म्हणजे त्यांच्या मान्यतेनुसार देशी संस्कृतीला दिलेले आधुनिक परिमाण होते, असे निरीक्षण फॅशन डिझायनर वरूण चक्कीलम नोंदवतो. टेक्सटाइल अँड क्लोदिंग रिसर्च सेंटर, नवी दिल्ली संस्थेची संस्थापक आणि सचिव डॉ. तुलिका गुप्ता ही वरूणच्या मताशी सहमत होत म्हणते, की या देशाच्या साडी संस्कृतीसाठी पेटीकोट आणि ब्लाऊज ही परदेशी संकल्पना होती. या शब्दांचा आणि त्याअनुषंगाने त्या वस्त्रांचा परिचय इथल्या महिलांना होण्यापूर्वी त्यांचा पेहराव कसा होता, याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे. त्याची उत्तरं आपल्याला सहाव्या शतकातील संस्कृत आणि पाली साहित्यात मिळतात, असं डॉ. तुलिका सांगते. 

स्तनपट्टा वा उपवस्त्र ते ब्लाऊज या एका वस्त्राच्या उत्क्रांतीचा भारतातील इतिहास हा सहाव्या शतकापर्यंत मागे जातो, असं सांगत डॉ. तुलिका त्यातील बारकाव्यांबद्दल सांगताना म्हणते, सहाव्या शतकामधे आजच्या साडी ब्लाऊज जोडीऐवजी वस्त्र परिधान करण्याची पद्धत तीन भागांत होती. कमरेपासून खाली नेसल्या जाणाऱ्या वस्त्राला अंतरीय तर खांद्यावर किंवा डोक्यावरून घेतल्या वा पांघरल्या जाणाऱ्या वस्त्राला उत्तरीय आणि महिला स्तनांचा भाग झाकण्यासाठी वापरत त्या वस्त्राला स्तनपट्टा वा उपवस्त्र असं नाव होतं. समाजातल्या सरसकट सर्व महिला हे परिधान करीत असंही नव्हे. महिलांची आवड, प्रादेशिक प्रथा, सामाजिक स्तर किंवा जात यांवरही ते अवलंबून होतं. वेळ काळ जसजसा बदलत गेला आणि परदेशी लोकांनी आपल्या देशात पाय रोवले तसतसे त्यांच्या पेहरावाच्या कल्पनाही आपल्या संस्कृतीचा एक भाग झाल्या.     

हेही वाचा- उपयुक्त : …अशी करा बाह्यांची फॅशन!

बीबीसीच्या एका वृत्तानुसार प्रख्यात बंगाली साहित्यिक, कवी रविंद्रनाथ टागोरांची मोठी भावजय अर्थात ज्ञाननंदिनीदेवी यांनी ब्लाऊज, शेमीज्, जॅकेट्स, कोट्स यांची फॅशन तर आणलीच शिवाय पारंपारिक भारतीय साडी परिधान करण्याच्या पद्धतीतही महत्त्वाचे बदल केले. ब्रिटिशकालीन नियमांनुसार त्यांच्या क्लब्जमधे पेहरावासंदर्भात विशिष्ट संकेत पाळले जात असत. त्या चौकटीत न बसणाऱ्या देवींचा पेहराव आणि त्यांना क्लबमधे नाकारण्यात आलेला प्रवेश हे या बदलाला कारण ठरले.  

  अशाप्रकारे पारंपारिक भारतीय साडीविश्वात अस्तित्वात नसलेल्या ब्लाऊजला  महिलांच्या विनयशीलतेशी जोडले गेले, इतकेच नाही तर ते विनयशीलतेचे एक मापकही ठरले. फॅशनविश्वामध्ये अनेक कपड्यांनी दशकानुसार, नमुने तसंच नवनवीन डिझाईन्सप्रमाणे बदलांचा अनुभव घेतलेला आहे. तेव्हापासून आजपर्यंत महिलांच्या अंगाला घट्ट बसणाऱ्या कपड्याच्या या छोट्या तुकड्याचे अगणित प्रकार, ट्रेण्ड भारतीय समाजातील उच्चभ्रूंपासून ते राजकारणी, सिनेसृष्टीतल्या कलाकारांपर्यंत अनेकांनी रूढ केल्याचं दिसून येईल. पारंपारिक भारतीय चोळी, पोलक्याच्या उत्क्रांतीचा प्रवास आज स्टाईल स्टेटमेंटपर्यंत येऊन पोहोचल्याचं चक्किलम नमूद करतो.   

हेही वाचा- वजन कमी करण्यात स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक अडचणी का?

माणसाचं जगणं, राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी, पेहरावाविषयी ठाम मतं अशा अनेक गोष्टी झपाट्याने बदलत असताना कपडेविश्वातला ब्लाऊज परिवर्तनाचा भाग होणारच. शरीराचं महत्त्वाचं अंग झाकणं हा या वस्त्राचा मूळ हेतू असला तरीही जागतिक पातळीवर डिझाइन्स, फोटोज् आदींच्यादृष्टीने त्याचा वेगळा विचार करणं आवश्यक ठरतं, असं फॅशन डिझायनर अंजू मोदी सांगते. कल्की फॅशनचा संचालक निशित गुप्ता सांगतो, की ब्लाऊजेस् च्या वैविध्याची चर्चा आता व्हायला लागलेली आहे. याही क्षेत्रातला फॅशनचा नवनवीन ट्रेंड स्वीकारण्याची आपल्याला सवय लागलेली आहे. पूर्वी केवळ अंग झाकण्यापुरता उपयोगात येणाऱ्या कापडाला, वस्त्राला आता आगळं महत्त्वं आलेलं आहे, शिवाय त्याबाबतीत निरनिराळे प्रयोग करणं लोकांना आवडायला लागलेलं आहे. मोदीच्यामते या स्टाईल स्टेटमेंटला  क्रॉप टॉप, जॅकेट, कॉर्सेट (काचोळी, चोळी, उपवस्त्र) किंवा बस्टर असं काहीही नाव दिलं तरीही ते सर्व ब्लाऊजचेच प्रकार म्हणा, वैविध्य म्हणा आहेत. त्यांच्यामागील कल्पना ही एकसमानच आहे.

Story img Loader