पूजा सामंत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९७० च्या दशकात माझा हल्लीच्या बॉलिवूड आणि तेंव्हाच्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश झाला . माझा डेब्यू चित्रपट होता ‘जरुरत ‘. त्या चित्रपटाला ‘बोल्ड ‘ अशी श्रेणी मिळाली तरी त्यातील ‘बोल्ड ‘दृश्यं माझ्यावर चित्रित झाली नव्हती ! ”बॉडी डबल ‘चा उपयोग केला गेला होता ! माझ्या पुढच्या टप्प्यात कारकिर्दीने  यु टर्न घेतला ..सोज्ज्वळ तरीही ग्लॅमरस ,प्रसंगी नकारात्मक तरी मध्यवर्ती नायिका ,सह नायिका अशा अनेक महत्वपूर्ण भूमिकांनी माझ्या करियरची २० पेक्षा अधिक वर्षे मी गाजवली ,पण तरीही आरंभीच्या काळात माझं नाव ‘जरुरत गर्ल ‘असे पडले होतेच !

हेही वाचा >>> जिनिलीया, चांगली बायको व्हायला आम्ही पण दारुड्या नवऱ्याचा त्रास सहन करायचा का?

नुकताच माझा (६५ वा ) वाढदिवस मी आणि मुलीने साधेपणाने साजरा केला ..माझ्या वयक्तिक आयुष्यात माझा केंद्रबिंदू म्हणजे ‘सनम ‘माझी मुलगी ..! मेरे जीवन का सहारा ,मेरी जिंदगी का मक्सद ! मेरे लिये सब कुछ ! माझ्या ह्या वाढदिवसाला मी पुन्हा अभिनयाची नवी सुरुवात करतेय .. जणू एक नवी सुरुवात करतेय ..काही प्रोजेक्ट साइन केलेत पण त्याची अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत त्याचा उल्लेख करणं योग्य होणार नाही .. एक प्रकारे मी आता तिसऱ्यांदा ‘कम बॅक ‘करतेय .. क्रिकेटीयर मोहसीन खान याच्याशी लग्न केल्यानंतर मी अभिनयाला ‘खुदा हाफिज ‘(बाय बाय ), म्हटले आणि संसाराला लागले ‘.. लग्नानंतर ‘सनम ‘ला जन्म दिला . .एका बाबतीत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते – मोहसिनशी माझे १९८३ ला लग्न झाले ,त्याचे नातेवाईक पाकिस्तानात असले तरी आमच्या लग्नानंतर मी पाकिस्तानात स्थायिक झाले नव्हते . मी आणि मोहसीन आम्ही इंग्लंडमध्ये राहत होतो . त्या वेळेस तो काऊंटी क्रिकेट खेळत असे . . मोहसीन सोबत इंग्लंडमध्ये राहत असतानाच माझी मैत्री अभिनेत्री मुमताजशी खूप झाली .

हेही वाचा >>> मासिक पाळी… धर्म काय म्हणतो? (भाग १)

आम्ही दोघीनी खरं म्हणजे फक्त ‘नागिन ‘ह्या एकाच मल्टी स्टारर फिल्ममधे अभिनय केला ,तेंव्हा फार मैत्री करण्यास वाव मिळाला नाही ,कारण मी स्वतः त्या काळात ३ शिफ्ट्समध्ये काम करत असे ,मुमताजही बिझी होती . पण तिच्या लग्नानंतर ती इंग्लन्डमध्ये स्थायिक झाली आणि मी देखील .. त्या वेळेस आमच्यात खूप छान मैत्री झाली ..  तर असो ! मोहसिनशी माझा संसार फार काळ टिकला नाही .. .मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला .. मोहसिनकडून मला आमच्या मुळीच ताबा हवा होता जो त्याने जंग जंग पछाडूनही मला दिला नाही .. मी मुंबईत आले ,आणि पुन्हा माझ्या करियरवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला .. पण आजच्यासारखा तो काळ नव्हता ..विवाहित आणि मातृत्व म्हणजे अभिनेत्रींनी करियरला दूर ठेवावे असं मानणारा तो काळ कठोर होता खरा ! ह्या काळात माझ्या फिल्म्सना आरंभी सारखे यश मिळाले नाही .  १९७६ मध्ये ‘कालिचरण ‘फिल्मपासून माझा सुवर्णकाळ सुरु झाला . मग नागिन , आशा ,अजय ,गैर ,अर्पण ,,आशाज्योति ,नसीब ,जैसे को तैसा ,उधार का सिंदूर ,सनम ‘तेरी कसम, सौ दिन सास के , बेजुबान अशा अनेक सुपर हिट फिल्म्समध्ये मी मध्यवर्ती भूमिकेत होते .अभिनयाचा आनंद घेता येतही नव्हता ,पण दिवस रात्र कसे जात होते लक्षात येत नव्हते . दिवसाला ३ शिफ्ट्स करत होते मी ..धर्मेंद्र ,शत्रुघन सिन्हा ,जितेंद्र ,सुनील दत्त ,शशी कपूर ,संजीव कुमार  अशा सगळ्याच आघाडीच्या नायकांसह मी मुमताज ,रेखा,हेमा मालिनी,योगिता बाली ,आशा पारेख अशा अनेकींसह बरोबरीच्या -समांतर भूमिकांमध्ये होते .. शत्रुघन सिन्हा सोबत १८ ते २० फिल्म्स आणि जितेंद्रसोबत १७ फिल्म्स सुपर हिट केल्यात . शत्रुजी यांच्यासोबत माझं जवळिकीचे नाते निर्माण झाले हे खरं ,पण हे नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही ..किस्मत को नहीं मंजूर था यह रिश्ता ! जे घडलं त्याबद्दल खेद -खंत मी बाळगला नाही ,तो माझा स्वभाव नाही ..मोहसिनशी सूर जुळले नाहीत ,त्याने त्या काळात मला सनम (मुलगी ) कस्टडी दिली नाही ,त्याचं दुःख झालं पण पुन्हा करियरकडे मी वळले .

हेही वाचा >>> ‘डायन’, ‘हिटलर’… वगैरे!

शत्रुघन सिन्हासोबत अनेक फिल्म्स केल्याने मी त्या काळात हायेस्ट पेड ऐक्ट्रेस होते .. त्याचं कारण असं कि ते सेटवर नेहमी लेट येत ..त्यांच्या लेट येण्यामुळे मी देखील प्रत्येक सेटवर उशिरा पोहचू लागले .. माझ्याकडून पेंडिंग काम पूर्ण करण्यासाठी निर्मात्यांनी माझं मानधन वाढवूंन दिलं होतं ! ऋषी कपूर यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला ‘आणि शत्रू जी यांनी त्यांच्या एनीथिंग बट  ‘खामोश ‘ह्या पुस्तकात माझ्याविषयी खूप चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत .. हेमामालिनी,रेखा ,योगिता बाली सगळ्यांशी खूप प्रेमाचं -आदराचं नातं होतं . आयुष्यात कटू आठवणी मनात  ठेवता गोड़ आठवणी मनात ठेवल्या कि पुढचा प्रवास मधूर होतो ह्यावर माझा गाढ विश्वास आहे ! सनमच्या सहवासात माझा पुढचा प्रवास ‘दिलचस्प ‘होणार हे नक्की ! सनमची कस्टडी मला मिळाली आणि तेंव्हापासून मी पुन्हा करियरला रामराम ठोकला आणि तिच्या पालनपोषणात मग्न झाले . सनमने नुकतेच तिचे एम बी ए पूर्ण केलं ,वयाची पंचविशी गाठली ,तिचं हित अहित तिला समजतंय ..त्यामुळे मला तिच्या जवाबदारीतून सध्या तरी मुक्त झाल्यासारखं वाटतय ..म्हणूनच आता मी कमबॅक करतेय ! सनमचा जो सहवास मला काही वर्षे लाभला नव्हता ,तो ती माझ्या आयुष्यात आल्यांनतर मी भरभरून घेतला आणि म्हणूनच कारकिर्दीवर पुन्हा पाणी सोडले होते .. सध्याचा काळ सगळ्याच कलाकारांसाठी उत्तम आहे ,कारण वय ,लिंग ,शारीरिक ठेवण ,कौटुंबिक पार्श्वभूमी असे कुठतेही अडथळे आता येत नाहीत ..सगळ्यांना काम मिळतंय ..सनमला योग्य वाटल्यास ती माझ्याप्रमाणे अभिनयात येईलही ,नाही तर अन्य क्षेत्रात करियर करेल ..आणि स्वतःला घडवेल ..मलाही तिने स्वतःला घडवावं असं ठामपणे वाटतं..

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior actress reena roy talk about career and motherhood zws