डॉ. शिल्पा चिटणीस जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रश्न: डॉक्टर सध्या आमच्यात खूप भांडणं होत आहेत. शरीरसंबंधांसाठी माझी तयारीच नसते, इच्छाही नसते रोज. आणि नवऱ्याला मात्र त्याचीच खूप इच्छा असते. तो समजून घ्यायचा पूर्वी, पण आता तोही चिडतो. मला कळतं, पण काय करू? नाहीच होत इच्छा!

उत्तर: जोडप्यांचे लैंगिक आयुष्य लवकर संपुष्टात येण्याला स्त्रिया जरा जास्त जबाबदार आहेत हे सत्य मान्य करायलाच हवे. मात्र याबाबतीत पुरुषही काही गोष्टी करू शकतात असं वाटतं. स्त्रियांची लैंगिकता ही खूपशी त्यांच्या मनाशी बांधलेली असते. त्यामुळे स्त्रीपुरुषांमध्ये संवाद आणि जिव्हाळा नसेल तर स्त्री सेक्ससाठी फारशी उत्सुक नसते. आपल्या समाजात घरांघरांमध्ये जोडप्यांना एकांत देण्याबद्दल बिलकुल जागरुकता दिसून येत नाही. एकदा लग्न झालं, की त्यांच्यातला रोमान्स संपायला हवा, असंच वातावरण निर्माण केलं जातं. चार लोकांमध्ये पतीने पत्नीचा हात धरणं किंवा खांद्यावर हात टाकणं हे सुद्धा घरातल्या प्रौढांच्या कपाळावर आठ्या आणू शकतं. मुलं थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना वेगळं झोपवायला हवं, याबद्दलही कोणतेही जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात नाहीत. पत्नीबद्दल प्रेमाचा कोणताही उल्लेख अथवा कृती त्या पुरुषाच्या टिंगलटवाळीचा विषय होतो. अशा परिस्थितीत पतिपत्नींमधल्या प्रेमाची उरलीसुरली धुगधुगीही विझून जाते आणि अलैंगिक वैवाहिक जीवनाकडे त्यांची वाटचाल सुरू होते.

हेही वाचा… स्वयंपाकघरातले जिन्नस टिकवायचेत? मग वाचा या ५ टिप्स!

मानवी शरीराच्या मूलभूत गरजांकडे असं पूर्ण दुर्लक्ष केल्याचे परिणाम पतीपत्नींमध्ये वाढत जाणाऱ्या भांडणांमध्ये दिसायला लागतात. याचे दूरगामी परिणाम शेवटी घरातल्या सगळ्यांवरच होतात आणि घरातली शांतता,चैतन्य हरवून बसतं. त्यामुळे लग्नानंतरही जोडप्यांना त्यांच्या स्वतःसाठी वेगळा थोडा मोकळा वेळ मिळेल हे बघणं घरातल्या ज्येष्ठांचं कर्तव्य आहे.

आणि हो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा वेळ ज्येष्ठ जोडप्यांनाही मिळायला हवा. वैवाहिक संबंध ठराविक वयापर्यंतच असावेत असा कोणताही नियम नाही. वर नमूद केल्याप्रमाणे जितकी जास्त वर्षे लैंगिक जीवन चालू राहील तितकं ते आरोग्यासाठी उत्तम! त्यामुळे जरा वय वाढलं, की ज्येष्ठ जोडप्यांचं कामजीवन संपलं असं अजिबात नाही. कधी कधी कुटुंबातले इतरच लोक हा निर्णय घेऊन त्यांच्या झोपण्याच्या व्यवस्थाही बदलून टाकतात. कोणत्याही मनुष्यप्राण्याला दुसरा मानवी स्पर्श ही खूप आवश्यक गोष्ट असते. लैंगिक जीवन संपुष्टात आलं तरी एकमेकांचा स्पर्श आणि सहवास ज्येष्ठांसाठी खूप आश्वासक आणि सकारात्मकता देणारा असतो. त्यामुळे ज्येष्ठांनाही प्रायव्हसीची गरज असते हे लक्षात घ्यायला हवं.

हेही वाचा… गच्चीवरची बाग : तण व्यवस्थापन

स्त्रीपुरुषांनी त्यांचे वैवाहिक जीवन तजेलदार ठेवण्यासाठी एकमेकांना वेळ देणं, मधून मधून दोघांनीच बाहेर फिरायला जाणं आवश्यक आहे तसेच स्वतःला आकर्षक ठेवणं हेही अतिशय महत्त्वाचे आहे. एकदा लग्न झालं, की ‘आता हा किंवा ही कुठे जाणार आहे? मग कशाला चांगलं दिसायचा प्रयत्न करा?’ ही वृत्ती वैवाहिक जीवनासाठी मारक आहे. नियमित व्यायाम करून शरीर शक्य बांधेसूद ठेवणं हे निरोगी आयुष्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढंच पतीपत्नींच्या कामजीवनासाठीही अतिशय आवश्यक आहे.

तसंच स्वत:चं आरोग्य जपणं हासुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. व्यायामाचा अभाव, खाण्यावर संयम नसणं यामुळे वाढलेले अवास्तव वजन मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यांना आमंत्रण देतं. या आजारांमुळे व्यक्तीची कामेच्छा खूपच कमी होऊ शकते तसेच सेक्स करण्याची शरीराची क्षमता ही कमी होऊ शकते.

बऱ्याच वेळा पुरुषांमध्ये लिंग ताठरतेच्या समस्या(erectile dysfunction) निर्माण होतात, पण त्या स्वीकारून त्याबद्दल उपचार घ्यायला पुरुष टाळाटाळ करत राहतात. अशावेळी त्यांच्या पत्नीचा कोंडमारा होत राहतो. त्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

हेही वाचा… Success Story : पत्रकार ते आयपीएस अधिकारी; जाणून घ्या ‘सिंघम लेडी’चा प्रवास…

कोणताही मंद सुवास आपल्या चित्तवृत्ती फुलवून टाकतो तसंच योग्य मापाचे कपडे घालण्याने नीटनेटकेपणा येतो. ढगळ कपडे कोणालाच चांगले दिसत नाहीत. आपले व्यक्तीमत्व खुलवण्यासाठी आवश्यक चांगले कपडे, योग्य केशरचना, सुगंधी द्रव्य आणि मुखशुध्दी यांचा नियमित वापर हे करणं एवढं अवघड नक्कीच नाही ना? लैंगिक आयुष्य वाढवण्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे. आयुष्य किती रटाळ आणि निरस आहे असं स्वतःला आणि सगळ्यांना सतत सांगण्यापेक्षा खरं तर खूप सोपं आहे आपलं आयुष्य बदलणं. अधिक आनंदी करणं.

सुरवातीला उल्लेख केलेल्या रुग्णाच्या शारीरिक व्याधी या मानसिक कारणांमुळेच होत्या हे वेगळं सांगायची गरज नाही. वरील उपायांनी थोड्याच दिवसात त्यांची गाडी रुळावर आली. मग तुमची गाडी कधी टाकताय सर्व्हिसींगला?

shilpachitnisjoshi@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sex relationship and family life of husband and wife dvr
Show comments