प्रश्न – मी एकदा माझ्या अभ्यासाच्या पुस्तकात इडिपस कॉम्प्लेक्स (Oedipus complex), इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स (Electra complex) बद्दल वाचले. त्यानंतर मी याबद्दल माहिती मिळवण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु समाधानकारक माहिती मिळाली नाही. आपण सांगू शकाल का?

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : लग्नानंतर वर्षभर मूल होऊ देणं टाळायचं असल्यास काय करावं?

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता
The Nagpur Bench of Bombay High Court ruled on girls entitlement to maintenance
अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगी मिळू शकते? न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय….

उत्तर – इडिपस कॉम्प्लेक्स, इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स या दोन्ही संकल्पना सिग्मन्ड फ्रॉइडच्या मानसशास्त्रीय अभ्यासातून आलेल्या आहेत. त्या आता ‘आऊटडेटेड’ मानल्या जातात. शास्त्रीयदृष्ट्याही त्याला आता फारसे महत्त्व दिले जात नाही. एखादा मुलगा आईबरोबर अति ॲटॅच्ड असेल तर अनेकदा त्याला ‘इडिपस कॉम्प्लेक्स’ म्हटलं जातं; पण ते बरोबर नाही. लहान मुलाला वाढीच्या वयात आईबद्दल लैंगिक आकर्षण वाटणं आणि ते इतकं वाढत जाणं की त्याला आईबरोबर सेक्स करावासा वाटणं, ते मला नेहमीच जरा अति वाटत आलं आहे. कारण मी आत्तापर्यंत वाढीच्या वयाच्या असंख्य मुलांना भेटलो आहे. त्यांना आईबद्दल आकर्षण वाटतं, पण या थराला वा टोकाला ते कधीच जात नाही आणि समजा, असा काही विचार आलाच तरी तो पटकन मनातून काढून टाकला जातो, अपराधी भाव लगेच त्याच्या मनात येतो आणि हे भारतीयच नाही तर अगदी परदेशातल्या मुलांच्या बाबतीतही आहे. मात्र या ‘कॉम्प्लेक्स’मध्ये फक्त आईबद्दल शारीरिक आकर्षण इतकंच ते मर्यादित नसतं तर त्यामुळे वडिलांविषयी घृणा निर्माण होते. या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्रित येतात, त्याला ‘इडिपस कॉम्प्लेक्स’ म्हटलं जातं. नुसतं आईविषयी आकर्षण असणं म्हणजे कॉम्प्लेक्स नाही.

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन – लग्नाआधी आणि बदलत्या पार्टनर्सबरोबर सेक्स नकोच

आईवर प्रेम असतंच, ते असलंच पाहिजे; परंतु आईवरच्या प्रेमामुळे वडिलांविषयी घृणा निर्माण होणं हा ‘कॉम्प्लेक्स’ आहे. फ्रॉईड सगळ्याच गोष्टीचा परिणाम सेक्सशी जोडायचा किंवा सेक्सपर्यंत आणून ठेवायचा. त्याच्या म्हणण्यानुसार आईविषयी अगम्य लैंगिक आकर्षण वाटू शकतं. ते असेलही कदाचित. कारण सिग्मन्ड फ्रॉईडचा अभ्यास जगभरात मानला जातो. त्याविषयी शंका काढायचा इथे उद्देश नाही; परंतु त्याच्या काळात मनाच्या संदर्भात, मनाविषयी जे संशोधन झालं तेव्हापासूनच या किंवा अशा अभ्यासाला सुरुवात झाली. आज काऊंन्सेलिंग वा सायको ॲनालिसिस ही जी क्षेत्रे विकसित झाली आहेत, त्यांचं जनक म्हणून आम्ही सिग्मन्ड फ्रॉईडला मानतो; परंतु म्हणून तो जे बोलून, लिहून गेला ते तसंचच्या तसं आज स्वीकारलं पाहिजे, असं अजिबात नाही, उलट त्याची जी सायकोॲनालिसिसची पद्धत आहे ती आज पूर्णता आऊटडेटेड आहे. आता अद्ययावत संशोधन आलं आहे.

आणखी वाचा : World Mental Health Day 2022: जास्त त्रास कोण भोगतं ? घर सांभाळणारी महिला की कामावर जाणारी?

मुलाची आईशी असणारी ॲटॅचमेंट सर्वश्रुत वा सर्वमान्यच आहे. प्रेम, जवळीक, ममत्व असणं वेगळं आणि शारीरिक आकर्षण असणं वेगळं. त्यातही आईविषयी शारीरिक आकर्षण आणि वडिलांबद्दल घृणा असेल तरच तो इडिपस कॉम्प्लेक्स, अन्यथा नाही आणि हे घडणं अगदीच विरळा. याच्या उलट ज्याला आईचं प्रेम योग्य वयात आणि पुरेसं मिळालं असेल तो चांगला नवराही होतो असा अनेकांचा अनुभव आहे. ती त्यांच्या आयुष्यातली पहिली स्त्री असते त्यामुळे साहजिकच मुलगे आईची खूप काळजी घेतात, तिला जपतात. तिची सुखदु:खं त्यांना कळतात. हेच तो मोठा झाल्यावर आपल्या मैत्रिणींच्या बाबतीत, पुढे बायकोच्या बाबतीत अनुभवतो. त्यामुळे आईशी जास्त जवळीक असलेला पुरुष चांगला माणूस होतो, असा सार्वत्रिक अनुभव आहे.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे – परस्त्रीचं आकर्षण ?

‘इडिपस कॉम्प्लेक्स’च्या बरोबर उलट ‘इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स’. यात मुलीला वडिलांबद्दल शारीरिक आकर्षण असतं आणि आईबद्दल घृणा. वडिलांबद्दल अगम्य पद्धतीचं लैंगिक आकर्षण वाटणं आणि त्यामुळे आईचा मत्सर वाटणं, हे या ‘कॉम्प्लेक्स’मध्ये मोडतं. इथे पुन्हा शारीरिक आकर्षण ही खूप टोकाची गोष्ट आहे. मुलींना आपले वडील आवडतात. आणि लहानपणापासून ती वडिलांना हिरो म्हणूनच पाहात असेल तर तिला वडिलांविषयी सुप्त आकर्षण वाटू शकतं. अनेक पुरुष चाळिशी-पन्नाशीपर्यंत चांगलेच हॅण्डसम असतात. शरीराने वेल मेन्टेन्ड, स्मार्ट असू शकतात. नाव, पैसा कमावलेले हे ‘ग्रे हेअर्ड मॅन’ आकर्षक दिसू शकतात आणि अशा मुली वडिलांबद्दल सॉफ्ट कॉर्नर ठेवून असतात. अशा वेळी जर त्यांनी आईवडिलांना रोमँटिक नात्यात पाहिलं, तर तिला आईविषयी राग येणं, घडू शकतं; परंतु मी त्या प्रेमाला शारीरिक आकर्षण म्हणू शकत नाही. ते प्रेमच असतं, असं म्हणू ते जरा जास्त पझेसिव्ह असू शकतं. अशा मुली असतात; पण म्हणून टोकाचं शारीरिक आकर्षण त्यांच्यात नसतं.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा लैंगिक गैरसमज अधिक!

हे जरी मान्य केलं तर या जगात अनेक विकृत गोष्टीही घडत असतात. त्या अजिबात होत नाहीत, असं मी म्हणणार नाही; परंतु त्या मर्यादित आणि ‘कॉम्प्लेक्स’ म्हणूनच येतात. त्याचं सार्वत्रिकीकरण नाही करता येणार.

तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा.
लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.

Story img Loader