अ‍ॅड. तन्मय केतकर

नवीन भारतीय न्याय संहितेत महिलांच्या संदर्भात होणार्‍या लैंगिक गुन्ह्यांबाबत अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्याच तरतुदींपैकी एक तरतुद म्हणजे, लग्नाचे खोटे आश्वासन देवून महिलेशी शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा ठरणे आणि त्याकरता दंड आणि दहा वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा असणे. या कलमांतर्गत फसवणुकीत नोकरीचे खोटे आश्वासन, बढतीचे खोटे आश्वासन, लग्नाचे खोटे आश्वासन किंवा प्रलोभन यांचा सामावेश करण्यात आलेला आहे.

man raped minor girl under railway bridge in nagpur
धक्कादायक! रेल्वे पुलाखाली अल्पवयीन मुलीवर करायचा लैंगिक अत्याचार…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Supreme Court Verdict on Madrasa Education Act
UP Madarsa Act: मदरसा शिक्षण मंडळ कायदा घटनात्मक; सर्वोच्च न्यायालयाचा योगी आदित्यनाथ सरकारला झटका, उच्च न्यायालयाचा निकाल फेटाळला
Gujarat diamond factory manager dies during rape bid of 14-yr-old girl
Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना ४१ वर्षीय माणसाचा मुंबईत मृत्यू, पीडितेला करत होता ब्लॅकमेल
I have Been Framed Said Sanjay Roy
Kolkata Rape and Murder : “मला अडकवलं जातं आहे, कारण..” ; आर.जी. कर बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी संजय रॉय काय म्हणाला?
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
man murdered colleague over dispute on food cooking
जेवण बनवण्यावरून वाद; लोखंडी रॉडनी ११ घाव घालून केली हत्या, पिंपरीतील घटना
wife cuts husbands private parts
दारूच्या नशेत पतीचं पत्नीशी भांडण, संतापलेल्या पत्नीनं पतीच्या गुप्तांगावर…

हेही वाचा >>> नातेसंबंध – ‘लाईट , अडवान्स, हार्ड सिगारेट?

सद्यस्थितीत भारतातील सर्वात महत्त्वाचा फौजदारी कायदा म्हणजे भारतीय दंड संहिता- जो सन १८६२ मध्ये इंग्रज सरकारने लागू केला होता. कायदा हा समाजाकरता असल्याने कालांतराने कायद्यात सुसंगत बदल होणे गरजेचे असते. विशेषत: फौजदारी कायद्यात तरतुदी जेवढ्या सुस्पष्ट असतील, तेवढ्या त्यात पळवाटा कमी होतात आणि गुन्हेगारांस शासन होण्याची शक्यता वाढते. जुन्या भारतीय दंड संहितेत काही बाबतीत अशा सुस्पष्ट तरतुदी नव्हत्या. उदा. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेशी शरीरसंबंध ठेवल्यास तो बलात्कार ठरेल किंवा शिक्षा होईल अशी सुस्पष्ट तरतूद नव्हती. फसवणुकीने का असेना परंतु परस्पर सहमतीने निर्माण झालेल्या शरीरसंबंधांचा बलात्काराच्या कायदेशीर व्याख्येत सामावेश करणे काही प्रकरणांत अडचणीचे होते, आणि असे शरीरसंबंध बलात्कार सिद्ध न झाल्यास त्या आरोपीला शिक्षा होण्याची शक्यता आपोआपच धूसर होत होती. सहजिकच या बाबतीत सध्याच्या कायद्यात काहिशी कमतरता आहे.

हेही वाचा >>> Independence day special: इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या तीन भारतीय रणरागिणी कोण?, माहीत आहे का?

नवीन कायद्याने ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. संसदेत नवीन भारतीय न्याय संहितेचा मसुदा प्रस्तावीत करण्यात आलेला आहे. नवीन मसुदा मंजूर झाल्यावर जुना भारतीय दंड संहिता कायदा रद्दबातल होईल आणि त्याजागी भारतीय न्याय संहिता लागू होईल. नवीन भारतीय न्याय संहितेत महिलांच्या संदर्भात होणार्‍या लैंगिक गुन्ह्यांबाबत अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्याच तरतुदींपैकी एक तरतूद म्हणजे- लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेशी शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा ठरणे आणि त्याकरता दंड आणि दहा वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा असणे. नवीन संहिता कलम ६९ मध्ये या संदर्भात सवीस्तर आणि सुस्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. या तरतुदीनुसार फसवणुकीने किंवा लग्नाचे खोटे आश्वासन देऊन कोणीही महिलेशी शरीरसंबंध ठेवल्यास, आणि असे शरीरसंबंध बलात्काराचा गुन्हा ठरत नसल्यास, अशा व्यक्तीस दंड आणि दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकेल. या कलमांतर्गत फसवणुकीत नोकरीचे खोटे आश्वासन, बढतीचे खोटे आश्वासन, लग्नाचे खोटे आश्वासन किंवा प्रलोभन यांचा सामावेश करण्यात आलेला आहे.

या नवीन तरतुदीने कायद्याच्या चौकटीत बलात्कार न ठरणार्‍या परंतु फसवणुकीने केलेल्या शरीरसंबंधांना गुन्हा ठरविण्यात आले आहे. साहजिकच फसवणुकीने का असेना, परंतु परस्पर सहमतीने शरीरसंबंध निर्माण केल्यास त्यांस बलात्कार ठरवण्यात अडचणी येत असल्याने ज्या आरोपींची सुटका होत होती, तसे आता होणार नाही अशी एक आशा आहे.

tanmayketkar@gmail.com