डॉ. राजन भोसले

प्रश्न – डॉक्टर नमस्कार, माझा मुलगा २५ वर्षांचा आहे. त्याने स्त्रियांची अंतर्वस्त्रे घालून स्वतःचे काही फोटो काढलेले मी त्याच्या मोबाइलमध्ये पाहिले आहेत. त्याला विश्वासात घेऊन विचारले असता तो म्हणाला, मला मुलींसारखे कपडे घालायला आवडतात. असे तो गेली १०-१२ वर्षांपासून करतो आहे. तो एका मुलीच्या प्रेमात गेल्या ६ वर्षांपासून होता. ८ महिन्यांपूर्वी त्या दोघांचा ब्रेकअप झाला आहे. कृपया सल्ला द्या.

Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
priti karmarkar
स्त्रीप्रश्नांविषयी आग्रही आणि संवेदनशीलही!
India’s culture encourages diversity in practice and thought.
चलनी नोटा, वस्त्राचा तुकडा आणि भारतीय थाळी विविधतेत एकतेचं प्रतीक कसं ठरतात?

उत्तर – तुमच्या मुलाच्या बाबतीत जे घडतंय त्याला पॅराफिलिया असे म्हणतात. तो ६ वर्षं एका मुलीच्या प्रेमात होता असं तुम्ही म्हटलंय याचा अर्थ तो ट्रान्स जेन्डर नसून तो ट्रान्स वेस्टायटिझम (Transvestitism disorder) अर्थात विलिंगवेश कामुकता याचा हा प्रकार आहे.

आणखी वाचा : लैंगिक समस्या आणि व्हायग्रा

सेक्सॉलॉजीमधली ही मोठी कॅटॅगरी आहे. ज्याला आम्ही फेटिशिझम (fetishism) किंवा पॅराफिलिया (paraphilia) असंही म्हणतो. यात एखाद्या व्यक्तीला सामान्य स्त्री-पुरुषांच्या आकर्षणापेक्षा वेगळं लैंगिक आकर्षण असतं जसं अंतर्वस्त्रांबद्दल असेल किंवा भिन्नलिंगी व्यक्तीच्या एखाद्या विशिष्ट अवयवाबद्दल असेल. जो भाग कन्व्हेन्शली लैंगिक आकर्षणासाठी ओळखला जातही नसेल. उदा. पायाची बोटं. अशा पुरुषांना त्यांच्या समोर असलेली स्त्री कितीही सुंदर, आकर्षक असली तरी तिच्या इतर कोणत्याही अवयवाचं आकर्षण वाटत नाही तर फक्त तिच्या पायाच्या बोटांकडे पाहून त्यांच्या लैंगिक भावना उत्तेजित होऊ शकतात. याला Foot fetish असंही म्हटलं जातं. तर काहींना स्त्रियांच्या काखेचे आकर्षण असतं. त्यांचं हे आकर्षण इतकं असतं की नॉर्मल सेक्स करत असतानासुद्धा त्यांना त्या भागाविषयीच जास्त आकर्षण वाटतं, जे बाईला विचित्र वाटू शकतं. आणि तिने त्यावर प्रश्न केल्यास त्याचं समाधानकारक उत्तर ते देऊ शकत नाहीत. असं वाटणारी व्यक्ती कुणीही असू शकते.

अगदी उच्चविद्याविभूषित लोकंही त्यात असतात. त्याचं उत्तर शोधण्यासाठी ते आमच्याकडे येतात. हे आकर्षण माझ्यात कशामुळे निर्माण झालं मला कळत नाही. त्यामुळे मी एकटा राहतो किंवा लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही सांगणारे भेटतात. कारण त्यांच्या मते, नॉर्मल सेक्सची अपेक्षा कोणी माझ्याकडून केली तर मला ते शक्य नाही. मला त्याने उत्तेजना येतच नाही. याच्यात दोन प्रकार आहेत. एक inclusive आणि दुसरा exclusive.

आणखी वाचा : लैंगिक समस्या-प्रश्नोत्तरे : छोटे स्तन माझ्या वैवाहिक संबंधांवर परिणाम करतील का?

जे नॉर्मल सेक्स करूनही फेटिश असू शकतात. तर काहींना फक्त भिन्नलिंगी व्यक्तीच्या विशिष्ट भागांचच आकर्षण असतं. तर काहींना तिच्या अवयवांपेक्षा इतर गोष्टींचं उदाहरणार्थ, तिच्या अंतर्वस्त्रांचं आकर्षण असतं. ती वस्त्र ते कुठूनही मिळवतात, अगदी चोरूनही. त्याचा साठा करून ठेवतात. पण त्याहीपेक्षा वेगळा वर्ग म्हणजे भिन्नलिंगी व्यक्तींचे कपडे घालणं. यांना बाह्य कपडेही घालायला आवडतात परंतु लोक काय म्हणतील म्हणून अनेकदा ते अंतर्वस्त्रेच घालतात. याचा अर्थ ती व्यक्ती पूर्णपणे ॲबनॉर्मल आहे असं नव्हे.

अशा व्यक्तीला जर त्याच्या या वागण्याची जाणीव असेल आणि यातून बाहेर येण्याची तयारी असेल तर त्या व्यक्तीला मदत करता येऊ शकते. म्हणजे त्याचं जे हे आकर्षण आहे ते बाजूला ठेवून त्याचे शारीरिक संबंध नॉर्मल कसे ठेवता येईल यावर काम करता येऊ शकेल. आणि ती व्यक्ती नॉर्मल आयुष्य जगू शकते.

तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा

लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर.

सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.

Story img Loader