अनेक स्त्रियामधे ‘आपले स्तन लहान आहेत’ असा न्यूनगंड असतो. त्याचा त्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रत्येकाची शरीरयष्टी अनेक कारणांमुळे वेगवेगळी असू शकते. आता स्तनांचा आकार वाढवणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया (Plastic surgery) केल्या जातात. त्यामुळे स्तन मोठे दिसू लागतात. अशी शस्त्रक्रिया महाग तर असतेच, पण तिचे अनेक दुष्परिणामही स्त्रीला सोसावे लागू शकतात.
आणखी वाचा : नातेसंबंध : विवाहबाह्य आकर्षण वाटतंय?
प्रश्न : स्तन लहान असल्यास ते मोठे करता येतील अशी औषधं, गोळ्या, मलमं किंवा इंजेक्शन्स उपलब्ध आहेत का? काही स्त्रियांचे स्तन मोठे असतात, तर काहींचे लहान. असं का होतं? स्तनांचा आकार शस्त्रक्रिया करून वाढवता येतो, असं मी वाचलं आहे. ते करणं योग्य ठरतं का? अशा शस्त्रक्रियेबद्दल थोडी माहिती द्यावी.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : मुलींना वडिलांबद्दल आकर्षण वाटणारा ‘इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स’?
आणखी वाचा : उत्तर: स्तनाचा आकार लहान किंवा मोठा असणं हे बऱ्याच अंशी वंशपरंपरागत (hereditary) असू शकतं. स्तनांचा आकार लहान किंवा मोठा कसाही असला तरी जेव्हा एखादी स्त्री आई होते त्यावेळी तिच्या स्तनात निर्माण होणारं दूध बाळासाठी पुरेसं असतं. अगदी लहान स्तन असले तरी अगदी जुळ्या मुलांना पुरेल इतकं दूध त्या मातेच्या स्तनामध्ये निर्माण होतं. स्तनांच्या आकारावरून त्यात दूध किती निर्माण होईल हे अवलंबून नसतं. प्राथमिकरित्या स्तन हे मातेला आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठीच निसर्गाने निर्माण केलेले आहेत. त्यामुळे त्याचा आकार कसा आहे हा विचार फक्त सौंदर्य या संकल्पनेतूनच पुढे आला आहे.
आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन – लग्नाआधी आणि बदलत्या पार्टनर्सबरोबर सेक्स नकोच
स्तन मोठे करता येतील अशी औषधं, गोळ्या, मलमं किंवा इंजेक्शन्स उपलब्ध नाहीत. विशिष्ट आहार घेऊनही स्तन मोठे करता येत नाहीत. स्तनांच्या खाली असलेल्या पेक्टोरल स्नायूंचा विशिष्ट व्यायाम केल्यास मात्र स्तन मोठे दिसण्यास त्याची मदत होऊ शकते. अनेक स्त्रियामधे उगीचच ‘आपले स्तन लहान आहेत’ असा न्यूनगंड असतो. त्याचा त्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे विचार न करणेच उत्तम. प्रत्येकाची शरीरयष्टी ही अनेक कारणांमुळे वेगवेगळी असू शकते.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे – परस्त्रीचं आकर्षण ?
आपले स्तन मोठे व आकर्षक दिसावेत या इच्छेपोटी अनेक स्त्रिया खास तयार केलेल्या ब्रेसियर्स तर वापरतातच, पण पूर्वी पाश्चिमात्य देशांमधे आणि आता आपल्याही देशातही स्तनांचा आकार वाढवणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया (Plastic surgery) केल्या जातात. या शस्त्रक्रियांद्वारे स्तनांमधे विशिष्ट आकाराच्या सिलिकॉनच्या पिशव्या (Silicon Implants) बसवल्या जातात. या सिलिकॉनच्या पिशव्यांमुळे स्तन मोठे दिसू लागतात. अशी शस्त्रक्रिया (mammoplasty) महाग असते, अनेक जणी आजकाल त्याचा वापर करत आहेत. पण काहीवेळा याचे दुष्परिणामही स्त्रीला सोसावे लागू शकतात. अशी शस्त्रक्रिया करून घेतल्यामुळे स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
तेव्हा आपल्या शरीराचा स्वीकार हा आनंदी जीवनाचा उत्तम मार्ग आहे.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे – लैंगिक दुर्बलतेचा मधुमेहाशी संबंध आहे ?
प्रश्न विचारा बेधडक!
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.