प्रश्न : पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर- व्हायग्रा उपयोगी पडते असं मी ऐकलं आहे. हे खरं आहे का? ती घेतल्याने नपुंसक लिंगही ताठ होऊ लागतं असं मी वाचलं आहे, हे खरं की खोटं याबद्दल माहिती द्यावी.

उत्तर : पुरुषांमध्ये दिसणाऱ्या लैंगिक समस्या साधारणपणे चार प्रकारच्या असतात. १) लैंगिक इच्छा नसणं किंवा खूप कमी असणं. २) शिश्नामध्ये ताठरता न येणं ( नपुंसकता). ३) शिश्नामध्ये ताठरता येत असली तरी ती समाधानपूर्वक समागम होईपर्यंत न टिकणं. आणि ४) शीघ्रपतन

Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
L&T , Subramaniam, 90 Hours Work , Work Hours ,
स्त्रीद्वेष्टेपणा की कर्मचाऱ्यांच्या शोषणाची पूर्वतयारी? 
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
gang-rape_
Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!

हस्तमैथुन, स्वप्नामध्ये होणारं वीर्यस्खलन या लैंगिक समस्याच नव्हेत. सर्व पुरुषांमध्ये कधी ना कधी घडणाऱ्या या नॉर्मल घटना आहेत. यांचा या गोळ्यांशी काहीही संबंध नाही. वर नमूद केलेल्या चार लैंगिक समस्यांपैकी केवळ तीन क्रमांकाच्या समस्येवर उत्तेजना देणाऱ्या वायग्राचा उपयोग होतो. एखाद्या व्यक्तीमध्ये लैंगिक इच्छाच निर्माण होत नसेल तर त्यावर या गोळीचा काहीही उपयोग होत नाही. लैंगिक इच्छा कमी असण्याची कारणं बहुतांशी वेळा मानसिक स्वरुपाची असतात. मनामध्ये चिंता, दु:ख, वैफल्य, व्यस्तता, भीती, संशय असे भाव असतील; तर लैंगिक इच्छा कमी होते. अशा व्यक्तीला या गोळीचा काहीही परिणाम होत नाही.

आणखी वाचा : लैंगिक समस्या-प्रश्नोत्तरे : छोटे स्तन माझ्या वैवाहिक संबंधांवर परिणाम करतील का?

शिश्नामध्ये ताठरता आणण्याच्या क्रियेतही या गोळीचा काहीही उपयोग नसतो. ज्या पुरुषांमध्ये शिश्न ताठ न होण्याची म्हणजेच नपुंसकतेची तक्रार असते त्यांनी ती गोळी घेऊनही त्याचा काही उपयोग होत नाही.

या गोळीबाबत असलेल्या अनेक गैरसमजांपैकी सर्वात मोठा हाच गैरसमज आहे की, ‘गोळीने शिश्न ताठ होतं’, या गैरसमजापोटीच अमेरिकेत असंख्य लोकांनी त्याचा वापर सुरु केला, पण लवकरच त्यांची निराशा झाली व अनेकांनी त्याचे दुष्परिणाम सोसावे लागले.

ज्याचं शिश्न स्वत:हून ताठ होतं; पण केवळ समाधानपूर्वक समागम होईपर्यंत ताठ राहू शकत नाही, केवळ त्यांच्यासाठी या गोळीचा उपयोग होऊ शकतो. ‘शिश्नातली ताठरता अधिक काळ टिकवणं,’ केवळ एवढंच काम ती गोळी करते. केवळ बाजारात उपलब्ध आहे म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:हून मनाने ही गोळी घेणे कटाक्षाने टाळावं. असं करणं धोकादायक ठरू शकतं.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : लग्नाआधी शरीरसंबंध?

तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.

(लेखक एम.डी. असून लैंगिक विज्ञानतज्ज्ञ आहेत)

Story img Loader