प्रश्न : IUCD म्हणजे काय? IUCD आणि तांबी (Copper T) हे वेगवेगळे प्रकार आहेत का? तांबीचा वापर कुणी कसा करायचा? तांबीचे काही दुष्परिणाम आहेत का?

उत्तर : IUCD (IntraUterine Contraceptive Devices) म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयामध्ये बसवली जाणारी गर्भप्रतिबंधक साधन. तांबी (Copper T) हे या प्रकारच्या साधनांपैकी एक प्रचलित नाव. तांबी ही इंग्रजी T च्या आकारांची पॉलिथिनची एक लहानशी वस्तू. तिच्या उभ्या दांडीवर अतिशय सूक्ष्म अशी तांब्याची तार गुंडाळलेली असते. तांबी सहजपणे व चटकन बसवून घेता येते. त्यासाठी भूल देण्याची किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज नसते. तज्ज्ञ डॉक्टर स्वत:च्या दवाखान्यात दोन मिनिटांत ती बसवू शकतात.

Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
After soybeans price of cotton become big issue for farmers in Vidarbha
विदर्भात कापसाचे अर्थकारण विस्‍कळीत

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : शाळकरी मुलाला स्तनांचं आकर्षण आहे, काय करावं?

गर्भशयाच्या पोकळीत बसवलेल्या तांबीमुळे फलित बीज गर्भाशयाच्या पिशवीत रुजू शकत नाही व गर्भधारणेला प्रतिबंध होतो. तांबी पाळी येऊन जाताच बसवून घेणं योग्य. तांबी बसवल्यानंतर दोन – तीन महिने मासिक पाळीचा स्त्राव थोडा जास्त होतो व पाळीच्या वेळेस ओटीपोटात दुखू शकतं; पण या किरकोळ तक्रारी तीन एक महिन्यात कमी होतात. तांबी तीन वर्षांपर्यंत गर्भशयात ठेवता येऊ शकते. तीन वर्षांनी मात्र ती बदलणं योग्य. अलीकडे पाच व आठ वर्ष गर्भाशयात ठेवता येतील अशी काही साधनं उपलब्ध झाली आहेत. तांबी हा प्रकार पहिलं मूल होण्याआधी बसवून घेऊ नये. पहिलं मूल झाल्यानंतर मात्र तांबीएवढं उत्तम व लोकप्रिय साधन नाही. प्रसूतीनंतर साधारण दीड महिन्यानंतर तांबी बसवता येते.

Story img Loader