प्रश्न : माझं लग्न होऊन वर्ष झालं आहे. माझे मोठे दीर अविवाहित असून समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांपैकी आहेत. त्यांचा एक मित्र अनेकदा घरी येतो. दोघे एकमेकांबरोबर बंद खोलीत खूप वेळ घालवतात. मला या प्रकाराची ‘किळस’ वाटते. घरात सर्वांना माहीत असूनही याची फारशी चर्चा कोणी करत नाही. माझं मन मात्र विचित्र विचारांनी ग्रासलं जातं. दिरांशी माझे संबंध कसे असावेत? याबाबत मी विचित्र गोंधळात आहे. काय करावं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उत्तर : तुमच्या मोठ्या दिरांशी तुमचे संबंध सामान्य व व्यावहारिक जबाबदाऱ्या सांभाळणारे असे असावेत. दीर-भावजय म्हणून तुमचा जेवढा संबंध येतो त्यात तुम्ही विचलित होण्यासारखं काहीच नाही. तुमचे दीर समलिंगी आहेत हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वैयक्तिक, खाजगी असा भाग आहे. ते तसे का आहेत, यापाठचा मनोचिकित्सक इतिहास तुम्हाला माहीत असणं व कळणं दोन्ही अशक्य गोष्टी आहेत. त्याची कारणमीमांसा करत राहणं तुमच्याकडून अपेक्षितही नाही व त्याची गरजही नाही. समलिंगी संबंध ठेवणाऱ्या लोकांबद्दल काही गोष्टी मात्र समजून घेण्यासारख्या आहेत.

आणखी वाचा : थंडीमध्ये केसांची घ्या, अशी काळजी…

समलिंगी संबंध ठेवणाऱ्या व्यक्ती जीवनाच्या बाकीच्या अंगामधे इतरांसारख्या सर्वसामान्य असतात. त्याचे आविर्भाव व शरीररचना यात बाह्यांगी कसलाही वेगळेपणा नसतो. अनेकदा अशा व्यक्ती आपापल्या क्षेत्रात यशस्वी, बुद्धीने हुशार, विचारी व अगदी प्रेमळही असू शकतात. व्यक्तीचं मूल्यमापन केवळ त्याच्या समलिंगी अथवा विभिन्नलिंगी (Heterosexual) असण्यावरून करता येत नाही व ते योग्यही नाही. समलिंगी व्यक्ती जीवनाच्या इतर बाबींमधे अत्यंत समतोल अशी असू शकते व विभिन्नलिंगी व्यक्तीमधेही लैंगिक अथवा इतर प्रकारच्या अनेक विकृती असू शकतात.
व्यक्ती समलिंगी असण्यात त्या व्यक्तीचा स्वतःचा दोष कितपत असतो याचा फारसा कोणी विचार करत नाही. बहुतांशी वेळा याची कारणंही कडक समाजरचना, घरातलं कट्टरपंथी वातावरण, अल्पवयात मिळालेली चुकीची माहिती, लैंगिक शिक्षणाचा अभाव, आई-वडिलांमधले असह्य उघड तणाव, विकृत साहित्य व दृश्य माध्यमातून झालेले संस्कार, बालवयात मुला-मुलींना एकत्र मिसळू देण्यावर ठेवलेले निर्बंध इ. गोष्टींमधे दडलेली असतात.

आणखी वाचा : थंडीत त्वचा कोरडी पडतेय? ‘हे’ घरगुती फेसपॅक लावून पाहा

दिरांच्या ‘बंद खोली मागच्या’ वागण्याची जी किळस तुम्हाला वाटते, तो मात्र तुमच्या मनाचा खेळ आहे. नको त्याचा कल्पनाविलास करून त्यात स्वतःला मनस्ताप करून घेण्याने काहीच साधलं जाणार नाही. जे तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं नाही त्याची किळस ती कसली? तसंच पाहिलंत तर स्त्री-पुरुषांच्या सामान्य लैंगिक सबंधाची किळस वाटणारेसुद्धा अनेक लोक आहेत. कुणाला कशाची किळस वाटते, हे त्या व्यक्तीच्या संस्कारांवर अवलंबून असतं.

दिराच्या या अनैसर्गिक संबंधांविषयी तुम्ही काही करावं हे अपेक्षितही नाही, शक्यही नाही व योग्यही नाही. तो तुमचा विषय नाही. तुम्ही दिरापेक्षा तुमच्या पतीदेवांकडे लक्ष वळवा. तुमचं लग्न होऊन अवघं वर्ष झालंय. हे वय वैवाहिक जीवनातील सौख्यात रमण्याचं आहे. तुमचे व तुमच्या नवऱ्याचे संबंध कसे दृढ व परिपक्व होतील, याकडे तुमच्या उर्जेची दिशा वळवा. त्यातच तुमच्या नवरा बायकोमधील नात्याचा कस लागणार आहे.

आणखी वाचा : त्वचा तेलकट आहे?… मग या टिप्स वाचा!

सेक्सविषयीचे प्रश्न विचारा बेधडक!
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.