प्रश्न : आम्ही चार बहिणी. मी २३ वर्षांची आणि सर्वांत लहान. आमचं कुणाचंच लग्न झालेलं नाही आणि आता त्यांची लग्न होण्याची फारशी लक्षणंही नाहीत. आमचे आपापसातले संबंध प्रेम व सलोख्याचे आहेत. पण मी माझ्या ऑफिस सहकाऱ्याच्या प्रेमात पडले. माझं आणि संजयचं गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम जुळलं आहे. लग्नाचं मात्र मीच टाळत आले आहे. आपल्या तीन मोठ्या बहिणींची लग्नं झालेली नसताना, मी माझं लग्न करणं मला स्वार्थीपणाचं वाटतं. संजयदेखील यामुळे अनेकदा व्यथित होतो. आम्ही अजूनपर्यंत तरी लैंगिक संबंध ठेवले नाहीत. पण असं किती दिवस चालणार? मी फार व्याकुळ झाले आहे. मला नवरा, संसार हवा आहे पण बहिणींशी नातंही हवं आहे. काय करू कळत नाही.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे मासिक पाळी बंद होण्याचा काळ कोणता | sexual …

loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
L&T , Subramaniam, 90 Hours Work , Work Hours ,
स्त्रीद्वेष्टेपणा की कर्मचाऱ्यांच्या शोषणाची पूर्वतयारी? 
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…

उत्तर : ‘नाती-गोती’ केवळ मनुष्य जातीतच मानली जातात. त्यामागे जी कारणं आहेत ती अशी- नात्यांमधल्या भावबंधनांचा एकमेकांना पूरक असा आधार मिळावा, मदत व्हावी, संरक्षण मिळावं आणि एक व्यक्ती म्हणून विकसित होत असताना त्यासाठी पोषक असं वातावरण निर्माण व्हावं. पण नाती जेव्हा व्यक्तीच्या विकासामध्ये बाधा बनू लागतात, तेव्हा त्यात रुग्णता प्रवेश करते. अशी ‘रुग्ण’ नाती बाह्यांगी सलोखा राखून राहिली, तरी एकमेकांच्या पायातल्या बेड्यांचं काम करू लागतात. अनेकदा या बेड्या इतरांनी लादलेल्या नसून आपणच आपल्यावर ओढवून घेतलेल्या असतात. तुमच्या बाबतीतही असंच काहीसं घडताना दिसतंय.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : वहिनीविषयी आकर्षण वाढलंय, काय करू …

तुमच्या बहिणींशी तुमचे संबंध प्रेमाचे असल्याचं तुम्ही लिहिलं आहे. खरं प्रेम एकमेकांना बांधत नाही, परस्परांना मुक्त करतं. खऱ्या प्रेमात एकमेकांवर गाढा विश्वास असतो, एकमेकांच्या भावनांची व गरजांची अत्यंत संवेदनशील अशी जाणीव असते. असं प्रेम जर तुम्हा बहिणींमध्ये असेल, तर मग अडचण ती कोणती! तुमच्या मोठ्या बहिणींची लग्नं झाली नाहीत; याची कारणं काहीही असली तरी तुम्ही मात्र त्याला अजिबात जबाबदार नाही, हे तितकंच खरं आहे. ज्या कारणांमुळे आजपर्यंत त्यांची लग्नं झाली नाहीत, त्या कारणांमध्ये ‘तुम्ही स्वत:चं लग्न करून घेतल्याने’ फारसा काय मोठा फरक पडणार आहे? तुमचं लग्न व्हावं, असं तुमचं वय आहे. लग्न करावं अशी प्रेमाची व्यक्तीही तुमच्या जीवनात आली आहे. तुम्हा दोघांच्या शारीरिक गरजाही महत्वाच्या आहेत. अशा वेळी तुम्ही लग्न केलंत तर त्यात काहीच गैर किंवा स्वार्थीपण नाही. तुमच्या बहिणी या गोष्टीमुळे दुखावल्या जाऊ नयेत. त्या विरोध करतील असंही वाटत नाही. जरी कुणी विरोध केलाच तर त्यातला कार्यकारण भाव, समंजस चर्चा करून, पटवून देणं व पटवून घेणं फारसं अवघड नाही.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : तांबीचा (copper T) वापर कसा करायचा?

तुमचं प्रेमप्रकरण दोन वर्षांपासून तुम्ही खेचत आला आहात. संजयच्या भावनांची कदर करणंसुद्धा गरजेचं आहे. त्याच्या प्रेमाला दुय्यम दर्जा देणं बरोबर नाही. तुमचं वय आणि परिस्थिती पाहता, संजय व तुमच्यातलं प्रेम याला अग्रक्रम देणंच योग्य. तुमच्या प्रेमाची परिणिती विवाहात होऊ देण्यात जराही विलंब करू नका. प्रथम संजयला एकदा घरी घेऊन जा. त्याची बहिणींशी ओळख करून द्या. तुमच्या दोघांमधील ‘मैत्री’ थोडी स्पष्ट होऊ द्या. तुम्ही सर्वांत लहान. तुमच्या बहिणींनी तुमच्यावर सर्वांत जास्त प्रेम केलं असणार. त्यांच्या प्रेमावर विश्वास ठेवा. संजयचे व तुमचे प्रेमसंबंध बहिणींना स्पष्ट होण्याला फार वेळ लागणार नाही. कदाचित तुमच्या बहिणीच तुम्हाला लग्नाचं सुचवतील व सगळे मार्ग मोकळे होतील.

आणखी वाचा : लैंगिक समस्या आणि व्हायग्रा | Sexual Problems Question And …

सेक्सविषयीचे प्रश्न विचारा बेधडक
तुम्ही तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा.

Story img Loader