मागील काही महिने देशभरात आणि जगभरात एकच चर्चा होती ती म्हणजे अनंत अंबानीच्या लग्नाची. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानीच्या धाकट्या मुलाचं म्हणजे अनंत अंबानीचं लग्न १२ जुलैला मोठ्या थाटामाटात पार पडलं. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिक शैला मर्चंट यांची लाडकी मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी अनंत अंबानीने लग्नगाठ बांधली. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटरमध्ये अनंत-राधिकाचा शाही लग्नसोहळा पार पडला. तसंच याआधी अनंत-राधिकाचे दोन प्री-वेडिंग झाले.

मार्च महिन्यात तीन दिवसांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरात येथील जामनगरमध्ये पार पडला. त्यानंतर २९ मे ते १ जूनपर्यंत दुसरा प्री-वेडिंग सोहळा क्रूझवर झाला. इटली ते फ्रान्स असा प्रवास करत अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा झाला. हे दोन्ही प्री-वेडिंग सोहळे चांगलेच गाजले. अनंत-राधिकाच्या या संपूर्ण कार्यक्रमात अंबानी कुटुंबातील महिलांनी चांगलं लक्ष वेधलं. साड्या, लेहेंगे, ड्रेस, गाउन अशा अनेक पोशाखात अंबानी कुटुंबातील महिला पाहायला मिळाल्या. यातील लक्षवेधी ठरणारी अंबानी कुटुंबातील एक महिला म्हणजे श्लोका मेहता ( Shloka Mehta ) म्हणजेच आकाश अंबानीची पत्नी.

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील अशिक्षित अधिपतीचं खऱ्या आयुष्यात किती शिक्षण झालंय माहितेय का?
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Who is Nikhil Kamath ?
Who is Nikhil Kamath : पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच्या पहिल्या पॉडकास्टमुळे चर्चेत आलेले निखिल कामथ कोण आहेत?
Kannamwar is with Maharashtra because of Nehru says Chief Minister Devendra Fadnavis
नेहरूंमुळेच कन्नमवार महाराष्ट्रसोबत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हेही वाचा – स्वप्नपूर्ती! ऑटो ड्रायव्हरची मुलगी होणार डॉक्टर; हलाखीच्या परिस्थितीत NEET-UG परीक्षा उत्तीर्ण, वाचा रुबी प्रजापतीचा प्रेरणादायी प्रवास

अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नसोहळ्यात श्लोका मेहेता ( Shloka Mehta ) विविध लूक्समध्ये दिसली. कधी भरजरी लेहेंग्यात, तर कधी साडीत, तर कधी वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळाली. श्लोकाच्या या लूक्समधील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. पण श्लोकाचे सुंदर लूक करण्यामागे एका खास व्यक्तीचा हात आहे. या खास व्यक्तीचं श्लोकाबरोबरचं नातं देखील तितकंच खास आहे. श्लोकाच्या या खास व्यक्तीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Shloka Mehta
Shloka Mehta

अंबानी कुटुंबात कोणताही कार्यक्रम असो या कार्यक्रमांसाठी श्लोकाचा सुंदर लूक करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची बहीण दिया मेहता जाटिया आहे. दिया प्रत्येक कार्यक्रमातील श्लोकाच्या ( Shloka Mehta ) ड्रेसच्या डिझाइनपासून सर्वकाही ती करते. दियाचं शालेय शिक्षण मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत झालं होतं. त्यानंतर आवडीनुसार तिने पुढील शिक्षण घेतलं. सेंट्रल सेंट मार्टिंन आणि लंडन कॉलेज ऑफ कम्युनिकेशन येथे तिने ग्राफिक डिझाइनचं शिक्षण घेतलं आणि दुसऱ्या बाजूला फॅशनली आवड जोपासली.

हेही वाचा – IAS टीना डाबी यांच्या आईबद्दल जाणून घ्या; UPSC उत्तीर्ण होऊन झाल्या IES अधिकारी, नंतर घेतली स्वेच्छानिवृत्ती कारण…

वयाच्या २४व्या वर्षी लग्न अन् मग…

दिया एक फॅशन कन्सल्टंट म्हणून नावाजलेली असली तरी ती आपल्या कुटुंबाचा व्यवसाय देखील सांभाळते. दियाला फॅशनचं वेड लहानपणापासून आहे. मुंबईतील प्रख्यात ज्वेलर्स मोना आणि रसेल मेहता यांची धाकटी मुलगी दिया आहे. वयाच्या २४व्या वर्षी तिने आयुष जाटियाबरोबर लग्न केलं. लंडनमध्ये असलेल्या रेस्टारंचा तो मालक आहे. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. इन्स्टाग्रामवर दियाचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Story img Loader