डॉ. स्मिता प्रकाश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहानपणी भावंडांची एकमेकांशी भाडणं होतात, त्यांच्यात स्पर्धा होतात, पण ते तात्पुरतं असतं. पण ते विसरून एकमेकांबद्दलचं प्रेम कायम राहतं. पण लग्न झाल्यानंतरही नात्यामध्ये हेवेदावे, रागलोभ, मत्सर राहिला तर ही जवळची नातीही दुरावतात. सिबलिंग रायव्हलरी ही केवळ लहानपणी असते असे नाही. कधी कधी ती मोठं झाल्यावरही कायम राहते. शेजाऱ्याने, सहकाऱ्याने आपला कधी अपमान केला तरी आपण त्यांच्या सोबत वागताना ते विसरून त्यांच्यासोबत नातं टिकवतो. पण सख्ख्या नात्याकडून आपल्या अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याची उदाहरणेही आपण बघतो. आणि बऱ्याच वेळा हे भावंडातील वाद लग्न झाल्यावर अधिक वाढतात असं दिसून येतं. म्हणूनच आपला जोडीदार आणि आपले नातेवाईक दोन्ही सांभाळता यायला हवेत.

‘‘सुनीता, राकेशचा फोन आला होता, आपल्या कुलदैवताला जायचं आहे, या रविवारी आपण जाऊ या का? ऋषीलाही सुट्टी आहे आणि मी सोमवारची सुट्टी घेऊ शकतो.’’‘‘रोहित, मी तुला आधीच सांगितले आहे, मी राकेश भावजी आणि जाऊबाईंसोबत आता कुठेही येणार नाही. त्यांचे आणि माझे संबंध संपले आणि तुलाही त्यांच्याकडे जाऊन अपमान करून घेण्याची काहीच गरज नाहीये.’’‘‘अगं, भावंडामध्ये मान-अपमान कसला? काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नसतील, पण मला त्यामुळं काहीही फरक पडत नाही.’’‘‘तुला फरक पडत नसेल, पण मला फरक पडतो. तू राकेश भावजींचा मोठा भाऊ आहेस, त्यांनी तुला मान द्यायलाच हवा. रमालासुद्धा या गोष्टी समजू नयेत? मला तर वाटतं, राकेश भावजी सगळं रमाच्या म्हणण्यानुसार वागतात. त्यांच्या घराच्या वास्तुशांतीला तिच्या आई-वडिलांना व्यवस्थित मानपान केला, आईला तर केवढी भारी साडी दिली आणि आपल्या मोठ्या भावाला आणि वहिनीला काहीच दिलं नाही. असं कुठं असतं का?’’‘‘अगं, आपण एकाच घरातील आहोत, घरातल्याच व्यक्तींना कुणी अहेर देतं का? म्हणून त्यांनी काही दिलं नसेल, उगाच तू कशाला वेगळे अर्थ काढतेस?’’

हेही वाचा: घरच्यांबरोबर असं करा नववर्षाचं सेलिब्रेशन!

‘‘रोहित, तू नेहमीच त्यांची बाजू घेतोस. नेहमी मीच चुकीची असते का? त्यांच्या मुलीच्या म्हणजे रेवाच्या वाढदिवसाला तू तिला सायकल घेऊन दिलीस आणि ऋषीच्या वाढदिवसाला ते फक्त केक घेऊन आले होते, तो मोठा झाला असला तरी काहीतरी गिफ़्ट त्याला द्यायला हवं की नको? तू एवढं त्यांच्यासाठी करतोस, पण ते नेहमी तुझा अपमान करतात, घर बुक करण्यापूर्वी मोठा भाऊ म्हणून तुला विचारायला हवं होतं की नाही? पण नाही- तेव्हा दादा नाही आठवला त्यांना. रमा तर अत्यंत गर्विष्ठ आहे. फक्त तोंडावर गोड बोलते, पण तिच्या नोकरीचा आणि माहेरच्या श्रीमंतीचा तिला खूप गर्व आहे आणि भावजी तिच्याच म्हणण्यानुसार चालतात. तुझी बहीण- राधाताई नेहमी तिचीच बाजू घेतात. रोहित अरे, राधाताई आणि राकेश भावजी दोघेही तुझ्यापेक्षा लहान आहेत. त्यांनी मोठा भाऊ म्हणून तुला विचारायला हवं, तुला आणि मोठी वहिनी म्हणून मला मोठेपणा द्यायला हवा, पण नाही, त्या वास्तुशांतीच्या दिवशीही रमाला त्या काहीच बोलल्या नाहीत, स्वतःला गिफ़्ट मिळालं की गप्प बसल्या. वास्तुशांतीच्या प्रकारानंतर मला त्यांच्याशी आता कोणताच संबंध ठेवायचा नाही आणि तूही त्यांच्याकडे जायचं नाहीस.’’

‘‘अगं, तुला संबंध ठेवायचे नसतील तर नको ठेवूस, पण मला माझ्या भावंडांपासून का तोडतेस?’’
‘‘ठीक आहे, तुला त्यांच्याशी संबंध ठेवायचे असतील तर माझ्याशी नातं तोडून टाक. मला आता काहीच बोलायचं नाही.’’

सुनीता आवेशातच निघून गेली. ही अशी का वागते याचा तो विचार करत होता. माझ्या भावंडांबद्दल हिला एवढा राग का आहे? ती त्यांचा एवढा द्वेष का करते? हिची समजूत कोण घालणार? मग त्यालाच आठवलं, तिची समजूत घालणारी एकच व्यक्ती म्हणजे तिचे बाबा. कारण ती त्यांच्याशीच मनातलं बोलते. तसंच रोहितचंही त्यांच्याशी चांगलं जमतं. दोघेही एकमेकांशी फ़्रेंडली होते. म्हणूनच रोहितने सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या

‘‘बाबा, सुनीता कशी वागते हे मी तुम्हाला सांगितलं, पण खरंच माझंही काही चुकतंय का? जवळच्या नात्यातही हे हेवेदावे, मत्सर का राहतात?’’

… आणि सासऱ्यांनी आपल्या जावयाला खूप छान समजावून सांगितलं.

‘‘रोहित, लहानपणी भावंडांची एकमेकांशी भाडणं होतात, त्यांच्यात स्पर्धा होतात, पण ते तात्पुरतं असतं. पण ते विसरून एकमेकांबद्दलचं प्रेम कायम राहतं. पण लग्न झाल्यानंतरही नात्यामध्ये हेवेदावे, रागलोभ, मत्सर राहिला तर ही जवळची नातीही दुरावतात. सिबलिंग रायव्हलरी ही केवळ लहानपणी असते असे नाही. कधी कधी ती मोठं झाल्यावरही कायम राहते. शेजाऱ्याने, सहकाऱ्याने आपला कधी अपमान केला तरी आपण त्यांच्या सोबत वागताना ते विसरून त्यांच्यासोबत नातं टिकवतो. पण सख्ख्या नात्याकडून आपल्या अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याची उदाहरणेही आपण बघतो. आणि बऱ्याच वेळा हे भावंडातील वाद लग्न झाल्यावर अधिक वाढतात असं दिसून येतं. म्हणूनच आपला जोडीदार आणि आपले नातेवाईक दोन्ही सांभाळता यायला हवेत.

हेही वाचा: आहारवेद : पचनसंस्थेसाठी सर्वोत्तम सफरचंद

नातेवाईक किती महत्त्वाचे आहेत हे जोडीदाराला पटवून देता यायला हवं आणि आपल्या जोडीदाराचं मोठेपण नातेवाईकांना सांगता यायला हवं. केवळ लग्न झालं म्हणून भावंडांतील प्रेम कमी व्हायला नको. कारण हा एकमेकांचा आधार खूप गरजेचा असतो. काही मतभेद झाले तर ते एकमेकांशी बोलून वेळीच मिटवायला हवेत. सर्व भावंडं एकत्र आहेत किंवा वेगळे राहत असले तरी सर्वांना एकमेकांचा आधार आहे याचा आनंद आई-वडिलांना अधिक असतो. परदेशातसुद्धा सर्व भावंडांनी एकत्र येण्यासाठी वर्षातून एकदा कझिन्स डे साजरा केला जातो. म्हणूनच आपल्याकडेही दसरा-दिवाळी, गौरी-गणपती यांसारखे मोठे सण एकत्र कुटुंबात साजरे करण्याची प्रथा आहे, ती मोडीत निघू नये हे आपणच जपायला हवं. मित्रांप्रमाणेच आता फॅमिलीचेही व्हाट्सॲप ग्रुप केले जातात, सर्वजण लांब असले तरी त्यानिमित्ताने एकमेकांशी कनेक्ट राहतात. नाती जपायला हवीत हे मी सुनीताला समजावून सांगेनच, पण तू आता कुलदैवताला सर्वांनी एकत्र जाण्याची तयारी कर.’’
‘‘हो बाबा, नक्कीच आणि प्रसाद घेऊन तुम्हाला सहपरिवार भेटायलाही येईन.’’

रोहितने बाबांचे मनापासून आभार मानले. त्याच्याही मनावरचं ओझं हलकं झालं होतं.

smitajoshi606@gmail.com