मूत्रविसर्जन ही पुष्कळांना फार किरकोळ बाब वाटते, पण तुम्ही हे तर मान्य कराल ना, की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची मूत्रविसर्जनासाठीची शारीरिक यंत्रणा वेगळी आणि थोडीशी अधिक गुंतागुंतीचीही असते. त्यामुळेच मूत्रविसर्जन ही विशेषत: स्त्रियांनी ‘सिरिअसली’च घ्यायची गोष्ट आहे! अनेक स्त्रिया (विशेषत: प्रौढ स्त्रिया) ‘युरिन इन्फेक्शन’चा त्रास वारंवार होत असल्याची तक्रार करतात. काहीजणी वय वाढत जातं तसं ‘युरिनरी इन्कॉन्टिनन्स’चा (लघवीवर नियंत्रण न राहून पँटीत काही थेंब लघवी होणं) अनुभव येत असल्याचंही सांगताना दिसतात. यावर वैद्यकीय उपाय आहेत आणि प्रत्येकानं आपली गरज ओळखून वैद्यकीय मदत घ्यावीच. मात्र, आज आपण अशा काही साध्या सवयी पाहणार आहोत, ज्या स्त्रियांनी मूत्रविसर्जन यंत्रणा चांगली राहण्याच्या दृष्टीनं लहान आणि तरुण वयापासूनच पाळणं चांगलं. आपल्या आई-आजी मंडळींच्या अनुभवातून आलेल्या या सवयी आहेत.

१) खूप वेळ लघवीला न जाता राहू नका.

काही जणींना घराबाहेर पडल्यावर इतर ठिकाणच्या टॉयलेटमध्ये जायला आवडत नाही किंवा घाण वाटते. अशा वेळी स्त्रिया खूप वेळ लघवीला न जाता तशाच राहतात. हे टाळायला हवं. लघवीला जाण्याची इच्छा झालेली असूनही खूप वेळ न गेल्यास युरिन इन्फेक्शनची शक्यता वाढते. क्वचित कधीतरी प्रवास करत असताना आपण लघवीला जाणं ‘डीले’ करतो, पण ते क्वचितच असू द्या.

good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Mom delivers baby by herself while riding in the car to the hospital Shocking video
चमत्कारावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारमध्ये महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या अन् पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही
Little Boy Viral Video
“तू मोठा झाल्यावर किती बायका करणार?” चिमुकल्यानं दिलं भन्नाट उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल; VIDEO एकदा पाहाच
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण

हेही वाचा – मासिक पाळी सुसह्य करायचीय? मग या टिप्स वाचाच!

२) दोन-तीन तासांनी एकदा लघवीला जाऊन या.

लघवी खूप जोराची लागल्यावरच जाऊन यायला हवं असं नसतं. साधारणत: दोन-तीन तासांनी एकदा जाऊन येण्याची सवय चांगली. मग त्या वेळी तुम्हाला ‘जोराची’ लागलेली नसेल तरी एकदा जाऊन आलेलं बरं. काही डॉक्टरसुद्धा हे आवर्जून सांगतात. यामुळे मूत्राशयाच्या देखभालीस हातभार लागतो.

३) मूत्रविसर्जन करताना घाईगडबड नको.

पटकन लघवीला जाऊन येण्याच्या नादात मूत्रविसर्जनाचं काम पुष्कळदा कसंतरी उरकलं जातं. मात्र हे चांगलं नाही. अशा घाई-गडबडीमध्ये मूत्राशय पूर्ण रिकामं न होता थोडीशी लघवी मूत्राशयात तशीच राहते. यामुळे युरिन इन्फेक्शनची शक्यता वाढते. त्यामुळे गडबड न करता, शांतपणे, आपला वेळ घेऊन लघवीला जाऊन या आणि लघवीचं काम झाल्यावरची स्वच्छताही चांगली पाळा. लघवीला जायच्या वेळी मानसिकदृष्ट्याही शांत असणं आवश्यक असतं.

हेही वाचा – लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : जोडिदाराच्या भावनांचीही कदर व्हावी

४) पुरेसे द्रवपदार्थ पोटात जाऊ द्या.

इथे द्रवपदार्थ म्हणजे पाणी, ताक, स्मूदी, ज्यूस, सरबत, सूप असं आपण दिवसभर वेळोवेळी द्रव स्वरुपात घेत असतो ते. डॉक्टर असं सांगतात, की साधारणपणे दिवसभरात अडीच ते तीन लिटर द्रवपदार्थ पोटात जावेत. प्रत्येकानं आपली प्रकृती ध्यानात ठेवून त्यानुसार दिवसभर पुरेसे द्रवपदार्थ घेणं, पाणी पिणं चांगलं. त्यानं मूत्रसंस्था निरोगी राहायला मदत होईल.

५) चहा-कॉफी अति प्रमाणात नको.

चहा-कॉफीसारखी कॅफिनयुक्त पेयं ‘डाययुरेटिक’ गुणधर्माची असतात. म्हणजे कॅफिनेटेड पेयांमुळे लगेच लघवी लागते. कोलासारखी पेयंसुद्धा कॅफिनयुक्त असतात. ताजंतवानं वाटण्यासाठी मर्यादित स्वरुपात चहा-कॉफी घेणं किंवा कधीतरी कोला पिणं ठीक. मात्र अशी कॅफिनेटेड पेयं वारंवार किंवा अति प्रमाणात पिणं टाळावं.

हेही वाचा – कामावरून रात्री उशिरा परत घरी जाताय? सुरक्षिततेसाठी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

६) मूत्रसंस्थेला फायदेशीर व्यायाम करा.

मूत्रसंस्थेला फायदेशीर म्हणून ‘कीगल एक्सरसाईझ’ किंवा ‘पेल्व्हिक फ्लोअर एक्सरसाईज’ची आधुनिक व्यायामप्रकारांमध्ये चालती आहे. ‘युरिनरी इन्कॉन्टिनन्स’सारख्या समस्या भविष्यात उद्भवू नयेत म्हणून त्या ठिकाणच्या स्नायूंची नैसर्गिक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न या व्यायामांद्वारे केला जातो. तुम्ही हे व्यायाम प्रशिक्षित व्यक्तीकडून शिकून घेऊन करू शकता. याव्यतिरिक्त एकूण आरोग्य चांगलं राहावं यासाठी जे नियमित व्यायाम किंवा योगासनांसारखे स्ट्रेचिंगचे व्यायामप्रकार केले जातात त्याचाही मूत्रसंस्थेचं आरोग्य चांगलं राहायला फायदा होतो. त्यामुळे एकूणच नियमित व्यायाम करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.