आपला चेहरा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. चेहऱ्यावरूनच आपली ओळख होते. त्यामुळे चेहऱ्याची त्वचा नितळ असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचा रंग गोरा असो किंवा सावळा, चमकदार त्वचा नेहमीच लक्ष वेधून घेते. पण कृत्रिम क्रीम्स किंवा उपायांपेक्षा नैसर्गिक पद्धतीने त्वचेचा पोत, नितळपणा कायम ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच अनेक घरगुती पारंपरिक उपाय आपल्याकडे आहेत.

आणखी वाचा : व्यथा काश्मीरच्या: तब्बल ७५ वर्षे वीज नाही, डॉक्टर नाही, बाळंतपण केवळ सुईणीवरच अवलंबून!

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

लालबुंद, रसाळ टोमॅटो आपल्या स्वयंपाकाचा अविभाज्य भाग आहे. भाज्यांमध्ये, सूपमध्ये किंवा सलाड म्हणून टोमॅटोचा वापर बहुतेक प्रत्येक भारतीय घरात होतोच. वजन कमी करणाऱ्यांसाठी, व्हिटॅमिन्सची कमतरता असणाऱ्यांसाठी टोमॅटो खाणं चांगलं असतं हेही आपल्याला माहिती आहे. पण स्त्रियांच्या त्वचेसाठी टोमॅटो अत्यंत गुणकारी आहे हे तुम्हाला माहिती आहे का? खरंतर आपल्या स्वयंपाकघरातील अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आपल्या त्वचेसाठी खूप फायदा होतो, टोमॅटोही त्यातलाच एक.

आणखी वाचा : झोपू आनंदे- स्वप्नांचा मागोवा

एकदा का याचे फायदे तुम्हाला कळले, तर तुम्हीही तुमची त्वचा आणखी सुंदर करण्यासाठी टोमॅटोचा नक्की वापर कराल यात शंका नाही. टोमॅटोमुळे त्वचा उजळते. टोमॅटोमध्ये भरपूर पोषणमूल्ये असतात. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट मानलं गेलेले लायकोपिन भरपूर प्रमाणात असतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं असतं. टोमॅटो सी व्हिटॅमिनचा प्रमुख स्रोत आहे. त्याशिवाय व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस यांसारखी मिनरल्सही टोमॅटोमध्ये असतात, ज्यामुळे त्वचा फक्त बाहेरूनच नाही तर आतूनही सुंदर आणि निरोगी होते. स्किन पोर्सही स्वच्छ होतात.

आणखी वाचा : विश्लेषण: चर्चने लिपस्टिकच्या वापरावर बंदी का घातली होती? जाणून घ्या

त्वचेसाठी टोमॅटोचा कसा उपयोग करायचा ते पाहू या-

टोमॅटोचा गर
एका टोमॅटोचे दोन तुकडे करा. या अर्ध्या तुकड्याचा गर संपूर्ण चेहरा आणि मानेवर रगडा. १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन टाका. अनेकदा प्रदूषणामुळे स्किन पोर्स बंद होतात. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि डागही पडतात. हे डाग घालवण्यासाठी आणि स्किन पोर्स स्वच्छ करण्यासाठी हा उपाय चांगला आहेच, पण नियमित केल्यास स्किनची पीएच लेव्हलही संतुलित राहते.
टोमॅटो आणि काकडी
एका टोमॅटोचा गर काढा. त्यामध्ये काकडीचा ताजा रस मिक्स करा. हे चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर साध्या पाण्याने धुऊन टाका. काकडीच्या रसाऐवजी काकडीचा गरही वापरू शकता. टोमॅटोमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील जखमा किंवा त्वचेची आग होत असेल, तर या उपायाने कमी होते.
टोमॅटो आणि कोरफड
टोमॅटोचा रस काढा आणि त्यामध्ये कोरफडीचा गर किंवा एलोव्हेरा जेल मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि थोड्या वेळाने चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन टाका. यामुळे सनबर्न कमी होतं. चेहऱ्यावरचा लालसरपणा, सूज कमी होते आणि आराम मिळतो.
टोमॅटो आणि साखर
टोमॅटो अर्धा कापा आणि त्याचा गर काढून घ्या किंवा कुस्करा. त्यामध्ये एक चमचा साखर घाला. साखर विरघळल्यावर ही पेस्ट हात, पाय, मान इ. ठिकाणी लावा. काही वेळाने धुऊन टाका. लक्षात ठेवा, ही पेस्ट चेहऱ्यासाठी नाही. या पेस्टमुळे चेहऱ्यावरील त्वचेची सालं निघू शकतात. पण प्रदूषण, धूळ, त्वचेमधील ऑईल यामुळे त्वचा निस्तेज बनते. टोमॅटोमुळे डेड स्किन सेल्स कमी होतात.
टोमॅटो आणि मध
टोमॅटोमध्ये अँटी एजिंग गुणधर्म आहेत. त्यामुळे या मास्कला अँटी एजिंग मास्क असं म्हणतात. या मास्कमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात. टोमॅटोचा रस घ्या आणि त्यात बरोबरीने मध मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटं ठेवा आणि त्यानंतर धुऊन टाका. दीर्घकाळ त्वचा तरुण राहण्यासाठी हा नैसर्गिक उपाय आहे.
टोमॅटो आणि चंदन पावडर
एका टोमॅटोचा रस काढा. त्यामध्ये एक चमचा चंदन पावडर आणि एक चिमूटभर हळद मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. हा पॅक तुम्ही हाता-पायांच्या त्वचेसाठीही वापरू शकता. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि बिटा कॅरेटीन भरपूर असतं. त्यामुळे त्वचा उजळते.
टोमॅटो आणि मुलतानी माती, पुदिना
एका टोमॅटोचा गर घ्या आणि त्यामध्ये मुलतानी माती मिक्स करा. पुदिन्याची ताजी पाने वाटून ती पेस्ट या पॅकमध्ये मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि सुकेपर्यंत तसाच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुऊन टाका. चेहऱ्याची त्वचा डागविरहित, नितळ होण्यासाठी हा पॅक उत्तम आहे.
टोमॅटो आणि दही
टॅनिंग कमी करण्यासाठी या पॅकचा चांगला उपयोग होतो. या पॅकसाठी दोन चमचे टोमॅटोचा गर घ्या. त्यात एक छोटा चमचा दही आणि दोन-चार थेंब लिंबाचा रस मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका.
टोमॅटो आणि बदाम तेल
टोमॅटोच्या गरामध्ये कोरफड जेल आणि बदाम तेल म्हणजेच आल्मंड ऑईलचे काही थेंब टाका आणि ही पेस्ट डोळ्यांखाली लावा. १५ मिनिटांनंतर चेहरा धुऊन टाका. यामुळे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होईल.