केतकी जोशी

उन्हाळा म्हणजे त्वचेची जास्त काळजी आणि त्याचबरोबर केसांचीही जास्त काळजी आणि निगा राखणं आलंच. आपले केस हे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. अगदी लांबसडक नसले तरी मऊ मुलायम आणि चमकदार केस हे चांगल्या आरोग्याचे लक्षण  नक्कीच आहेत. पण अनेकदा दुर्लक्षामुळे केस खराब होतात.धूळ, प्रदूषण आणि त्यात उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे केस निस्तेज आणि रुक्ष होतात. साहजिकच उन्हाळ्यात केसांची देखभाल करण्याची जास्त गरज असते. उन्हाळ्यात केसांची निगा कशी राखावी यासाठी काही खास टीप्स-

Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात

१.केस स्वच्छ ठेवा

उन्हाळ्यात घाम भरपूर येतो. त्याचबरोबर कोरडी हवा, धूळ, प्रदूषण यामुळे केस खूप घाण होतात. त्यामुळे उन्हाळ्यात केस स्वच्छ ठेवणं जास्त आवश्यक आहे. नियमित वर्कआऊट, व्यायाम करणाऱ्यांनी रोज केस धुतले पाहिजेत. केस धुतल्यानंतर ते ओलसर राहू न देता पूर्ण कोरडे करा. मोठे केस असतील तर एक दिवसाआड केस धुवावेत. मात्र रोजच्या रोज हार्ड शॅम्पूने केस धुणे टाळावे.

२.केस धुण्याआधी तेल लावा 

उन्हाळ्यात केस अगदी कोरडे, निस्तेज होतात. केस मऊ आणि हायड्रेट होण्यासाठी खोबऱ्याचं तेल सर्वोत्तम आहे. वर्षानुवर्षे आपल्याकडे केसांना खोबरेल तेल लावण्याची पध्दत आहे. तेल थोडेसे कोमट करुन लावल्यास त्याने अधिक फायदा होतो. नियमित तेल लावल्याने केसांना उत्तम पोषण मिळतेच. पण उन्हाळ्यात खोबरेल तेल लावल्याने केसांचा रुक्षपणा कमी होतो. तुम्ही केस धुण्याआधी एक तास खोबरेल तेल लावू शकता. रात्री झोपण्याआधी तेल लावून रात्रभर तसंच ठेवल्यास त्याचा चांगला परिणाम होतो. यामुळे केस अधिक मजबूत आणि दाट तसेच निरोगी बनतात.

३.चांगला शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करा

उन्हाळा असो की हिवाळा, कोणताही ऋतू असला तरी केसांसाठी नेहमी चांगल्याच प्रतीचाच शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. स्वस्त किंवा जाहिरातीत पाहून शॅम्पूची निवड करु नका. तुमच्या केसांसाठी योग्य असेल तोच शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. केमिकलयुक्त शॅम्पूमुळे केस आणि त्याचबरोबर स्कॅल्पही कोरडा, रुक्ष होतो, त्यामुळे शक्यतो केमिकलमुक्त शॅम्पूच वापरावा. नैसर्गिक किंवा ऑर्गॅनिक शॅम्पूचा वापर करणे योग्य.

४.बाहेर जाताना केसांना रुमाल बांधा

उन्हाळ्यात कडक उन्हामुळे केस खराब होऊ शकतात. त्यामध्ये रुक्षता, रखरखीतपणा येतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत अगदी सकाळी घराबाहेर पडणार असाल तरी डोक्याला स्कार्फ किंवा टोपी अवश्य घाला. हा रुमाल किंवा स्कार्फ कॉटनचाच वापरावा, कारण त्यामुळे डोक्याला थंडावा मिळतो आणि ऊन्हापासूनही संरक्षण होते. उन्हापासून केसांचं संरक्षण करण्यासाठी यूव्ही फिल्टर स्प्रे, जेल किंवा क्रिमचाही वापर करु शकता. यामुळे उन्हापासून केसांचा बचाव होईल.

५.केसांसाठी योग्य डाएट

केस फक्त बाहेरुनच नाही तर आतूनही निरोगी असायला हवेत. त्यासाठी योग्य ते डाएट असणं गरजेचं आहे. मजबूत, दाट केसांसाठी आहारात प्रोटिन्स, व्हिटॅमिन्सचे योग्य प्रमाण असले पाहिजे. हिरव्या भाज्या, सोयाबीन, रताळे आणि ड्रायफ्रूट्सचा समावेश अवश्य आपल्या डाएटमध्ये करा. यामध्ये आयर्न, बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन-ए आणि ओमेगा-३ असतं, ज्याचा केसांना खूप फायदा होतो. जास्त तेलकट, मसालेदार, जंक फूड खाण्याने केसांवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे चौरस आणि योग्य आहार घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात मिळणारी फळे, भाज्या भरपूर खा. काकडी, खरबूज, कलिंगड, आंबा, संत्री यांचं शक्य तितक्या जास्त सेवन करा. तसेच शहाळे,  कोकम सरबत, लिंबू सरबत अशी सरबतेही अवश्य घ्या. भरपूर पाणी मात्र नक्की प्या.

६.केसांवर हॉट टूल्स वापरणं टाळा

अनेकजणींना केसांसाठी हेअर स्ट्रेटनर, ड्रायर वापरण्याची सवय असते किंवा त्यांच्या व्यवसायाचा भाग म्हणून ते वापरावं लागतं. पण अशा हॉट टूल्समुळे केस तुटतात, केसांचं अतोनात नुकसान होतं. केस अगदी निस्तेज आणि रुक्ष दिसू लागतात. त्यामुळे शक्यतो या हॉट टूल्सचा वापर करु नये. अगदी करावाच लागला तर रात्री झोपताना केसांना तेलाने मसाज करावा. केसांची वेणी घालून रात्रभर तशीच ठेवावी. सकाळी उठल्यावर केस चांगल्या शॅम्पूने स्वच्छ धुऊन टाकावेत.

७.केसांना दर ३ महिन्यांमध्ये ट्रिम करा

दर तीन महिन्यांनी केस ट्रिम केल्यास केस अधिक चांगले वाढतात व दाट होतात. त्यामुळे केसांना स्प्लिट एंड्स होत नाहीत आणि केस दाट दिसतात. उन्हाळ्यात केस जास्त वेगाने वाढतात. रेग्युलर ट्रिमिंग केल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते आणि व्हॉल्यूमही वाढतो.

८. कोरफड जेलचा वापर

कोरफड त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असते तशीच केसांसाठीही चांगली आहे. उन्हाळ्यात कोरफड लावल्यास थंडावा मिळतो. केसांना कोरफड जेल लावल्यास थंडावा तर मिळतोच पण केस चमकदार, मऊ होण्यासही मदत होते. केस धुण्याआधी अर्धा तास केसांना कोरफड लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुऊन टाका. कोरफड जेल खोबरेल तेलात मिक्स करुन हेअर मास्क तयार करा. हा मास्क केसांना लावल्यास केस चमकदार होतात. केसांची नियमित निगा राखणे, तेलाचा मसाज, केसांची स्वच्छता या अगदी मुलभूत गोष्टी आहेत. या गोष्टी नियमितपणे केल्यास कोणत्याही अन्य हेअर ट्रीटमेंटची गरजच भासणार नाही आणि उन्हाळ्यातही केसही सुंदर, मुलायम, चमकदार दिसतील.