सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झालेला हा व्हिडिओ आहे आपल्याच मुलींचा. भारतीय महिला हॉकी खेळाडूंनी FIH नेशन्स कप (FIH Nations Cup) जिंकला आणि त्यानंतर भारतात परतल्यानंतर आपला आनंद हा असा व्यक्त केला… जगभरात FIFA च्या फायनलची धूम सुरु असताना आपल्या या खेळाडूंनी स्पेनच्या खेळाडूंचा अंतिम फेरीत पराभव केला आणि हॉकी जगतातील एक मानाचा चषक आपल्या देशासाठी जिंकला. इतकंच नाही तर या विजयामुळे भारतीय महिला हॉकी टीमनं २०२३-२४ च्या प्रो- लीगमध्येही आपलं स्थान पक्कं केलं आहे. अर्थातच हा विजय फक्त खेळाडूंसाठीच नाही तर आपल्यासाठीही खूप मोठा आहे.

आणखी वाचा : काकू, आम्ही ऑफिसमध्ये काम करायला जातो, लग्नासाठी मुलं पाहायला नाही!

passport drama
लोकसत्ता लोकांकिका : ‘पासपोर्ट’ महाअंतिम फेरीत, नागपूर विभागीय अंतिम फेरी जल्लोषात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Students selected for regional finals said Loksatta Lokankika competition is different from others
लोकसत्ता लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीला उत्साहात सुरुवात, सहभागी विद्यार्थी म्हणतात…
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय

क्रिकेट म्हणजे धर्म मानल्या जाणाऱ्या आपल्या देशात हॉकीचे चाहतेही आहेत. पण त्यांची संख्या कमीच आहे. क्रिकेटपेक्षा हॉकीला अर्थातच ग्लॅमर कमी आहे. पण तरीही मुली आवर्जून या खेळाकडे वळत आहेत. त्यात चांगली कामगिरी करत आहेत ही आपल्यासाठी खूप आनंदाची आणि आशेची गोष्ट आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्येही भारतीय महिला संघानं चमकदार कामगिरी करत ब्राँझ मेडल मिळवलं होतं. आता या FIH नेशन्स कप स्पर्धेत सलग पाच विजय मिळवून या टीमनं अपेक्षा उंचावल्या आहेत. एकूण आठ देशांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली. या विजयाचं बक्षिस म्हणून हॉकी इंडियानं प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये आणि त्यांच्या कोचिंग स्टाफसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचं बक्षिस जाहीर केलं कदाचित ही गोष्ट त्यांचा हुरुप वाढवायला मदत करेल. चषक हाती आल्यानंतरचा या टीमचा व्हिडिओ पाहिला तर त्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद पाहून आपला ऊरही अभिमानानं भरून येतो. मायदेशी परतल्यानंतर या खेळाडूंनी वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ब्राव्हो याच्या ‘चॅम्पियन चम्पियन’ या गाण्यावर मस्त डान्स केला. एकामागोमाग एक बाहेर पडताना या मुलींनी आपलं गोल्ड मेडल हातात घेऊन केलेला हा डान्सचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ‘कॅप्टन म्हणून मला माझ्या टीममधल्या खेळाडूंचा अभिमान वाटतो. प्रत्येकीनं 100 टक्के प्रयत्न केले आणि आम्ही सुरुवातीपासूनच आमचं ध्येय समोर ठेवूनच खेळ केला होता,’ अशी प्रतिक्रिया कॅप्टन सविता पुनियानं दिली होती. आता या संघाचं सगळं लक्ष 2023 मधल्या आशियाई गेम्सकडे लागलं आहे. फक्त हॉकीचा ध्यास घेतलेल्या या ‘चक दे’ गर्ल्सनं देशभराचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा : Flashback 2022 : ‘या’ घटना ठरल्या महिलांसाठी लक्षणीय!

गेल्या काही वर्षांत महिला हॉकी संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे आणि ही कामगिरी सातत्याने उंचावतच आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील आपल्या संघाचा खेळ तुम्हाला आठवत असेल. अपेक्षेपक्षा जबरदस्त कामगिरी करत भारताच्या महिला हॉकी संघानं थेट सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. आपल्या खेळानं त्यांनी अनेकांची मनं जिंकली. आत्ता मिळालेलं हे यश म्हणजे आपल्या महिला हॉकी संघाचं दुसरं मोठं यश आहे असं म्हटलं जात आहे.

आणखी वाचा : स्रियांमधील रक्तक्षय व कंबरदुखीवर उपयुक्त- खजूर

एफआयएच नेशन्स कप स्पर्धेत आपल्याला मिळालेल्या या विजयाची शिल्पकार ठरली डिफेंडर दीप ग्रेस. तर गोलकीपर सविता पुनियाचंही या स्पर्धेत मोलाचं योगदान आहे. तिला या संपूर्ण टुर्नामेंटची बेस्ट गोलकीपर म्हणून गौरवण्यात आलं. स्पेनविरुध्दच्या या विजयानंतर हॉकी इंडियानं We are proud #TeamBlue असं ट्विट केलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, किरण बेदी यांनीही खास ट्विट करुन या मुलींचं कौतुक केलं. विजयानंतर सविता पुनियाच्या प्रतिक्रियेतली एक भावना खूप महत्त्वाची होती. ‘विजयामुळे तर मी आनंदी आहेच पण आज जो मान माझ्या टीमला आणि खेळाडूंना मिळत आहे, त्यामुळे मला जास्त आनंद झाला आहे,’ असं सविता म्हणाली आहे. तिच्या या शब्दांतून आतापर्यंत हॉकीकडे आपण दुर्लक्ष केल्याबद्दलची खंतही झळकतेय. ऑलिम्पिकमधल्या खेळानंतर आपल्या महिला हॉकी संघाकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं. पण तरी आजही आपल्या संघातल्या खेळाडूंची नावं विचारली तर कितीजणांना सांगता येतील शंकाच आहे. फारशी चर्चा नाही, स्पर्धांबद्दल गाजावाजा नाही, उत्सुकता नाही अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही या मुली खेळतात आणि जिंकून येतात. म्हणूनच त्यांचं कौतुक अधिक आहे.

आणखी वाचा : आहारवेद : गर्भवतींसाठी उपयुक्त- चिकू 

आपल्यापैकी बहुतेकांनी ‘चक दे’ हा सिनेमा पाहिला असेल. आज महिला हॉकीची तितकी वाईट परिस्थिती नसली तरी फार काही बरी परिस्थितीही नाहीये. आजही अनेक गोष्टींसाठी या टीमला झगडावं लागतंय. सगळं जग जेव्हा FIFA ची फायनल बघत होतं, त्याचवेळेस आपल्या हॉकी टीमनं ही जबरदस्त कामगिरी केली आहे. खरंतर एरवी भारतात काही अपवाद वगळले तर फारसं फुटबॉलप्रेम नाही. पण आपल्याकडेही फिफाचा अंतिम सामना उत्साहानं पाहिला गेला. जगभरात फुटबॉलला ग्लॅमर आहे, क्रिकेटला वलय आहे. पण आपला राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीबद्दल मात्र अजूनही फारशी अनुकूलता नाही. तरीही आपला संघ यशासाठी धडपडतोय. त्या जिंकतात तेव्हा आनंद साजरा होतो तो त्यांच्यापुरताच. त्यांची फार काही अपेक्षा नाही, पण एक दिवस असा नक्कीच येईल जेव्हा त्यांच्या विजयानंतर देशभरात जल्लोष केला जाईल आणि त्यांच्याबरोबरच देशवासियही आनंदानं नाचतील याची त्यांना खात्री आहे.

Story img Loader