शोभा पिंगळे

लहानपणापासून मला ‘आंतरपाट’ या प्रकाराविषयी फार कुतूहल वाटायचं. प्रत्येक लग्नात हजर असताना माझं लक्ष जायचं, ते प्रथम आंतरपाटाकडे. दोन भटजींनी धरलेला तो आंतरपाट! कधी रेशमी, कधी सूती, तर कधी कुंकवाचं स्वस्तिक काढून सजवलेला. लहानपणी मी माझ्या बालबुद्धीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असे. का धरतात हा आंतरपाट?… नवरानवरीनं लग्नघटिका येईपर्यंत एकमेकाकडे पाहू नये म्हणून? की पूर्वी नववधू वयानं लहान असत आणि नवरदेव वयस्कर असत म्हणून तिला भीती वाटू नये म्हणून? नाना तर्कवितर्क लढवूनही मला आंतरपाटाचा खरा अर्थ कळायला बरीच वर्षं लागली.

Two Suspended in Hospital After video Shows Pregnant Woman Cleans Husband Bed After his Death
Woman Cleaning Husband Bed : धक्कादायक! पतीचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाने गरोदर पत्नीला स्वच्छ करायला लावले रक्ताचे डाग, कुठे घडली घटना?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
sobhita dhulipala celebrated diwali with naga chaitnya and family
लग्नाआधी सोभिता धुलीपालानं नागा चैतन्याच्या कुटुंबासह साजरी केली दिवाळी; अभिनेत्रीच्या साडीतल्या लूकमुळे वेधलं लक्ष, पाहा फोटो
wife cuts husbands private parts
दारूच्या नशेत पतीचं पत्नीशी भांडण, संतापलेल्या पत्नीनं पतीच्या गुप्तांगावर…
rajeshwari kharat new photo in wedding outfit netizens confused
“आम्हाला वेड्यात काढू नका”, जब्या-शालूचा लग्नाचा फोटो पाहून नेटकरी संभ्रमात; अनेकांनी केलं ट्रोल
Brijbhushan Pazare warned about to commit suicide if he pressured to withdraw candidature
“उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार,” ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
Abhijeet Sawant
“लाखो-हजारात माझी ताई तू…”, भावा-बहिणीच्या नात्यावर अभिजीत सावंतचे मंत्रमुग्ध करणारे गाणे

माझं स्वत:चं लग्न झालं, तेव्हाही आंतरपाटाविषयी अशीच उत्सुक होते. पण तेव्हा नववधूच्या स्वाभाविक लज्जेमुळे जास्त कुणाला विचारु शकले नाही. वयानं प्रौढ झाल्यावर मला आंतरपाटाचे थोडे थोडे अर्थ समजू लागले. नवरा-बायको विवाह बंधनात अडकतात, तेव्हा त्यांच्यात कुठलाही आडपडदा दूर व्हावा म्हणून हा प्रतीकात्मक पडदा म्हणजे आंतरपाट दूर होत असावा! नवरा-बायकोनं खऱ्या अर्थानं जीवनसाथीदार बनावं, त्यांच्यात कुठलाही गैरसमजाचा पडदा नसावा, म्हणूनच हा आंतरपाटआंतरपाट दूर सारत असावेत. पुन्हा पुन्हा हे विचारांचं चक्र डोक्यांत चालू असायचं, पण पूर्ण समाधान मात्र नव्हतं! आणि मी या प्रश्नाचा माझ्या परीनं शोध घेऊ लागले.

आमच्या शेजारच्या एका आजी-आजोबांना भेटायला गेले होते. त्यांच्याशी गप्पा मारताना मला जाणवलं, की आजींना बकुळीची फुलं, डाळिंब्यांची (वालाची) उसळ आवडते, हे या आजोबांना माहितच नव्हतं! तर आजोबांना मधुबाला आवडते किंवा चांदणं पडलेलं असताना गॅलरीत बसून कॉफी प्यायला आवडते, हे आजींना कधी कळलं नव्हतं. म्हणजे व्यावहारिक दृष्टीनं ते नवराबायको असले, तरी अदृश्य रूपानं एक आंतरपाट (गोणपाटासारखा!) त्यांच्या नातेसंबंधांत होता. पण दोघांनी संसाराचं रहाटगाडगं ओढलेलं होतं… अनेक वर्षं. या गोणपाटासारख्या आंतरपाटाची त्यांना दोघांनाही तसूभरही कल्पना नव्हती!

आजूबाजूच्या जोडप्यांकडं अशा दृष्टीनं पाहण्याचा मला आता छंदच जडला. काही जोडपी जगाला आपला दिलखुलासपणा दाखवत असली, तरी चलाखीनं बऱ्याच गोष्टी ते एकमेकांपासून लपवत असतात. दोघंही एकमेकाला फसवत असतात. म्हणजे त्यांच्यात अजूनही एक प्रकारचा फसवा आंतरपाट असतोच. पारदर्शकता बऱ्याच वेळी नसतेच. तरीही अज्ञानात सुख असल्याप्रमाणे काही जोडप्यांचे संसार फुलत असतात. म्हणजे त्यांच्या लग्नात आंतरपाट दूर करणं हा एक सोपस्कारच ठरतो! प्रेमविवाहातदेखील आंतरपाट असतोच. कारण काही गोष्टी नंतर कळतात आणि अशा काही जोडप्यांचे घटस्फोटही होतात. या अशा उगा प्रश्न आणि प्रश्नमालिकामुळे मी नेहमी घेरलेली होते!

कर्ज लपवणं, व्यसनं लपवणं, बरकत कळू न देणं, बाहेरख्यालीपणा, विवाहबाह्य संबंध, एकमेकांचं खोटं कौतुक, तिच्या माहेरच्या (किंवा त्याच्या आपल्या घरच्या) बढाया, आधीच्या प्रियकराविषयी वा प्रेयसीविषयी पाळलेली गुप्तता, अशी किती तरी उदाहरणं पाहिली की पटतं, की कित्येक जोडप्यांत हा आंतरपाट आहे. कधी गोणपाटासारखा संवेदनाशून्य (म्हणजे जोडप्यांना स्वत:लाही ज्याची जाणीव झालेली नाही असा), तर कधी पारदर्शक पण मृगजळासारखा फसवा! याला अपवाद पण असतीलच, पण फार कमी असतील असं वाटतं.

पुन्हा विचार मनात आला, की इतर जोडप्यांकडे पाहताना आपण स्वत:चाही विचार करावा. मी आणि माझा नवरा आमच्यांतला आंतरपाट हा खऱ्या अर्थानं दूर झाला आहे का?… की आपण भ्रमातच आहोत? याचं चटकन् मला उत्तर देता आलं नाही. पण एवढं मात्र ठरवलं, की आता पुढे आपण हा नव्यानं विचार करावा. आमच्यातल्या एका नव्या नात्याचा जणू साक्षात्कार मला या आंतरपाटानं घडवला. आणि असेल नसेल तो आंतरपाट खऱ्या अर्थानं दूर झाला!

shobha.pingle@yahoo.com