सुचित्रा प्रभुणे

जीवनाच्या एका वळणावर आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे हा प्रश्न अनेकदा पडतो आणि त्याची उत्तरं आपण आपल्या परीनं शोधतदेखील असतो. मग अचानक कुणीतरी व्यक्ती निमित्त बनून येतं आणि करिअरसाठी हा पर्याय निवड असं सुचवून जातं. विशेष म्हणजे कधी आपण ती वाट निवडतो आणि त्या वाटेवरून कधी आपली वाटचाल सुरू होते हे समजत देखील नाही. असाच काहीसा योगायोग बांगलादेशातील ढाका येथील बराक विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या शगुफ्ता तब्सुम अहमद हीच्या बाबतीत घडला.

accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
BRS Ex MLA Chennamaneni Ramesh
BRS Ex MLA Chennamaneni Ramesh: जर्मन असूनही चार वेळा भूषविली आमदारकी; उच्च न्यायालयाकडून लाखोंचा दंड, भारतीय नागरिकत्वही झाले रद्द
There has been demand for law requiring judges to disclose their assets like MPs and mlas
न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याबाबत कायदा? केंद्र शासन म्हणतेय…

आयुष्यात नेमके काय करावं हा गोंधळ मनात सुरू असताना केवळ वडिलांच्या इच्छेखातर ती कायद्याचं शिक्षण घेण्यास तयार झाली. मुळातच कोर्टात जाऊन केस लढणं हे शगुफ्ताला सुरुवातीपासूनच पसंत नव्हतं. तेव्हा या कायद्याच्या शिक्षणाचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेत कायदेशीर सल्लागार किंवा इतरत्र अनेक ठिकाणी याचा उपयोग होऊ शकतो हे तिला वडिलांनी समजाविलं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अचानकपणे प्रोफेसर असलेले तिचे वडील डॉ .सय्यद ताहीर यांचा खून झाला आणि शगुफ्ताच्या आयुष्याचं गणितच बदललं.

सर्व सामान्य बांगलादेशी कुटुंबांप्रमाणे ताहीर यांचं कुटुंब. प्रोफेसर असलेले डॉ. सय्यद हे राजशाही विद्यापीठात जिओलॉजी ॲण्ड मायनिंग विभागात कार्यरत होते. विद्यापीठामध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये ते कमालीचे लोकप्रिय होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे जीवनसूत्र त्यांनी अंगिकारलं होतं. ते, गृहिणी असलेली बायको, मुलगा संजिद आणि मुलगी शगुफ्ता असं छोटं कुटुंब होतं. घरात शिक्षणाला फार महत्त्व होतं.

हेही वाचा… हिजाब न घालता बुद्धिबळ खेळणारी सारा खादेम कोण आहे ? स्पेनने सारा खादेमला का दिले नागरिकत्व ?

विद्यापीठाच्या आवारातच त्यांचं घर होतं. गर्द झाडी, खेळायला मोकळी मैदानं आणि भरपूर सवंगडी अशा रम्य वातावरणात शगुफ्ता आणि तिच्या भावाचं बालपण सरलं. पुढे उच्च शिक्षणाच्या निमित्तानं दोन्ही मुलं ढाका येथे स्थायिक झाली. बराक विद्यापीठात शगुफ्ता कायद्याचं शिक्षण घेत होती. तिच्या बरोबर तिची आई देखील राहत असे. त्यामुळे आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रोफेसर बऱ्याचदा ढाकात येत असत.

असंच ते १ फेब्रुवारी २००६ रोजी आपल्या कुटुंबाची भेट घेऊन नेहमीप्रमाणे आपल्या राजशाही येथील घरी परतले. आपण सुखरूप पोहोचल्याचा फोन देखील केला. आणि अचानक काही तासांनी त्यांचा खून झाल्याचा फोन आला. पूर्ण कुटुंबासाठी ही पार हदरवून टाकणारी अशी गोष्ट होती. मुळातच या हत्येमागे नेमकं कारण काय असावं हेच त्यांना समजत नव्हतं.

पुढे पोलिस तपासात असं लक्षात आले की, वडिलांचे सहकारी डॉ. मिया मोइद्दिन- जे त्यांच्या खास मित्रांपैकी एक- यांच्या साहित्यिक चोरीविषयी प्रोफेसर सय्यद यांना माहिती झालं. त्यांनी विद्यापीठात त्यांच्या भवितव्याबाबत चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलविली होती. परिणामी त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आता संपुष्टात आले होते. याचाच सूड म्हणून डॉ. मिया यांनी प्रोफेसर सय्यद यांचे केअर टेकर असलेले जहांगीर आणि त्यांचे काही सहकारी यांच्या सहाय्याने कट रचून त्यांचा खून केला.

हेही वाचा… सिक्किमध्ये १ वर्षाची प्रसूती रजा, पण वैद्यकीयदृष्ट्या किती महिने सुट्टी हवी? तज्ज्ञ सांगतात…

यासाठी डॉ मिया यानं जहांगीरला पैसे, विद्यापीठात नोकरी असे आमिष दाखविलं होतं असं जहांगीरनं खटल्या दरम्यानच्या सुनावणीत सांगितलं. त्यामुळे २००८ मध्ये राजशाहीच्या न्यायालयात मुख्य आरोपींना दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर झाली. पण या चौघांनी या विरोधात अपील केलं आणि हे प्रकरण बांगलादेशाच्या उच्च न्यायालयात गेलं.

दरम्यानच्या काळात, मिया यांचां जमीन मंजूर होऊन खटल्याच्या काळापर्यंत त्यांची सुटका झाली. या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी मिया यांनी दहाहून अधिक वकिलांची नियुक्ती केली. आपण कायद्याच शिक्षण घेत असूनही, या काळात फारसं काहीच करू शकत नव्हतो याची सल शगुफ्ता यांना होती. पुढे २०१२ मध्ये त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्या त्यांच्या वडिलांना आणि इतर दोन आरोपींना बऱ्याच वर्षांपासून ओळखत होत्या. त्यामुळे या खटल्यात त्या वडिलांना पूर्णपणे न्याय देऊ शकत होत्या असं त्यांचं मन त्यांना वारंवार सांगत होतं. कदाचित यासाठीच वडिलांनी आपल्याला कायद्याचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला असावा, असं त्यांना राहून राहून वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी हा खटला लढवायचा असं ठरवलं.

त्या स्वत:च त्यांच्या वकिलांना या खटल्यात मदत करू लागल्या. सुरुवातीपासूनचे सगळे पेपर नीट वाचून काढले. त्यानुसार आवश्यक ती कागदपत्रं तयार केली. आरोपीबाबत पूर्ण माहिती मिळवून कुठे कुठे तो आम्हाला अडकवू शकतो याचा अभ्यास केला. अर्थात, या सर्वांमध्ये त्यांना त्यांच्या आई व भावाची देखील तितकीच साथ होती. येणाऱ्या प्रत्येक रमजानमध्ये त्या त्यांच्या वडिलांना न्याय व शांतता लाभू दे, अशीच प्रार्थना अल्लाकडे करीत.

हेही वाचा… ‘मुंबई की रानी’ आर. जे. मलिष्काच्या उरात कधी होणार धडधड?

मिया हे श्रीमंत होते आणि त्यांचा जनसंपर्क देखील चांगला होता. त्यामुळे पैशाच्या जोरावर ते पुरावे नष्ट करण्यात माहीर होते. त्याचबरोबर, वेळोवेळी तेच शगुफ्ता यांच्या वडिलांचे कसे उत्तम मित्र होते आणि ते असे काहीच करणार नाही हे ते न्यायालयाला भासवत असायचे. त्यामुळे न्यायालयात नेमका काय निकाल लागेल याचा अंदाज करता यायचा नाही. याच सुमारास न्यायालयात अनेक खटले प्रलंबित असल्यामुळे त्यांच्या खटल्याच्या सुनावणीस २०२१ साल उजाडलं. पुढे न्यायमूर्ती हसन सिद्दिकी यांनी मिया मोएद्दिन यांना दोषी ठरत त्यांची मृत्यदंडाची शिक्षा कायम ठेवली.

तो निकाल ऐकताच गेल्या सोळा वर्षांची मेहनत फळाला आली. ‘‘मागची १६ वर्षे मी आणि माझे कुटुंबीय कोण कोणत्या वेदनेमधून गेलो याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो. आपली नोकरी गमाविण्याच्या नुसत्या भीतीनं एखादा माणूस खून करायला धजावू शकतो हा विचार असह्य आहे.’’ असं त्या सांगतात.

त्या पुढे म्हणतात. ‘‘कायद्याचं शिक्षण घ्यायचं, परंतु न्यायालयात खटले लढवायचे नाहीत, या विचारवर मी ठाम होते, परंतु वडिलांच्या खटल्यानं मला संघर्ष करायला शिकविलं. त्यामुळेच मी आता खटले लढविण्याचा निर्णय घेतला असून, सामान्य लोकांना न्याय द्यायचा असा माझा नेहमीच प्रयत्न राहिल. मी वकील व्हायचे हे माझ्या वडिलांचं स्वप्न मी पूर्ण केलं आणि त्यांच्या खुन्यांना शिक्षा देऊन त्यांनाही न्याय मिळवून दिला याचा आनंद आयुष्यभर माझ्यासोबत राहिल.’’

suchup@gmail.com

Story img Loader