केतकी जोशी

जो तूफानों में पलते जा रहे हैं
वही दुनिया बदलते जा रहे हैं

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…

प्रसिद्ध शायर जिगर मुरादाबादींचा हा शेर जणू तिच्यासाठीच लिहीला गेला आहे…ती आत्मनिर्भर आहे, ती स्वयंपूर्ण आहे, ती अनेकांचा आधार आहे…ती आहे शाहीन मलिक ! जळणं काय असतं याचा जिवंत अनुभव घेतलेली शाहीन आज अनेकांच्या आयुष्यात दिवा होऊन प्रकाश पसरतीये. शाहीन मलिक ॲसिड हल्ल्याची शिकार आहे. २००९ मध्ये शाहीनवर तिच्याच सहकाऱ्यांनी ॲसिड फेकलं. जिवंतपणी मरण काय असतं याचा अनुभव घेतलेली शाहीन आता आपल्यासारख्याच अनेकींना जगायला शिकवतीये, त्यांना पायावर उभं करतीये.

दिल्लीत राहणाऱ्या शाहीनचं आयुष्य २००९ पूर्वी खूप वेगळं होतं. अत्यंत हुशार आणि दिसायला सुंदर असणाऱ्या शाहीनच्या डोळ्यांत अनेक स्वप्नं होती आणि आयुष्यात काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द, महत्त्वाकांक्षा होती. ती एमबीए करत होती. सरळमार्गी असलेल्या शाहीनला तिच्या अवतीभवतीचं जगही तसेच असेल असं वाटत होतं. पण तसं नव्हतं. तिच्या बुद्धीमत्तेचा, सौंदर्याचा हेवा करणारे अनेकजण होते. त्यातीलच चौघांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त करुन टाकलं. एके दिवशी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर बससस्टॉपवर उभी असताना शेजारी तोंडावर रुमाल लावलेला एकजण उभा राहिला आणि काही लक्षात यायच्या आतच तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं. ते एकूण चौघेजण होते, त्यातील एकजण तर अल्पवयीन होता. २०१३ मध्ये त्याला दोषी ठरवण्यात आलं. पण अन्य तिघांवर खटला दाखल करुनही न्यायाची प्रतिक्षाच करावी लागत आहे. पण शाहीनची खरी लढाई होती जगण्याशी, तिचा संघर्ष आता खूपच मोठा होता.

आणखी वाचा-“आपण सहन केलेली पीडा इतरांच्या वाटेला येऊ नये…” महिलांच्या ‘पंखां’त बळ देणाऱ्या प्रमिला गुप्तांचा संघर्ष वाचाच!

ॲसिड हल्ल्यानंतर धास्तावलेली शाहीन जवळपास तीन वर्ष घरात झोपून होती. तिचं आयुष्य फक्त घर ते हॉस्पिटल इतकंच मर्यादित राहिलं होतं. ती प्रचंड निराश झाली होती. तिच्या कुटुंबावरचा आर्थिक भार वाढला होता. एक सर्जरी झाली की आपण बऱ्यापैकी पूर्वीसारख्या होऊ असं तिला वाटलं होतं. पण ॲसिडमुळे तिचा ९० टक्के चेहरा जळाला होता. डोळा वाचवण्यासाठी कितीतरी सर्जरी कराव्या लागत होत्या. त्यामुळे कुटुंबावरचा भार कमी करण्यासाठी शाहीननं नोकरी करण्याचं ठरवलं. कारण ॲसिड हल्ला झालेल्यांना नोकरीवर घ्यायला फारसं कुणी तयार नसायचं हे तिला जाणवलं. पाठिंबा देण्याचं सगळेचजण बोलतात, पण वेळ आली पाठिशी कुणीच उभं राहत नाही हे शाहीनला कळलं, तिनं त्याचवेळेस मनाशी काहीतरी ठरवलं. ॲसिड हल्ल्यामधून बचावलेल्या मुलींसाठी काम करणाऱ्या एका संस्थेत तिला नोकरी मिळाली. “या हल्ल्यातून बाहेर पडताना माझ्यापुढे दोनच पर्याय होते, एकतर घरी शांत बसून राहायचं, आईवडिलांवर अवलंबून राहायचं, त्यांच्यावर ओझं बनायचं, समाजासमोर यायचंच नाही किंवा मग उठून बाहेर पडायचं आणि आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे त्याला सामोरं जायचं…मी दुसरा मार्ग निवडला,” असं शाहीन सांगते. पण हा प्रवास सोपा नाही याचा अंदाज तिला आला.

आणखी वाचा-जॉर्जिया मेलोनी यांच्यासारखं वागायला आपल्याला जमेल का?…

शाहीनला २०१३मध्ये नोकरी मिळाली. तिनं दिल्ली महिला आयोग, ह्यूमन राईट्स लॉ नेटवर्क आणि मीर फाऊंडेशनसारख्या अन्य काही संघटनाबरोबर काम सुरु केलं. या संस्थांबरोबरच्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर शाहीननं स्वत:ची एक संस्था सुरु केली. तिनं सुरु केलेली ‘ब्रेव्ह सोल्स फाउंडेशन’ आज देशभरातल्या कितीतरी मुलींचं हक्काचं “आपलं घर” बनलं आहे. ही संस्था ॲसिड हल्ला झालेल्या मुलींना निवारा तर देतेच, पण त्याचबरोबर त्यांना मानसिक, कायदेशीर आणि सामाजिक लढाई लढण्यासाठीही सक्षम करते, त्यांच्यासोबत उभं राहते. त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणही दिलं जातं. विकृत मनोवृत्तीतून केल्या जाणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे कितीतरी मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. अनेकजणी कायदेशीर लढाई लढूच शकत नाहीत. प्रत्येकीला घरचा आधार, मानसिक आधार मिळतोच असं नाही, कितीतरी जणींच्या आयुष्याची फरफट होते. या वेदनेतून गेलेल्या शाहीननं त्याच वेदनेला आपलं शस्त्र बनवायचं ठरवलं आणि ती उभी राहिली. आपल्यापरीनं ती मदत करत होती, लढत होती. पण २०२१ मध्ये तिनं संस्था सुरु केली आणि गरजू महिलांसाठी हक्काचा आधार बनली. शाहीनवर आतापर्यंत जवळपास २५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ॲसिड हल्ला झाल्यानंतर आपण जितक्या जोरात किंचाळलो, तितकं आयुष्यात आधी आणि नंतरही पुन्हा कधी ओरडले असू असं वाटत नाही असं शाहीन सांगते. आपण जिवंत तर राहिलो, पण जगायचं असेल तर यातून बाहेर पडायला हवं हे शाहीननं ठरवलं आणि बदलाची मशाल हाती घेतली. न्यायाच्या मंदिरात शाहीनसारख्या कितीतरी जणी न्यायाची वाट बघत आहेत. पण तोपर्यंत ती बसून राहिली नाही. कारण,तिचा ठाम विश्वास आहे.

हार हो जाती है जब मान लिया जाता है
जीत तब होती है जब ठान लिया जाता है !