who is Jayanti Chauhan : बिसलेरी आंतरराष्ट्रीयचे [Bisleri International] अध्यक्ष, रमेश चौहान यांची कन्या जयंती चौहान सुरुवातीला कंपनीचे नेतृत्व करण्यासाठी साशंक होती. तिच्या वडिलांनी आपले वाढते वय आणि कोणताही पात्र उत्तराधिकारी नसल्याने बिसलेरी आंतरराष्ट्रीय ही कंपनी विकण्याचा विचार केला. नोव्हेंबर २०२२ दरम्यान, टाटा ग्रुप बिसलेरी कंपनी आपल्या ताब्यात घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, टाटासोबत करार पूर्ण न झाल्याने अखेरीस जयंतीने या कंपनीची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयंतीने उपाध्यक्ष [Vice Chairperson] या पदाद्वारे कंपनीची जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर मागच्याच वर्षी कंपनीने काही नवीन कार्बोनेटेड शीतपेये बाजारात आणण्यासंबंधीची घोषणा केली होती. ती शीतपेये म्हणजे रेव्ह, पॉप व स्पायसी जीरा. या सब-ब्रॅण्ड्सचे वर्गीकरण कोला, ऑरेंज व जीरा अशा श्रेणींमध्ये करण्यात येते. बिसलेरी लिमोनाटा या ब्रॅण्डअंतर्गत समाविष्ट असणाऱ्या कार्बोनेटेड पेयांमधील नवीन उत्पादनामुळे बिसलेरी कंपनीचा आणि त्यांच्या उत्पादन श्रेणींचा विस्तार होण्यास मदत होते. इतकेच नाही, तर या उत्पादनांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बिसलेरी कंपनी विविध सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंगचीदेखील वेळोवेळी मदत घेत असते.

हेही वाचा : हातात कपड्यांची पिशवी अन् खिशात ३०० रुपये; १५व्या वर्षी घर सोडून कष्टाने उभारली ४० कोटींची कंपनी!

खरे तर बिसलेरी कंपनीने सॉफ्ट ड्रिंक मार्केटमध्ये आपले पाऊल टाकण्याआधी मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स कंपनीने ‘कॅम्पा कोला’ या ब्रॅण्डच्या अंतर्गत स्वतःचे शीतपेय बाजारात आणण्याचा विचार केला होता. त्यामध्ये प्युअर ड्रिंक्स ग्रुपचाही सहभाग होता. परंतु, तज्ज्ञांच्या मते, आता बिसलेरी कंपनीने या क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे रिलायन्स कंपनीच्या योजनांसाठी आव्हाने उभी राहू शकतात.

बिसलेरीचा टाटाबरोबरचा करार पूर्ण न झाल्याने नंतर या कंपनीने टाटा कॉपर प्लस आणि हिमालयन यांसारख्या मोठ्या मिनरल वॉटर ब्रॅण्डमध्ये गुंतवणूक केली. परिणामी तब्बल सात हजार कोटी रुपयांच्या कंपनीची एकमेव वारसदार जयंती चौहान ही मुकेश अंबानी यांची रिलायन्स आणि रतन टाटा यांच्या टाटा समूहातील कंपन्या यांच्याशी चांगली स्पर्धा करू शकते, अशी माहिती डीएनएच्या एका लेखावरून मिळते.

वयाच्या २४ व्या वर्षापासून बिसलेरी कंपनीमध्ये सहभागी असणारी जयंती चौहान सध्या या कंपनीची उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आता वयाच्या ४२ व्या वर्षीदेखील ती अतिशय सक्रियपणे बिसलेरीच्या सेल्स आणि मार्केटिंग टीमचे नेतृत्व करीत आहे. तसेच, जाहिरात, कम्युनिकेशन, डेव्हलपमेंट, मार्केटिंग व ब्रॅण्डिंग अशा सर्व स्तरांवर आपले मोलाचे योगदान ती देत आहे.

हेही वाचा : कॅन्सरशी लढत; ६२ वर्षीय महिलेने कर्करोगाच्या अभ्यासासाठी पोहण्यातून उभारला फंड! पाहा…

जयंतीने अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अॅण्ड मर्चेंडायझिंगमधून प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुढे इटलीतील इस्टिटुटो मॅरांगोनी मिलानोमधून फॅशन स्टायलिंगचा अभ्यास केलेला आहे. इतकेच नाही, तर फोटोग्राफी आणि फॅशन स्टायलिंगमध्ये अधिक पारंगत होण्यासाठी तिने लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधूनही शिक्षण घेतलेले आहे. त्याव्यतिरिक्त लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अॅण्ड आफ्रिकन स्टडीजमधून [SOAS] तिने अरबी भाषेत पदवी मिळवली आहे.

दिल्ली, मुंबई व न्यू यॉर्कमध्ये राहिल्याने जयंतीला फिरण्याची आणि प्राण्यांची खूपच आवड आहे. पूर्वी बिसलेरी कंपनीच्या विक्रीसंदर्भातील चर्चा होत होत्या; परंतु आता तसा कोणताही विचार नसून, जयंती स्वतः या कंपनीकडे लक्ष देईल, असे खुद्द रमेश चौहान यांनी म्हटले असल्याचे DNA च्या एका लेखावरून समजते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of bisleri international vice chairperson jayanti chauhan who runs 7000 crore business in marathi chdc dha