डॉ. मेधा ओक
जाणून घेऊ यात सर फ्रेडरिक बॅटिंग कोण होते, इन्सुलिन म्हणजे काय आणि मधुमेहात त्याचा कसा वापर होतो. इन्सुलिनचा कसा शोध लागला त्याची रोमहर्षक कहाणी. सर फ्रेडरिक ग्रॅन्ट बॅटिंग, कॅनेडियन सर्जन आणि टोरेंटो येथील प्रोफेसर जॉन जेम्स रिचर्ड मॅक्लॉइड यांना १९२३ साली इन्सुलिनच्या शोधासाठी नोबल पारितोषिक देण्यात आले. त्यांनी चार्ल्स बेस्ट या वैद्यकीय विद्यार्थ्यांबरोबर श्रेय वाटून घेतले. त्यांनी स्वादुपिंडातून प्रथमच यशस्वीरित्या इन्सुलिन वेगळे केले. इन्सुलिनचे शुद्धीकरण त्यानंतर जेम्स बी कॉलिप यांनी केले.
आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : रोहितच्या गर्लफ्रेंडऐवजी रुचिरा होऊन खेळली असतीस तर…
११ जानेवारी १९२२ रोजी प्रथमच मधुमेही रुग्णावर त्याचा वापर करण्यात आला. तो रुग्ण होता १४ वर्षाचा मुलगा लिओनार्ड थॉम्सन, ज्याला प्रथमच इन्सुलिन उपचार म्हणून देण्यात आले. मधुमेहामध्ये टाईप वन आणि टाईप टू असे मुख्य दोन प्रकार असतात. ज्यात टाईप वन मधुमेहींमध्ये इन्सुलिनचा पूर्णपणे अभाव असतो. कारण त्यांचे स्वादुपिंड अजिबात इन्सुलिन तयार करत नाहीत. त्यामुळे उपचार म्हणून टाईप वन मधुमेहींना इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे – लैंगिक दुर्बलतेचा मधुमेहाशी संबंध आहे ?
२७ जुलै १९२१ मध्ये टाईप वन मधुमेह हा जीवघेणा आजार समजला जायचा. कारण इन्सुलिनचा शोध लागला नव्हता. शंभर वर्षांपूर्वी असे लोक खूपच दयनीय जीवन जगायचे. टाईप वन मधुमेह झाल्यास ते फार काळ जगायचे नाहीत. रक्तातील साखर नियंत्रणाकरिता काहीच उपाय नव्हता. मधुमेहाचा उल्लेख फार पुराण्या वैद्यकीय साहित्यातदेखील आढळतो. दुसऱ्या शतकात एरिटस ऑफ कॅपॅडोनिया यांनी मधुमेहाचे पहिले अचूक वर्णन केलेले आढळते. त्यानंतर १७ व्या शतकात थॉमस विलीस यांनी ‘डायबिटीस’ नावाला ‘मिलाईटस’ हा शब्द जोडला कारण या रुग्णांची लघवी साखरेसारखी गोड लागली. पाचव्या शतकातही भारतीय शल्यचिकित्सक, सुश्रुत संहितेत ही मधुमेहाचे वर्णन आहे. ज्यात त्यांना या रुग्णांची लघवी मधासारखी गोड व चिकट असते हे लक्षात आले. पुढे असेही लिहिले आहे की हा आजार श्रीमंत लोकांमध्ये दिसून येतो.
आणखी वाचा : मधुमेह : लक्षणे, चाचण्या व उपचार
चीनमधील चँग चुंग चिंग याने पहिल्यांदी मधुमेहाची लक्षणे अचूकपणे वर्णन केली. त्यांनी नमूद केले की या लोकांचे वजन खूप कमी होते, खूप वेळा लघवीला जावे लागते, खूप भूक लागते व खूप प्रमाणात तहान लागते. त्यांच्या असेही लक्षात आले की या रुग्णांना त्वचारोग, गळवे वरचेवर होतात, डोळ्याने अंधुक दिसते व लैंगिक समस्या ही उद्भवतात.
आणखी वाचा : सानिया मिर्झा घटस्फोट घेतेय ऐकलं.. मला का नाही जमलं?
इन्सुलिनचा शोधही अपघातानेच लागला. १८८९ मध्ये मिन्कोवस्की व जोसेफ फॉन मेरिंग हे स्वादुपिंड चयापचयात काय काम करते ते शोधत होते. म्हणून त्यांनी प्रयोग म्हणून कुत्र्याचे स्वादुपिंड काढून टाकले तसे त्याच्या रक्तातील साखर वाढली आणि तो कुत्रा मरण पावला. तेव्हा शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की स्वादुपिंडामधे काहीतरी पदार्थ (केमिकल) आहे जे साखर नियंत्रण करते. स्वादुपिंडातील अर्क दिल्यास रक्तातील साखर कमी होते. ही पुसटशी कल्पना आल्यावर पुढील शोधकार्याला गती मिळाली.
आणखी वाचा : आई न होणाऱ्या स्त्रीला स्वार्थी ठरवले जाणे दु:खद: – जेनिफर अॅनिस्टन
इन्सुलिन हे हार्मोन स्वादुपिंडातील अंतस्त्रावी ग्रंथीतून म्हणजेच बीटा पेशीतून तयार होते व रक्तात सोडले जाते. रक्तातील साखर नियंत्रण करण्याचे महत्त्वाचे काम ते बजावते. बीटा पेशी स्वादुपिंडात छोट्या छोट्या बेटासारख्या पसरलेल्या असतात स्वादुपिंडाच्या शेपटीत (टेल ऑफ पॅनक्रियाज) मध्ये त्या जास्ती प्रमाणात आढळतात. इन्सुलिन हे एक प्रथिन आहे ज्याला दोन अमिनो ॲसिडच्या साखळ्या असतात. ए आणि बी व त्यांना जोडणारी एक छोटी सी (C peptide) साखळी असते. हे C peptide फक्त मानवी इन्सुलिन मध्ये सापडते. बाहेरून तयार केलेल्या कृत्रिम इन्सुलिनमध्ये सी पेप्टाईड सापडत नाही.
आणखी वाचा : स्त्रियांनो, मधुमेह टाळण्यासाठी काळजी घ्या!
इन्सुलिन हे टॅक्सी सारखे काम करते. रक्तवाहिन्यातील साखर सर्व पेशींच्या आतपर्यंत पोहोचवण्याचे काम इन्सुलिन करते व त्या नंतरच पेशी काम करू शकतात. जर इन्सुलिन नसेल तर रक्तातील साखर वाढत राहते व पेशी उपाशीच राहतात. बीटा पेशींचा शोध लावला १९१० साली सर एडवर्ड अलबर्ट शारपे शेफर यांनी. या पेशींची बेटं असल्याने insulin नाव दिले. लॅटिन भाषेत insula म्हणजे बेट. त्यालाच आयलेट्स ऑफ लॅगरहॅन्स असे नाव दिले गेले. (Islets of Langerhans).
आणखी वाचा : ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ मोहिमेअंतर्गत राज्यातील ३ कोटींहून अधिक महिलांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ
पूर्वी इन्सुलिन हे डुकराच्या व गाईच्या स्वादुपिंडातून काढले जायचे (porcine and bovine) पण त्याच्यात खूप अशुद्धता (impurities) असल्यामुळे लोकांना त्याचा त्रास व्हायचा, ॲलर्जी यायची. हल्ली ह्यूमन इन्सुलिन मिळते. खूप संशोधनानंतर जेनेटिक इंजिनिअरिंगने मानवी इन्सुलिनसारखे इन्सुलिन तयार केले आहे. त्यामुळे धोका नगण्यच. आता डुकरापासून किंवा गाईपासून केलेले इन्सुलिन वापरात नाही. ह्युमन इन्सुलिनचे बरेच प्रकार आता सहज उपलब्ध आहेत. या अद्भुत रसायनामुळे टाईप वन मधुमेही आता खूप सुखकर व जवळपास सामान्य आयुष्य जगत आहेत.
सर्व शोध कार्याला, सर्व शास्त्रज्ञांना मानाचा मुजरा…
oakmedha51@gmail.com