“ए, चला लवकर… टकल्यानं बघितलं तर तासभर त्याची पकपक ऐकावी लागेल. शिवाय लेक्चरलाही बसावं लागेल यार !” फिजिक्सच्या सरांबद्दल बोलत नैना बॅग खांद्यावर टाकत म्हणाली, तसे बाकी सगळे पटापट कॉलेज बाहेर पडले. “गोरीलाचं ‘सबमिशन’ करायचं आहे उद्या. रात्री सगळे एकत्र ‘टोपो’ (Topograpgy चा बोलीभाषेतला शॉर्ट फॉर्म, जो विद्यार्थ्यांमध्ये वापरला जातो) मारू आणि उद्या तोंडावर फेकू त्याच्या! ड्रॉइंग शीटवर इतकी मेहनत कोण करतंय? कॉपी करायची बस!”

आणखी वाचा : सतत सॉफ्ट पॉर्न पाहणाऱ्यांच्या दृष्टीने बलात्कार साधा गुन्हा?

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
autoriksha
‘२०० रुपये जास्त मागितले, माराहाण करण्याची दिली धमकी’, रिक्षावाल्याने २० वर्षीय तरुणाला छळले, धक्कादायक घटनेचा Video Viral

ही मुलं आपल्या प्राध्यापकांना ‘टकल्या’, ‘गोरीला’… स्त्री प्राध्यापकांना ‘ती बाउन्सर’ , ‘ती सडकी’ अशी संबोधनं वापरत होती. काही वेळातच त्यांची चर्चा नको त्या वळणावर उतरली. प्राध्यापकांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणं, प्राध्यापिकांच्या इतर पुरुष शिक्षकांशी जोड्या लावणं, अशा गोष्टी सुरू झाल्या . त्यांच्याच कंपूमधील पूर्वाला मात्र आपल्या मित्रमैत्रिणींचं हे असं बोलणं कायमच खटकत असे. तिनं एक-दोनदा त्यावरून आक्षेपही घेतला होता, त्यावेळी “ए, चल काकूबाई ! इतकंच सोवळं रहायचं असेल तर घरी बस जा! कोणत्या काळात वावरतेस तू ? जास्त सोवळेपणाचा आव नको आणूस!” म्हणून तिची खिल्ली उडवली गेली होती. आपण ग्रुपमधून बाहेर फेकले जाऊ, या भीतीनं ती विरोध न करता गप्प बसत होती. तिला वाटायचं, पालक आणि मुलांसारखं विद्यार्थी आणि शिक्षक यांचंही नातं वंदनीय असायला हवं. तिथे आदर, सन्मान आणि आस्था असायला हवी. पण चित्र तसं नव्हतं.

आणखी वाचा : उपयुक्त : कुडता, टॉप, ब्लाऊज- गळ्यांच्या फॅशनमध्ये वैविध्य

कधीतरी कंटाळा आला म्हणून कॉलेज बुडवून बाहेर जाणं अगदीच सामान्य आहे. महाविद्यालयीन जीवनातल्या गमतीजमतींमधील तो अत्यंत आवडता कार्यक्रम असतो. एका मर्यादेत असं वागणं हा अजिबात चिंतेचा विषय नाही. आणखी एक बाब म्हणजे विद्यार्थी अगदी सर्रासपणे आपल्या शिक्षक किंवा प्राध्यापकांना त्यांच्या दिसण्यावरून किंवा लकबीवरून चित्रविचित्र टोपणनावं ठेवत असतात आणि बऱ्याचदा शिक्षकांनाही ते माहीत असतं. काही अंशी हेही मान्य केलं, तरी मुलांचा शिक्षकांबद्दलचा आदर कमी कमी होत जातोय ही मात्र चिंतेची बाब आहे.

आणखी वाचा : किरण पावसकरांना खुलं पत्र; साहेबांना ‘बायकी धंदे’ करायला सांगाच, कारण…

अगदी सहावी-सातवीसारख्या लहान वर्गातील मुलंदेखील आपल्या शिक्षकांचा उल्लेख एकेरी संबोधनानं आणि हीनतेनं करतात. समाजमाध्यमांवर ‘गुरुजीं’वरील सवंग आणि मानहानी करणारे विनोद ऐकून किंवा वाचून लोकांचं रक्त तापण्याऐवजी त्यांचं मनोरंजन कसं होतं? यूट्यूबवर तर शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील संबंधांवर अत्यंत घाणेरडे, अश्लील लघुपट फार मोठ्या संख्येनं आहेत, हे किती मोठं दुर्दैव! गुरू-शिष्याच्या अत्यंत पूजनीय नात्याची परंपरा असलेल्या आपल्या देशात हे असं का व्हावं?

आणखी वाचा : Open Letter: मुलीची छेड काढणारे रिक्षावाले काका, स्तन सगळ्याच मुलींकडे असतात पण…

या नात्याच्या स्खलनामागे अनेक कारणं आहेत. समोरील व्यक्तीबद्दल आदर दाखवण्याची एकूण मानसिकता बदलली आहे. आजकाल मुलं फार लहान वयातच स्वतःला ज्ञानी समजू लागतात. त्यामुळे समोरील व्यक्तीला आपल्यापेक्षा अधिक ज्ञान आहे आणि आपण याचकाच्या भूमिकेतून ते आत्मसात करू, ही भावना क्षीण होत जात आहे. तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे, की कुठल्या विषयावर माहिती मिळवण्यासाठी मुलांना शिक्षकच काय, कुणावरही अवलंबून राहावं लागत नाही. विविध विषयांवर ज्ञान मिळवण्यासाठी कुठल्याही क्षणी, कुठल्याही ठिकाणी क्षणार्धात ‘गूगल गुरुजी’ हात जोडून सेवेस तत्परच असतात. प्रत्यक्ष वर्गात शिक्षकांच्या अनुभवातून, उदाहरणांतून मन लावून शिकण्याची आंतरिक उर्मी मुलांच्या वयानुरूप कमी कमी होत जात आहे.

आणखी वाचा : गोष्ट फराळाची: सुनेत्रा अजित पवार… चकली… सुप्रिया सुळे अन् ३५ वर्षांनंतरही मिळणारा सासूचा ‘तो’ सल्ला

हा बदल एकतर्फी नक्कीच नाही. शिक्षकांनी फक्त यांत्रिक पद्धतीनं अभ्यासक्रम संपवण्यासाठी न शिकवता रंजक पद्धतीनं विषय खुलवत शिकवण्याचा प्रयत्न केल्यास मुलांना शिकण्याची गोडी निर्माण होते हे नक्की. त्यांच्याशी वैयक्तिक भावनिक पातळीवर संवाद करणं, अभ्यासातील अडचणी सोडवण्यासाठी वेळ देणं आणि नव्या जुन्या पद्धतीची सांगड घालत विषय हाताळणं, यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न केल्यास दोन्ही बाजूंनी विश्वासाचं नातं तयार होईल.

आणखी वाचा : ‘ये लडकी बहुत आगे जाएगी!’

शिक्षकांकडून विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांच्यावरील अत्याचाराच्या बातम्या ऐकल्या, वाचल्या, की मनाचा थरकाप होतो. अर्थात त्यांची संख्या कमी असली, तरी ज्यांनी पिढी घडवायची, संस्कार करायचे, अशा शिक्षकांकडूनच जर इतकं घृणास्पद कृत्य घडत असेल, तर समाजाच्या मनात त्यांची प्रतिमा डागाळली जाणारच … आणि त्याची प्रचंड मोठी किंमत इतर आदरणीय शिक्षकांना मोजावी लागणार.
हे होऊ नये म्हणून समाज, शासन, पालक, विद्यार्थी आणि समस्त शिक्षकवृंद यांना आधी संस्कारक्षम व्हावं लागेल. तरच गुरू-शिष्य नातं चेष्टेचा विषय न होता कायम सन्मानास पात्र होईल.
adaparnadeshpande@gmail.com

Story img Loader