मैत्रेयी किशोर केळकर

नुसती फुलांनी बहरली आहेत म्हणून रोपांची खरेदी न करता ती नक्की कोणत्या प्रकारात मोडतात हे जाणून घेणं आवश्यक असतं.

Sanjay Raut on Former CJI DY Chandrachud
“माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जाता जाता…”, संजय राऊत यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘त्यांना काही कळते का?’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Maharashtra News Update: Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Updates
Eknath Shinde PC : मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “निवडणुकीच्या पूर्वीही…”
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले; म्हणाले, “एखादा पक्ष किंवा व्यक्ती…”
Ramdas Kadam on Ajit Pawar
मुख्यमंत्रीपद मिळत नाही म्हणून शिंदे गटाने अजित पवारांना धरलं जबाबदार; रामदास कदम म्हणाले, “त्यांनी आमची…”
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

विविध व्याख्यानांमधून, कार्यक्रमांतून, मुलाखतीदरम्यान बागप्रेमी मंडळींकडून अनेक प्रश्न विचारले जातात. आज अशाच बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या लेखात देण्याचा प्रयत्न करते.

आपल्या घरामध्ये एखादा तरी हिरवा मित्र म्हणजेच हिरवं रोपं असावं असं जवळ जवळ सगळ्यांनाच वाटतं. हौसेनं नर्सरीतून, प्रदर्शनातून रोपं आणली जातात. पुढे ती नीट फुलली, फळली नाहीत की मात्र फार निराशा येते. मग अनेक प्रश्न पडतात. बरेच वेळा हौसेने सक्युंलंटस् खरेदी केली जातात. ही रोपं एक तर अतिशय आकर्षक दिसतात आणि त्यांना फार सुरेख फुलं आलेली असतात. सहाजिकच आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो. यातलं नेहमी पसंतीस उतरणारं झाडं म्हणजे जेड. जेडला फॉर्च्यून प्लांट असंही म्हणतात. फेंगशुई पद्धतीत किंवा झेन गार्डन तयार करण्यात याचा नेहमीच वापर होतो.

जाडसर, मांसल पानांचं हे झाड दिसायला अतिशय सुंदर दिसतं. याचा हिरवा गर्द रंग, काहिशा वृक्षाचा फील देणाऱ्या जाडसर फांद्या यांमुळे टेरारियम, लँडस्केप, हँगिंग या सगळ्यांमध्ये जेडचा वापर होतो. कमीत कमी देखभालीत उत्तम वाढणारं कोणतं झाडं असेल तर ते जेड. पण तरीही सर्वाधिक प्रश्न या जेड संबंधीच असतात.

हेही वाचा >>> निसर्गलिपी : काचपात्रातील बाग सजवताना…

याची पानं गळतात, नुसत्या फांद्या राहिल्या आहेत, पानं पिवळी पडली, याची वाढ होत नाही. या अशा अनेक प्रश्नांची मालिकाच असते. जेड हे सक्यूलंट आहे. त्यामुळे त्याला मुळात अगदी कमी पाणी लागतं. भरपूर सूर्यप्रकाश लागतो, खरं तर कडक उन्हात ठेवलं तरी हे नाजूक झाडं फार उत्तम वाढतं.

पण हे इनडोअर प्लांट म्हणून लावलं जातं. मग त्याला सूर्यप्रकाश जास्त  नसला तरी चालेल, एक दिवसाआड पाणी द्या वैगरे सूचना मिळालेल्या असतात. झाडाची जातकुळी लक्षात न घेता त्या तंतोतंत पाळल्या जातात आणि मग सगळी गडबड होते.

तर एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची की सूर्यप्रकाश हा प्रत्येक झाडाला आवश्यक असतोच. सूर्यप्रकाशाशिवाय अन्न निर्मिती होणं शक्यच नाही. मग ते झाडं हिरव्या पानांचे असो की लाल, जांभळ्या, पिवळ्या पानांचं असो. त्यामुळे इनडोअर प्लांट म्हटलं तरी सूर्यप्रकाश हा हवाच. फरक एवढाच की काही झाडांना तो कमी मिळाला तरी पुरतो, तर काहींना तो प्रखर असण्याची गरज असते.

फर्न, सक्युंलंटस्, मनी प्लांट यांसारख्या वेलींना बेताचं ऊन मानवतं. दोन दिवसाआड जरी ऊन दाखवलं तरी चालतं. तेवढ्यावरही ती उत्तम वाढतात. पण ऊन आणि पाणी यांचा मात्र ताळमेळ बसला पाहिजे. दुसरा हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, ‘‘मी नर्सरीमधून शेवंती आणली तेव्हा तिला भरपूर कळ्या होत्या, फुलंही आली, पण आता मात्र एकही फूल नाही. असं का?’’ तर याचं उत्तर असं की,

हेही वाचा >>> काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…

प्रत्येक झाड हे वंश सातत्य टिकवण्यासाठी फुलं आणि फळांची निर्मिती करत असतं. बहुवर्षायु झाडांमध्ये हे निर्मिती चक्र सतत सुरू असतं, पण वर्षायू किंवा अर्धवर्षायू झाडांमध्ये त्याचा एक विशिष्ट कालावधी असतो. म्हणूनच त्यांचा तो बहराचा काळ संपला की फुलं येणं बंद होतं. त्यामुळे नुसती फुलांनी बहरली आहेत म्हणून रोपांची खरेदी न करता ती नक्की कोणत्या प्रकारात मोडतात हे जाणून घेणं आवश्यक असतं. काहीवेळा थुजा, ख्रिसमस ट्री अशी gimnosperms वर्गातली रोपं खरेदी केली जातात. दिसायला अतिशय आकर्षक असलेली रोपं काहीच दिवसांत पानं गाळतात. याला कारण असतं त्याची माती. रोप खरेदी केल्यावर काही दिवसांत त्यांची माती बदलणं हे महत्त्वाचं काम असतं. अतिरिक्त कोकोपीट असलेली माती बदलून पुरेशी खताची मात्रा असलेली, हवा खेळती राहील अशी माती तयार करून त्यात आपलं हे झाड लावावं. मग त्यांची वाढ उत्तम होते. भाजीपाला लागवड करतानासुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्यातली एक म्हणजे वेलवर्गीय भाज्यांना फुलं आली, फळं धरायला लागली की त्यांच्या पुढील वाढीसाठी जास्तीची खतं देणं गरजेचं असतं. रोपं लहान असताना खताची मात्रा वाढविण्यापेक्षा फळधारणेवेळी ती वाढवणं केव्हाही योग्य. यामुळे उत्पादनात वाढ होते. अजूनही असे बरेच प्रश्न आहेत. त्यांची चर्चा पुढील लेखात करू. तुम्हाला पडणारे प्रश्न जर तुम्ही कळवलेत तर त्यांची उत्तरेही देता येतील.