श्रुणाली रानडे, जपान
जपानमध्ये येऊन मला सात वर्षे झाली आहेत. मी अजूनही एबारा कॉर्पोरेशनमध्येच काम करते आणि मला इथं काम करायला आवडतं. पूर्वीपेक्षा कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्या असून त्या मी सक्षमपणं निभावत आहे. इथं मी डिझाईन अँड डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून काम करते. यंदाच्या इंटिग्रेटेड रिपोर्टमध्ये नाव, फोटो आणि तांत्रिक कामाच्या स्वरुपाची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी प्रत्येक उद्योगाकडून एका नावाची निवड केली जाते. फ्लुईड अँड मिशनरी क्षेत्रातून हजारो कर्मचाऱ्यांपैकी माझी निवड करण्यात आली. जेएलपीटी (Japanese Level Proficiency Test) ही तेव्हा एनथ्री पास होते, आता एनटू पास झाले आहे. आतापर्यंत जपानमधल्या ४७ जिल्ह्यांपैकी ३३ जिल्ह्यांत फिरले आहे. अगदी छोट्या मुलांपासून ते वयस्करांपर्यंत अनेकांसोबत ट्रिप केल्या असून त्या खूप एन्जॉय केल्या आहेत. हॉस्टेलपासून ते फॅन्सी हॉटेल्समधलं रहाणं, स्थानिक पदार्थ चाखणं वगैरे सहलीच्या शास्त्रात मोडणाऱ्या गोष्टी आवर्जून केल्या. त्यामुळं मित्रमंडळी आणि ओळखीचे, त्यांच्या सहली आखताना माझा सल्ला आवर्जून घेतात. मलाही ते आवडतं. त्याच त्या कामाच्या चौकटीपासून दूर जाऊन मन उल्हासित करायचं असेल तर छोटी-मोठी सहल ही हवी. शिवाय मला छायाचित्रणातही रस आहे. मी हौशी फोटोग्राफर असले तरी फक्त फोटोग्राफीसाठी म्हणून फोटोग्राफर मित्रमंडळींसोबत काही ट्रिप्सना गेले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा