जिमिता तोरस्कर
गेल्या लेखात २०१६ पर्यंत माझ्या करिअरचा प्रवास होता. आता थोडी उडी घेते, मालिकांमध्ये दाखवतात तशी. माझ्या आयुष्य-करिअरमध्ये गेल्या सहा वर्षांतल्या महत्त्वाच्या टप्प्यांविषयी सांगते. २०१६ सालापर्यंतच्या करिअर विषयीचा लेख प्रसिद्ध झाल्यावर अनेक मुला-मुलींनी संपर्क साधला आणि त्यांच्या करिअरविषयीच्या स्वप्नांचे विचार शेअर केले. त्यातही मला प्रकर्षानं जाणवलं की, अनेक चतुरांना माझं करिअर प्रेरणादायी वाटलं. संपर्क साधलेल्यांपैकी काहींनी करिअर निवडीबद्दल प्रश्न विचारला होता. त्याला मी माझं ठरलेलं पण ठाशीव उत्तर दिलं होतं की, Pick a career that will make you happy! या उत्तरात अजून काडीमात्रही बदल झालेला नाही. कारण आर्थिक स्थैर्य मिळवून मी श्रीमंत होऊ शकेन, मात्र एक शास्त्रज्ञ म्हणून काम करताना मला सर्वाधिक आनंद मिळेल, असं मला कायम वाटतं.

आणखी वाचा : यशस्विनी : ‘ती’ सांगतेय, करिअर- विदेशातील शिक्षणाचा समृद्ध करणारा अनुभव (पूर्वार्ध)

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
17 bogus doctors found in a year annual review meeting of the District Health Department concluded thane news
बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आव्हान; वर्षभरात १७ बोगस डॉक्टर आढळले, जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिक आढावा बैठक संपन्न
L&T, Subramaniam , 90 hours work ,
काम महत्त्वाचेच, पण जगणे अधिक महत्त्वाचे…
Anand Mahindra takes a swipe at L&T chairman comment
Anand Mahindra: ‘बायकोला पाहत बसणं मला आवडतं’, आनंद महिंद्रा यांचा उपरोधिक टोला; वर्क लाइफ बॅलन्सवर सडेतोड भूमिका

तुम्हाला माहिती आहे का की, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातले जवळपास ९० हजार तास फक्त पोटासाठी राबून काम करण्यात खर्च होतात. त्यामुळं या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहणं आणि तरीही चांगलं आयुष्य जगायचं असेल तर मनासारखं योग्य ते करिअर निवडण्याला पर्याय नाही. २०१६ मध्ये पीएचडी पूर्ण करणं हे माझं ध्येय होतं. खरंतर थोडा खोलात शिरून विचार केल्यावर दिसतं की, अनेकदा अनेक प्रकल्प ठरल्या वेळेत पूर्ण होत नाहीत. किंवा ते वेळेत पूर्ण झाले तरी पण त्यामुळं फारसं काही साध्य होतं असं नाही. म्हणूनच मी माझ्या ध्येयाकडं धीम्या पण चांगल्या गतीनं वाटचाल केली आणि ते पूर्णत्वास नेत कॅन्सर अर्थात कर्करोगाच्या क्षेत्रात माझ्या छोट्याशा कामगिरीची एक रेष आखली. माझ्या मार्गदर्शकांच्या मोलाचा मार्दगर्शनामुळं, त्यांनी सतत दिलेल्या प्रोत्साहनामुळं मी हे करू शकले. माझ्या करिअरचा विचार करता मला स्त्री आणि पुरुष असे दोन्ही मार्गदर्शक लाभले. हा लिंगभेद डोक्यातून काढून टाकून फक्त इतकंच लक्षात ठेवायला हवं की, मार्गदर्शक आपल्याला असंख्य गोष्टी शिकवतो किंवा मग काहीच शिकवत नाही. बस्स. यापलीकडं काहीच नसतं. त्यामुळं आपल्या भोवताली चांगली माणसं असणं, त्यांनी नेहमी प्रोत्साहित करणं, प्रेरणा देणं आणि आपल्या मेंदूला त्यांच्याशी केलेल्या संवादामुळं पौष्टिक खुराक (विचार) मिळणं हे पुरेसं ठरतं.

आणखी वाचा : वयाच्या तिशीमध्ये नवरा मी गमावला, पण तुम्ही मात्र…

माझ्या पीएचडीच्या काळात Tonje Steigedal, Gunbjorg Svineng and Synnøve Magnussen या माझ्या मार्गदर्शकांमुळं मला कायम प्रेरणा मिळाली. त्या स्त्री माझ्या आदर्श ठरल्या. करिअर आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल राखणं मी त्यांच्याकडून शिकले. एकीनं दुसरीला सबल केलं आणि कारवॉ बढता गया, हे मी जवळून पाहिलं आणि मीही तोच वसा पुढं न्यायचं ठरवलं. मलाही चांगल्या करिअरची स्वप्न पाहणाऱ्या अनेकींना ती प्रत्यक्षात साकारायला आणि आयुष्यात पुढं जायला प्रवृत्त करायचं आहे.

आणखी वाचा : अब्दुल सत्तारांना खुलं पत्र: महिलांना शिवीगाळ करण्यात कसला आलाय पुरुषार्थ ?

जिमिता तोरस्कर

नॉर्वेमध्ये सात वर्षं राहिल्यानंतर आता मी स्थानिक नॉर्वेजियन भाषा बोलू शकते. अर्थात त्यात अजूनही काही वेळा शब्द अडतो, कारण मी मूळची नॉर्वेतील नाही. खरं सांगायचं तर मी मराठी वाचू शकते, गुजरातीत विचार करते, हिंदीत स्वप्नं बघते, इंग्रजीत लिहिते आणि नॉर्वेजियन बोलते. जणू डोक्यात भाषक खिचडीच शिजत असते सतत… पण त्याचमुळं या सगळ्या भाषांतल्या लेखकांची पुस्तक वाचू शकते. त्यातही कविता वाचणं मनापासून आवडतं आणि त्यामुळं प्रेरणा मिळून मीही कविता लिहिते.

आणखी वाचा : Open Letter: गौतमी पाटील, तुला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचा बिहार करु नकोस!

माझ्या पीएचडीच्या संशोधनात आमच्या ग्रुपला नवीन बायोमार्कर गवसला. त्याच्या साहाय्यानं ब्रेस्ट कॅन्सर फुफ्फुसांत पसरला आहे का, याचा अदमास घेणं शक्य होतं. कॅन्सर शरीराच्या अन्य भागांत पसरण्याआधी ते तपासणाऱ्या एखाद्या टेस्टची तुम्ही कल्पना करू शकता का… कॅन्सर हा म्हटलं तर एक भयावह रोग आहे. कारण तो केवळ त्याच अवयवापुरता मर्यादित न राहता हळूहळू शरीराच्या इतर भागांतही पसरतो. तसं होण्याची आधीच चाहूल लागली तर मग उपचारांना ठोस दिशा मिळू शकते आणि उपचार झाल्यावरही पुढच्या चाचपणीसाठी एक धागा शिल्लक राहतो. हे संशोधन आम्ही अनेक परिषदा आणि टॉक शोजमध्ये सादर केलं. शिवाय राष्ट्रीय स्तरावरील टीव्ही शोमध्ये याबद्दल बोलण्याचा बहुमान आणि संधी आम्हाला मिळाली.

आणखी वाचा : पुरुषांना मोकळ्या विचारांची मैत्रीण चालते, पण मग बायको का नाही?

२०१८ मध्ये मला मेडिसिनमध्ये पीएचडी मिळाली आणि त्या अर्थानं मी डॉक्टर झाले. हे यश बघायला माझे आजोबा हवे होते, असं राहूनराहून वाटतं. त्यांनी मला कायमच प्रोत्साहन दिलं. मला हवं तितकं आणि हवं ते शिकायला भक्कम पाठिंबा दिला. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आत्ता आजोबा असते तर ते कसे वागले असते, हा विचार करते आणि त्यांनी शिकवलेल्या तत्त्वांनुसार वागायचा प्रयत्न करते. पीएचडीनंतर मी ओस्लोमधल्या एका खासगी कंपनीत सिनियर सायंटिस्ट म्हणून काम करू लागले. नॉर्वेची राजधानी असलेल्या ओस्लोमध्ये घर भाड्यानं घेणं फारच महागात पडतं. म्हणून मग घर विकतच घेतलं. माझी आजी, आई आणि मावशीनं हे घर प्रत्यक्षात येऊन पाहावं, असं मला मनापासून वाटलं. पण मग कोविड १९ चा काळ सुरू झाला आणि हे स्वप्न लांबलं. अनेक कंपन्या आणि कर्मचाऱ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं विचार करता हा खूप भयावह काळ होता. अनेक ठिकाणी कंपन्या बंद पडल्या आणि माझ्या काही मित्रमैत्रिणींच्या नोकऱ्या गेल्या. कोविड केव्हा संपणार हे उमगत नव्हतं. त्यांच्याप्रमाणं माझीही नोकरी गेली तर कुटुंबाचं काय होईल, ही शंका अनेकदा मनात डोकावून गेली… अर्थात तेही दिवस सरले आणि जीवन पूर्वपदावर आलं.

आणखी वाचा : बघतोय रिक्षावाला… आरशातून !

कुटुंबाचा विषय निघाला म्हणून सांगावंसं वाटतं की, एखादी व्यक्ती कितीही यशस्वी असली तरीही आपल्याकडं अजूनही त्या व्यक्तीचं लग्न झालं आहे की नाही, यावरून तिच्याविषयीचं मत ठरवलं जातं. माझं संशोधन नव्हे तर मी अमूक वर्षांची झाले तरी माझं लग्न झालं नाही, हा चर्चेचा विषय ठरतो. पण मी असल्या चर्चांना कधीच धूप घातली नाही. कारण माझं कुटुंब आणि माझा एकमेकांवर अढळ विश्वास होता. माझ्यासारखाच आयुष्यावर प्रेम करणारा कुणी भेटल्यावर मी लग्न करेन, हे मी त्यांना सांगितलं होतं. माझी आणि अभिषेश पालची ओळख होणं हे जणू विधीलिखित होतं. काही महिन्यांपूर्वीच आमचं लग्न झालं. आम्हांला प्रवास करायला खूप आवडतो. दोघांच्या घरच्यांचे स्वभाव मनमोकळे आणि प्रेमळ आहेत. कामासाठी जीव तोडून मेहनत करणं, वेळेचं महत्त्व जाणणं ही आमची तत्त्वं आहेत. त्यामुळंच आमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारा महत्त्वाचा पाठिंबा आम्ही एकमेकांना देतो.

आणखी वाचा : पत्रास कारण की… टिकली! भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र

तीन वर्षं सिनियर सायंटिस्ट म्हणून काम केल्यावर मला जुलै २०२२ मध्ये चीफ सायंटिस्ट ऑफिसर म्हणून बढती मिळाली आहे. आमची वेगवेगळ्या क्षेत्रातील १० तज्ज्ञांची टीम असून त्यांची मी टीमलीडर आहे. आपापलं ज्ञान आणि माहितीच्या साहाय्यानं कोणते उपचार रुग्णाला अधिक फायदेशीर ठरू शकतील, हे ठरवण्यासाठी डॉक्टरांना मदतीचा हात ठरेल अशा पद्धतीचं एक स्मार्ट सॉफ्टवेअर आम्ही तयार करत आहोत. असं म्हटलं जातं की, एक चांगला डॉक्टर आजार बरा करू शकतो, तर एक उत्तम डॉक्टर रूग्ण बरा करू शकतो. म्हणजे एका परीनं ते पर्सनलाईझ्ड मेडिसिन असतं. व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणूनच एकाला उपयोगी पडणारे उपचार दुसऱ्यासाठी परिणामकारक ठरतील असं नाही. हा व्यक्तीगणिक असणारा फरक आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या साहाय्यानं नोंदवून ठेवणं आणि त्या रूग्णाला सहाय्यकारी ठरेल असे उपचार शोधणं हे सगळं कसं घडवता येईल, या संदर्भात आमचं काम सुरू आहे. मला महिती आहे की, मी मांडते आहे हा मुद्दा या आधी आणखीही काहीजणांनी मांडलेला आहे. कारण जगभरात सगळीकडं रुग्णाला हितकारी ठरतील अशा उपचारांचा विचार केला जातो आणि त्याबद्दल दुमत नाही. मला वाटतं की, एखादं मोठं ध्येय गाठण्यासाठी एखाद-दोनजण नाही तर कमालीचं टीमवर्क होणं गरजेचं आहे. एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ, ही भावना असणं आवश्यक आहे. त्यामुळं भारत आणि नॉर्वेमधल्या या प्रकारचा विचार करणाऱ्या आरोग्यक्षेत्रातील जाणकारांनी सहकार्य केल्यास या संदर्भात अधिक सखोल संशोधन करण्याचा माझा मानस आहे. त्यायोगे दोन्ही देशांतील उत्तम आरोग्य लाभावं, हा या मागचा उद्देश आहे. ही कळकळ मी वेबिनार्स, सेमिनार्स, पॉडकास्ट आदींच्या माध्यमांतून वेळोवेळी प्रकट केली आहे आणि करते आहे. प्रत्येकाच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करता या कामासाठी अधिकाधिक विचारी व सक्रिय तरुण पिढी कार्यरत होणं, ही काळाची गरज आहे.

Story img Loader