जिमिता तोरस्कर
परवा पेंटिंग करत होते, फुलांचं. एकेक फूल हळूहळू आकारत होतं. मनात आलं, आपलं आयुष्यही असंच आहे की… एकेक टप्पा गाठतंय.. ओघानं एखाद्या चित्राला भराभरा शेडिंग करावं, तसं आठवू लागलं. लहानपणी पाहिलेल्या स्वप्नांपैकी एक होतं, ‘एमबीबीएस’ व्हायचं. ते प्रत्यक्षात साकारायची वेळ आली, तेव्हा नागपूरला अॅडमिशन मिळत होतं नि घरचे मुंबईबाहेर पाठवायला तयार नव्हते. शेवटी जुहूच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अॅडमिशन घेतलं. या क्षेत्रात शास्त्रज्ञ, संशोधनादी करिअरच्या वाटा आहेत, हे कळलं. मध्यमवर्गीय कुटुंबातली मी एकुलती एक असल्यानं सुपरप्रोटेक्टेड नसते, तरच नवल! बी. फार्मच्या शेवटच्या वर्षांला असताना नोटीस बोर्डवर वाचलं की, स्टुडण्ट एक्स्चेंज प्रोग्रॅम आहे. त्याबद्दल उत्सुकता वाटल्यानं मी अप्लाय केलं. महिनाभरासाठी इंडस्ट्रिअल ट्रेनी म्हणून निवड झाल्यावर कळलं की, देश होता इजिप्त आणि शहर होतं अलेक्झांड्रिया. त्या सुमारास तिथं राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यामुळं माझ्या सुरक्षेची काळजी घरच्यांना वाटत होती. आम्ही पूर्ण शाकाहारी असल्यानं तो आणखी एक प्रश्न होताच. मी मात्र जायचंच, हे पक्कं ठरवलं. भरपूर मनधरणी करून घरच्यांना राजी केलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा