गेल्या काही दशकांमध्ये भारतात नवनवीन लेखक उदयास आले. आपल्या लेखणीच्या जोरावर या लेखकांनी समाजात क्रांती घडवली. अधिकतम लेखक कमी काळात लवकर प्रसिद्ध होण्यासाठी रोमँटिक कथेची मदत घेतात. साधारण समाजामध्ये रोमँटिक स्वरुपाच्या कथा वाचण्याचे प्रमाण अधिक आहे. पण, आज आम्ही तुम्हाला अशा लेखिकेबद्दल सांगणार आहोत, जिने आपल्या कादंबरीने समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे.

हेही वाचा- शिक्षणाला नसते वयाचे बंधन! महिलेने वयाच्या ९० व्या वर्षी पदव्युत्तर पदवी मिळवून रचला नवा इतिहास

सावीचा जन्म १९९३ मध्ये हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील बहल या छोट्याशा गावात झाला. तिने सुरत विद्यापीठातून बॅचलर ऑफ कॉमर्सची पदवी घेतली. सावी शर्मा एका सामान्य कुटुंबात लहानाचे मोठे झाली. लहानपणापासून तिचे साहित्यावर प्रचंड प्रेम होते. सुरुवातीच्या काळात तिच्या मनात कथाकथनाची आवड निर्माण झाली. घरात आर्थिक चणचण असतानाही सावीने लेखिका होण्याचे स्वप्न जोपासले.

हेही वाचा- राजकुमारी ते उपमुख्यमंत्री- राजस्थानच्या दिया कुमारी यांचा प्रवास

२०१५ मध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्म एक्सप्लोर करताना सावीच्या मनात स्वयं-प्रकाशनाची संकल्पना आली. २०१६ मध्ये सावी शर्माने तिची पहिली कादंबरी, “एव्हरीवन हॅज अ स्टोरी” स्व-प्रकाशित केली. २०१६ मध्ये सावीने इच्छुक लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी “थिंक अँड इंक पब्लिकेशन्स” या प्रकाशनगृहाची सह-स्थापना केली. “एव्हरीवन हॅज अ स्टोरी” या कांदबरीला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. या कादंबरीने सावी शर्माला प्रसिद्धीच्या झोतात आणले. या कादंबरीची प्रसिद्धी सातासमुद्रापार पोहचली. या कांदबरीचे अनेक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले.

पदार्पणानंतर सावीने प्रेरक कथा लिहिणे सुरूच ठेवले. “दिस इज नॉट युवर स्टोरी” (२०१७) आणि “एव्हरीवन हॅज अ स्टोरी २” (२०१८) या तिच्या कादंबऱ्याही खूप गाजल्या. सावी शर्मा हिचा प्रवास साहित्यापलीकडेही विस्तारला आहे. आपल्या भाषणांमधून सावीने अनेकांना प्रेरित केले आहे. एका प्रसिद्ध लेखिकेबरोबर सावी एक लोकप्रिय प्रेरक वक्ता बनली आहे. सावी शर्माची यशोगाथा इच्छुक लेखक आणि उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.

Story img Loader