युनियन लोकसेवा आयोग किंवा यूपीएससी (UPSC) भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी खूप अभ्यास, जिद्द अन् कठोर परिश्रम घ्यावे लागतात. मात्र, भारतात असेही काही विद्यार्थी आहेत जे त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत घेतात आणि यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होतात. एका तरुणीने आपल्या पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. यासाठी तिने मेहनत आणि चिकाटीबरोबर परीक्षा पास करण्यासाठी एक खास वेळापत्रक बनवलं होतं.

हेही वाचा- आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी मुलींचीही, पण समाजाची मानसिकता संकुचित का?

काम्या मिश्रा असं त्या तरुणीचं नाव आहे. ओडिशाची रहिवासी असलेली काम्या लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थिनी होती. बारावीच्या परीक्षेत तिला ९८.६ टक्के गुण मिळाले होते. या परिक्षेत ती रिजनल टॉपर ठरली होती. काम्याने तिचे माध्यमिक शिक्षण केआयआयटी इंटरनॅशनल स्कूल, ओडिशातून पूर्ण केले. त्यानंतर, तिने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी घेतली. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात असताना ती यूपीएससी परीक्षेची तयारी करत होती.

हेही वाचा- महिलांवरील घरगुती हिंसाचारात वाढ; प्रतिबंधक कायदा काय सांगतो?

काम्या मिश्रासाठी यूपीएससीचा हा प्रवास सोपा नव्हता, यूपीएससीची तयारी अवघड आहे आणि नियोजनाशिवाय तयारी करणे योग्य होणार नाही हे तिला माहीत होते. तिने परीक्षेसाठी खास तयारी केली प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा यासाठी तिने वेगळे वेळापत्रक बनवले. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी तिने एक विशिष्ठ वेळ ठरवून घेतली. शिवाय मुख्य़ परीक्षेच्या उत्तर लेखनाचाही तिने खूप सराव केला होता. सरावाशिवाय कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही, असे काम्याचे मत आहे.

हेही वाचा- पालकत्व : इतक्या लवकर मासिक पाळी ?

काम्या मिश्राने २०१९ मध्ये पहिल्यांदाच यूपीएसी परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ती या परीक्षेत पास झाली. काम्याने १७२ व्या क्रमांकासह परीक्षा उत्तीर्ण केली. काम्याने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी भारतीय पोलीस सेवा (IPS) पद मिळवले. आयपीएस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिच्याकडे सुरुवातीला हिमाचल केडरची जबाबदारी सोपवण्यात आली. नंतर तिची बिहार केडरमध्ये बदली करण्यात आली. बिहारमध्ये तिची पहिली पोस्टिंग पाटणा येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक (एएसपी) म्हणून करण्यात आली होती.

Story img Loader