Success story: शून्यातून वर येणं ही म्हण आपण सर्वांनीच ऐकली असेल. स्वतःकडे काहीही नसताना जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर यश अक्षरशः खेचून आणणे म्हणजेच शून्यातून विश्व निर्माण करणे. शिक्षणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. उत्तम शिक्षण, कौशल्य आणि मेहनत यामुळे आयुष्यात अनेक गोष्टी साध्य करता येतात. उत्तर प्रदेशच्या सृजन अग्रवालनं शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर मायक्रोसॉफ्टमध्ये तब्बल ५० लाखांच्या पॅकेजची नोकरी मिळवली आहे. संबंधित वृत्त DNA संकेतस्थळाने दिले आहे.

सृजन अग्रवाल ही मूळची उत्तर प्रदेशातील असून सृजनचे वडील दीपक अग्रवाल खाजगी नोकरी करतात, आई घर सांभाळते. सृजन लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. सृजन अग्रवालने रामचंद्र अग्रवाल गर्ल्स इंटर कॉलेजमधून बारावी केली. यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून एक राज्य प्रवेश परीक्षा घेण्यात आली, त्यामध्ये तिची पहिल्या तिघांमध्ये निवड झाली. त्यामुळे तिच्या शिक्षणाचा खर्च माफ झाला. त्यानंतर तिनं डॉ.आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर अपंग, AITH, कानपूर येथून कॉम्प्युटर आणि सायन्समध्ये बी.टेक केले आहे. आपल्या क्षमतेच्या जोरावर सृजनने बीटेकच्या दुसऱ्या वर्षात मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्नशिप मिळवली होती.

snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
Success Story Of Chitraang Murdia
Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz
Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत

मातृभाषेत शिक्षण मात्र स्पर्धा इंग्रजीशी

हल्ली मुलांना कोणत्या क्षेत्रात करियर करायचं कळत नाही, पर्याय खूप आहेत, मात्र आपल्यासाठी योग्य पर्याय निवडताना विद्यार्थ्यांना नाकी नऊ येतात. मात्र या तरुणीने तिचे ध्येय आधीच ठरवले होते. दरम्यान सृजनसाठी हे सगळं सोपं नव्हतं, हिंदी माध्यमाच्या पार्श्वभूमीमुळे सृजनला तिच्या इंजिनीअरिंगच्या अभ्यासात खूप अडचणींचा सामना करावा लागला. पण तिने ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि अतिरिक्त वेळ काढून त्यावर अधिक काम केले. तिच्या याच मेहनतीचे फळ म्हणजे दुसऱ्या वर्षीच तिला मायक्रोसॉफ्टकडून इंटर्नशिपची ऑफर मिळाली. ही इंटर्नशिप तिने बंगळुरू येथून पूर्ण केली आणि आता कंपनीने तिला ५० लाखांच्या पॅकेजवर नोकरीची ऑफर दिली आहे. तिच्या या यशाने तिच्या कुटुंबासोबतच शिक्षकांनाही आनंद झाला आहे..

हेही वाचा >> हिला आरक्षण प्रथम कुठे लागू झाले? महिलांच्या सहभागामुळे काय फरक पडला? जाणून घ्या सविस्तर!

शिक्षणाचे माध्यम कोणते असावे, यासंदर्भात भारतात पूर्वापार दोन मतप्रवाह चालत आले आहेत. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे, त्यामुळे प्रारंभीपासूनच शिक्षणाचे माध्यम इंग्रजी भाषा असायला हवे, अशी जोरदार मागणी करणारा एका मोठा वर्ग आहे. त्याचवेळी विद्यार्थी कोणत्याही विषयाचे आकलन मातृभाषेतून जास्त चांगल्याप्रकारे करू शकतात, मातृभाषेतून शिकलेली गोष्ट लवकर आत्मसात होते, पक्की स्मरणात राहते आणि त्यामुळे किमान पदवीपूर्व शिक्षणाचे माध्यम तरी मातृभाषाच असायला हवे, असा युक्तिवाद करणारा वर्गही मोठा आहे.

हेही वाचा >> शेतकऱ्याच्या मुलीची दमदार कामगिरी! अवघ्या १७ व्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत रचला इतिहास, कोण आहे नेहा ठाकूर? जाणून घ्या…

इंग्रजीपासून दूर पळू नका

मात्र सृजन अग्रवाल हिंदी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगते की, इंग्रजीपासून दूर पळण्याऐवजी त्यासाठी अधिकचा वेळ देऊन त्यावर पकड निर्माण करा. उदाहरण देताना ती सांगते, याच संस्थेच्या एका विद्यार्थ्याला कॅनडाच्या एका कंपनीने एक कोटी रुपयांचे पॅकेज देऊ केले आहे. सर्व शाखांच्या कंपन्यांमध्ये देश-विदेशातून उमेदवारांची निवड झालेली असते. त्यामुळे संवादासाठी इंग्रजी भाषेचाच वापर अधिक आहे. हे वास्तव नाकारता येणार नाही. मात्र मातृभाषेत शिक्षणामुळे पुढं आपलं काहीच होऊ शकत नाही असा भ्रम काढून टाकला पाहिजे.

निश्चय केला की कुठलीही बाब अशक्य नाही

इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे, अपेक्षित इंग्रजी भाषा येत नसल्याने संधी दिली नाही असाही फिडबॅक कंपन्यांकडून दिला जातो. प्लेसमेंटसाठी स्पर्धाही प्रचंड असते. कारण कंपन्या संबंधित महाविद्यालयातील सर्वोत्तम कौशल्य आपल्याकडे येईल यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे मातृभाषेत जरी शिक्षण झालं असलं तरी मुलांनी घाबरण्याचं कारण नाही असं ती सांगते. मनात जिद्द व मेहनत करण्याच्या निश्चय केला की कुठलीही बाब अशक्य नाही, हे सृजन अग्रवालने सिद्ध करुन दाखवलं आहे.