आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणं हे इंजिनिअरिंग परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर लाखोंच्या पॅकेजसह नोकरी ही प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. मात्र हीच गल्लेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात पतरणाऱ्या एका तरुणीची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे.आजही अनेकांकडून मुलाच्या जन्मासाठी अट्टहास धरला जातो. मात्र, या वृत्तीला छेद देत मुलीसुद्धा वंशाचे नाव उंचावू शकतात हे दाखवून देणारे अलीकडचे उत्तम उदाहरण म्हणजे अहाना गौतम.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वयाच्या ३० व्या वर्षी अमेरिकेतील नोकरी सोडली

अनेकजण आपला व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतात, परंतु सर्वच यशस्वी होत नाहीत.अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी त्यांच्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून व्यायवसाय केला आणि यशस्वी झाले. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे अहाना गौतम. तिने वयाच्या ३० व्या वर्षी तिचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, नोकरी सोडली आणि एक स्टार्टअप तयार केला. आता ती १०० करोड टर्नओव्हर असलेल्या कंपनीचं नेतृत्व करते.

कशी केली ओपन सिक्रेट, स्नॅकिंग स्टार्टअपची सुरुवात?

अहाना गौतम यांनी आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरींग पदवी पूर्ण केल्यानंतर ती अमेरिकेत गेली. तिने २०१४-१०१६ मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले. त्यानंतर, तिने प्रॉक्टर अँड गॅम्बल (P&G) मध्ये चार वर्षे काम केले आणि जनरल मिल्समध्ये विविध पदांवर काम केले.

अलिकडच्या काळात अनेक तरुण-तरुणी नोकरी सोडून वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळत आहेत. या व्यवसायाच्या माध्यामातून लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. अहानानेही तिची चांगली पगाराची नोकरी सोडली आणि अमेरिकेतून भारतात येण्याचा निर्णय घेतला. अहानाने सांगितले की, तिच्या आईने तिला कंपनी सुरू करण्यासाठी सुरुवातीला भांडवल दिले. अहानाने २०१९ मध्ये ओपन सिक्रेट नावाचे आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थ देणारी कंपनी सुरू केली. तिने आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. अहानाने २०१४-२०१६ मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले. अहाना गोदरेज टायसन फूड्स लिमिटेडच्या स्वतंत्र मंडळ संचालक देखील आहेत.

हेही वाचा >> ट्रकचं स्टिअरिंग तिच्या हाती; १० दिवस तमिळनाडू ते बांग्लादेश ट्रक चालवणारी ठरली पहिली महिला

गेल्या १० वर्षांत भारतात स्टार्टअप कल्चर वेगाने वाढत आहे. अनेक तरुणांनी चांगल्या नोकऱ्या सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. तरुण उद्योजकांच्या या लिस्टमध्ये अहाना गौतमचं नाव येतं.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story meet woman an iit harvard graduate who left high paying job in us built rs 120 crore company at 30 her business is chdc srk