Success story : भारतीय प्रशासन सेवेत उच्च अधिकारी म्हणजे आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या असंख्य मुले-मुली अगदी बहुतेक कॉलेज शिक्षणापासूनच यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. त्यासाठी विशेष कोचिंग क्लास लावले जातात. आजकाल तर अगदी दिल्लीत जाऊन विशेष कोचिंग क्लासमध्ये जाऊन याची तयारी केली जाते. तरीही पहिल्याच फटक्यात यात यश मिळण्याची हमी नसते. अशा या अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या परीक्षेत कोणताही क्लास न लावता यशस्वी होण्याची किमया करून दाखवली आहे आयएएस सरजना यादव यांनी

आयएएस अधिकारी बनून देशसेवा करण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेवर सरजना ठाम राहिल्या. यूपीएससी परीक्षा ही देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक असली तरी सरजना यांनी स्वतःहून आणि कोणत्याही कोचिंगच्या मदतीशिवाय परीक्षेची तयारी करण्याचा निर्धार केला होता. सरजना यादव या मूळच्या दिल्लीच्या आहेत. त्यांनी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून बी.टेक. पदवी प्राप्त केली. ही पदवी प्राप्त केल्यानंतर सरजना यादव यांनी ‘ट्राय’मध्ये संशोधन अधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ही नोकरी करताना आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी तयारीला लागल्या.

Ajit Pawar: ‘विलासराव देशमुख आघाडीचे सरकार चालविण्यात पटाईत’, अजित पवारांचे सूचक विधान; महायुतीला इशारा?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
लक्षवेधी लढत : यशोमती ठाकूर यांच्यासमोर भाजपचे आव्हान
Jitu Patwari said cm Shivraj Singh launched Ladli Behan Yojana but payments in mp irregular
‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’
shankar prasad allegation on congress
ओबीसींचे हक्क मुस्लीमांना देण्याचा घाट; रविशंकर प्रसाद यांचा काँग्रेसवर आरोप
expert answer on career advice questions career advice tips
कराअर मंत्र
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?

असा राहिला यूपीएससी उत्तीर्ण करण्याचा प्रवास

आयएएस अधिकारी सरजना यांनी नोकरी करतानाच यूपीएससीची तयारी सुरू केली. या परीक्षेसाठी अनेक उमेदवार १६ ते १८ तास अभ्यास करतात. मात्र, नोकरी करीत, अभ्यास करण्यामुळे त्यांची पूर्णपणे तयारी झाली नाही आणि सरजना यादव २०१७ मध्ये पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरल्या. त्यानंतर मात्र त्यांनी आणखी जोमाने तयारी सुरू केली. मग त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि लक्ष पूर्णपणे तयारीवर केंद्रित केले. यावेळी सरजना यादव या त्यांच्या तिसऱ्या प्रयत्नात कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय २०१९ मध्ये परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांना ऑल इंडिया रँक (AIR) १२६ मिळाली होती.

कसा केला अभ्यास

कोणताही क्लास न लावता सरजना यादव यांनी आपला अभ्यास कसा केला याबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. त्याबाबत सांगताना त्या म्हणतात की, त्यांनी ऑनलाइन माध्यमातून या परीक्षेचा अभ्यास केला. कोणत्याही विषयावर काही वाचायचे असेल, तर त्या इंटरनेटची मदत घेत असत. इंटरनेटवर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे; ज्याच्या मदतीनं आपण सर्व विषयांची तयारी करू शकता, असा विश्वास त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी स्वअभ्यासाच्या बळावरच ही परीक्षा दिली.

हेही वाचा >> पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी अनुकृतीचा सल्ला

अनेकदा तुम्हाला अपयश मिळू शकते; परंतु निराश होता नये. आज आपल्याकडे इंटरनेट आणि त्यावर यूपीएससी परीक्षेशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्या माध्यमातून तुम्ही तयारी करू शकता. परंतु, तुम्ही तुमच्या अभ्यासाचा विषय अचूक निवडायला हवा; अन्यथा तुमचा वेळ वाया जाऊ शकतो.