Success story: आजही अनेकांकडून मुलाच्या जन्मासाठी अट्टहास धरला जातो. मुलगाच हवा अशा मानसिकतेची अनेक उदाहरणे दिसून येतात. मात्र, या वृत्तीला छेद देत मुलीसुद्धा वंशाचे नाव उंचावू शकतात हे दाखवून देणारे अलीकडचे उत्तम उदाहरण म्हणजे अहाना गौतम.

उच्च शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या कंपनीत काम करायचं अनेकांचं स्वप्न असते. अनेक तरुण-तरुणी गल्लेगठ्ठ पगार देणाऱ्या कंपन्यामध्ये नोकरी करतात. मात्र, कंपनीत टार्गेटचे प्रेशर, गुणवत्तेला योग्य वाव नाही, पगार चांगला असूनही समाधान नसल्याने त्यांना ताण जाणवतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात ताळमेळ ठेवण्यात अडचण येते. त्यांचे मन तिथे रमत नाही. कष्टाचे सार्थक होत नसल्याची भावना त्यांच्या मनामध्ये घर करते. अशा वेळी नोकरी सोडून आपला नवा व्यवसाय सुरू करावा, असं अनेकांना वाटतं. स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे निश्चितच आव्हानात्मक काम आहे.

Immigration policy of Donald Trump
अन्यथा : प्रगतीच्या प्रारूपाचा प्रश्न!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
person took 1 85 crores and absconded with his family after luring investors with interest
नागपुरात आणखी एक महाघोटाळा! अडीच हजार लोकांचे कोट्यवधी…
swiggy employee stock option scheme
स्विगीचे ५०० कर्मचारी कोट्याधीश
Cook on Chief Minister Varsha bungalow Arvi constituency
मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यावरील खानसामा ‘ ईथे ‘ काय करतोय ?
syntel founder Bharat Desai Success Story from leaving ratan tata company to start his own business which he sold for crores
व्यवसाय सुरू करण्यासाठी सोडली रतन टाटांची कंपनी, नंतर तोच व्यवसाय २८,००० कोटींना विकला, जाणून घ्या भरत देसाई यांचा प्रेरणादायी प्रवास
Shiv Nadar is the most philanthropic industrialist in the country print eco news
शिव नाडर देशातील सर्वांत दानशूर उद्योगपती; आर्थिक वर्षात २,१५३ कोटी रुपयांचे दातृत्व
article on Trade industry industry group Check for changing rules Bank loans
लेख: भयमुक्त व्यापारउद्याोग करण्याची संधी…

वयाच्या ३० व्या वर्षी अमेरिकेतील नोकरी सोडली

अनेकजण आपला व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतात, परंतु सर्वच यशस्वी होत नाहीत.अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी त्यांच्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून व्यायवसाय केला आणि यशस्वी झाले. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे अहाना गौतम. तिने वयाच्या ३० व्या वर्षी तिचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, नोकरी सोडली आणि एक स्टार्टअप तयार केला. आता ती १०० करोड टर्नओव्हर असलेल्या कंपनीचं नेतृत्व करते.

कशी केली ओपन सिक्रेट, स्नॅकिंग स्टार्टअपची सुरुवात?

अलिकडच्या काळात अनेक तरुण-तरुणी नोकरी सोडून वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळत आहेत. या व्यवसायाच्या माध्यामातून लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. अहानानेही तिची चांगली पगाराची नोकरी सोडली आणि अमेरिकेतून भारतात येण्याचा निर्णय घेतला. अहानाने सांगितले की, तिच्या आईने तिला कंपनी सुरू करण्यासाठी सुरुवातीला भांडवल दिले. अहानाने २०१९ मध्ये ओपन सिक्रेट नावाचे आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थ देणारी कंपनी सुरू केली. तिने आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. अहानाने २०१४-२०१६ मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले. अहाना गोदरेज टायसन फूड्स लिमिटेडच्या स्वतंत्र मंडळ संचालक देखील आहेत.

हेही वाचा >> शाब्बास पोरींनो! ५० लाखांच्या भांडवलातून ५०० कोटींचा व्यवसाय; तरुणींचे फोर्ब्सच्या यादीत झळकले नाव

काय आहे उद्दिष्ट ?

अहाना मूळ राजस्थानमधील भरतपूरची आहे. अहाना आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थ देणारी कंपनी चालवते. नोकरी करत असताना आहानाचं वजन खूप वाढलं होतं, त्यानंतर तिनं अमेरिकेतील एका फूड्स स्टोअरला भेट दिल्यानंतर तिला आरोग्यदायी आहाराचे महत्त्व कळले. सुरुवातीला स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी तिने जनरल मिल्समध्ये विविध पदांवर काम केले. येणाऱ्या काळात रिफाइंड साखर, मैदा, कृत्रिम रंग आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेले भारतातील पदार्थांवर बंद करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे.