यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार दिवस-रात्र कठोर परिश्रम घेत असतात. काही उमेदवार नोकरी करत असतानाही यूपीएससीची तयारी करतात, तर अनेक जण परीक्षेची तयारी करण्यासाठी नोकरीही सोडतात. आज आपण अशाच एका आयएएस महिला अधिकारीबद्दल जाणून घेणार आहोत जिने आपल्या आईची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला होता. मात्र, आयएएस अधिकारी बनण्यासाठी तिने मॉडेलिंगला रामराठ ठोकला
ऐश्वर्या ही मुळची राजस्थानची. ती करीमनगर येथील ९व्या तेलंगणा एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर अजय कुमार यांची मुलगी आहे. बालवयातच तिच्यावर देशभक्तीचे संस्कार करण्यात आले होते.. ऐश्वर्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. दिल्लीतील चाणक्यपुरी येथील संस्कृती स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. तसेच बारावी बोर्डाच्या परीक्षेत ९७.५ टक्के गुण मिळवून अव्वल आली होती. दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी घेतल्यानंतर ऐश्वर्याने आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.
२०१४ मध्ये ती दिल्लीत क्लीन अँड क्लियर फ्रेश फेस बनली. यानंतर, तिने २०१६ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि ती फायनलिस्ट होती. मात्र, त्यानंतरच तिने मॉडेलिंग करिअर सोडून यूपीएससीची तयारी सुरू केली. कॉलेज संपल्यानंतर ऐश्वर्याने २०१८ मध्ये कॅटची परीक्षाही उत्तीर्ण झाली होती पण तिने प्रवेश घेतला नाही.
हेही वाचा- ३०० रुपयांत कसंबसं चालवायची घर; आज इंग्रजीचे धडे देत करतेय बक्कळ कमाई, ही ‘देहाती मॅडम’आहे तरी कोण?
ऐश्वर्याच्या आईने तिचे नाव प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नावावर ठेवले होते. मॉडेलिंगमधील करिअर सोडून ऐश्वर्याने १० महिने घरी राहून यूपीएससीची तयारी केली. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्याने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पहिल्याच प्रयत्नात तिने ऑल इंडिया ९३ वा क्रमांक मिळविला होता. ऐश्वर्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमी सोशल मीडियावर आपले निरनिराळे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर ऐश्वर्याचे २०८ के फॉलोअर्स आहेत. सुंदरतेच्या स्पर्धेत ऐश्वर्या अनेक नायिकांना मागे टाकते.